सविता हलपनवार

Submitted by Mandar Katre on 16 November, 2012 - 11:56

सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी भारतीय गर्भवती महिला डॉक्टरांनी गर्भपात करायला नकार दिल्यामुळे जग सोडून गेली . अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्‍याने हरतर्‍हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (की धर्माच्या नावाखाली अंधश्रद्ध लोकांनी ?) आणखी एक बळी घेतला.

अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !

या बाबतीत सविताच्या समर्थनार्थ आणि असे पुन्हा जगभरात कुठेही होऊ नये म्हणून एक व्यापक चळवळ (निदान फेसबुक/इंटरनेट वर तरी )चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक.

आपण तेवढे तरी निदान केलेच पाहिजे असे वाटते..................!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरती कुणितरी म्हटल्याप्रमाणे अँटिबायोटिक्सचा अयोग्य किंवा वेळेवर न झालेला वापर <<

ओ साती बै!

"वर कुणीतरी" नै. मीच म्हटलं आहे Sad

माझा इतका घोर अनुल्लेख केल्याबद्दल णिषेढ!

>>मलातरी निदान याप्रसंगास प्रो अ‍ॅबोर्शन मंडळी कॅश करतायत असे वाटते.>> I beg to differ

साती, वॉटर ब्रेक झाले आहे, मिसकॅरिएज सुरु झालेय त्यात उलट्या होत आहेत म्हणजे इनफेक्शन सेट झालेय अशावेळी अ‍ॅटिबायोटिक्स खरेच पुरेशी ठरतील का? बाळ जगणार नाही आहे पण हार्टबिट चालू आहेत तोपर्यंत फिटस नैसर्गिक रित्या बाहेर येण्याची वाट बघायची किंवा हार्ट्बिट थांबल्याबर फिटस सर्जिकली काढायचा हेच दोन पर्याय जर अस्पष्ट कायद्यामुळे डॉकसमोर असतील तर त्या काळत इन्फेक्शन पसरत रहाणार ना? अशावेळी काय करावे यासाठी सुस्पष्ट कायदा आवश्यक आहे असे मला तरी वाटते.
मी वैद्यकीय क्षेत्रात नाही त्यामुळे एक सामन्य माणूस म्हणून मला जे वाटले ते लिहिले. माझे लॉजिक चुकत असेल तर जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

>>मलातरी निदान याप्रसंगास प्रो अ‍ॅबोर्शन मंडळी कॅश करतायत असे वाटते.>> I beg to differ

साती, वॉटर ब्रेक झाले आहे, मिसकॅरिएज सुरु झालेय त्यात उलट्या होत आहेत म्हणजे इनफेक्शन सेट झालेय अशावेळी अ‍ॅटिबायोटिक्स खरेच पुरेशी ठरतील का? बाळ जगणार नाही आहे पण हार्टबिट चालू आहेत तोपर्यंत फिटस नैसर्गिक रित्या बाहेर येण्याची वाट बघायची किंवा हार्ट्बिट थांबल्याबर फिटस सर्जिकली काढायचा हेच दोन पर्याय जर अस्पष्ट कायद्यामुळे डॉकसमोर असतील तर त्या काळत इन्फेक्शन पसरत रहाणार ना? अशावेळी काय करावे यासाठी सुस्पष्ट कायदा आवश्यक आहे असे मला तरी वाटते.
मी वैद्यकीय क्षेत्रात नाही त्यामुळे एक सामन्य माणूस म्हणून मला जे वाटले ते लिहिले. माझे लॉजिक चुकत असेल तर जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

स्वाती२
>>साती, वॉटर ब्रेक झाले आहे, मिसकॅरिएज सुरु झालेय त्यात उलट्या होत आहेत म्हणजे इनफेक्शन सेट झालेय अशावेळी अ‍ॅटिबायोटिक्स खरेच पुरेशी ठरतील का?<<
(माफ करा, आपण प्रश्न साती यांना विचारलात, पण 'जाणकारांनी मार्गदर्शन करावे.' म्हटलात, मला थोडी जाणकारी आहे म्हणून लिहित आहे.)
मिसकॅरिएज सुरू होणे व उलट्या होणे यात किती वेळाचे अंतर आहे?
प्रेग्नंसीत उलट्या होणे म्हणजे इन्फेक्शनच असते का?
या प्रश्नांची उत्तरे/उत्तर तुम्हीच लिहिलंय -> मी वैद्यकीय क्षेत्रात नाही.

इन्फेक्शनची चिन्हे दिसल्यावर औषधे सुरू करण्यात दिरंगाई झाली आहे का? हा प्रश्न आहे. किंवा असावा.
(मी वैद्यकिय क्षेत्रात असलो तरी 'तिथे' नव्हतो. I am neither Judge Nor Jury. झाल्या घटनेबद्दल तितकाच दु:खी आहे)
प्रेग्नन्सीमधे कोणतेही औषध लिहिताना/देताना प्रत्येक डॉक्टर किती सावध असतो हे तुम्ही अनुभवले असेलही कदाचित. प्रचंड काळजी घेतली जाते, कारण कोणतेही औषध बाळाला हानी पोहोचवू शकते. इतकेच म्हणतो. तस्मात, अँटीबायोटिक्सबद्दल तितकी काळजी घेतली गेली असावी.
Threatened Abortion मधे प्रत्येकच वेळी आई व बाळ दोघांना वाचविणे ही पहिली 'प्राथमिकता' (Priority) असते. दुसर्‍या स्टेजला, बाळ वाचणेच शक्य नाही असे सिद्ध झाल्यास अथवा, दोघांपैकी एकच वाचेल अशी परिस्थिती असल्यास, आईला वाचविणे ही पहिली 'प्राथमिकता' (Priority) असते. हा प्रोटोकॉल आहे.

मी वैद्यकीय क्षेत्रात नाही त्यामुळे एक सामन्य माणूस म्हणून मला जे वाटले ते लिहिले.

खरे आहे.
पण मी जास्त सध्या लिहू शकत नाही.नंतर लिहिते.

>>मलातरी निदान याप्रसंगास प्रो अ‍ॅबोर्शन मंडळी कॅश करतायत असे वाटते.>>
अतिशय दुर्दैवी विधान.

सविताची बातमी एकून मन विष्ण्ण झाल. खेडेगावातली एखादी अडलेली बाळंतीण जीव सोडते हे ऐकून असाच जीव गलबलतो. आईच्या वेदना ह्या सांगण्या पलिकडे असतात. अ‍ॅबॉर्शन करून घेणारी वा त्याला नाईलाजाने सामोरी जाणारी जी आई असते तिच्या मनातली आंदोलन, तिची मनस्थिती तीच जाणे. बिल क्लिंटन यांच वाक्य होत. In case of abortion Govt should not tell a mother what to do. Its between the mother and her God.

पण माझी खसकते जेव्हा तिने काय कराव हे इतर लोक ठरवतात. मग ते धर्माच्या पगड्याखाली असलेले डॉक्टर असोत वा मुलगा व्हावा म्हणून मुलीचा गर्भ उखडणारे कुटुंबीय असोत.
आमच्या अमेरीकेत सुद्धा धर्माच्या नावाखाली Birth Control Pills च prescription न लिहिणारे डॉक्टर्स आहेत. अश्मयुगातले विचार पुढे करणारे रिपब्लिकन पार्टीतले काही महाभाग आहेत.

मी दोन गोष्टी केल्या..दोन आठवड्यापूर्वी डेमॉक्रेटिक पार्टीच्या बाजूने मतदान केल आणि आज सविताच्या नावाने planned parenthood ला देणगी पाठवली.

कल्पुताई,
तुम्ही स्वतः हातात सुरी धरून उभ्या असलेल्या डॉक्टर आहात असा विचार करा. अन अशा सगळ्या केसेस तुमच्या समोर आहेत असा विचार करा.
आता सुरी चालवा.
हे करणं तुमच्या डॉक्टरांसाठीही कठीण असतं. सहवेदना, वेदना, संवेदना.. सगळंच गिळायला शिकावं लागतं. इट्स नॉट इझी यू नो Sad
.. "धर्माच्या पगड्याखाली" बद्दल सहमत.
यामुळेच मी नास्तीक अन निधर्मी झालोय कदाचित.

इब्लिस:
तुमची पोस्ट नाही कळली. पण असो. पण मी डॉक्टर असते ना तर माझा धर्म काही असो, वा माझे व्ययक्तिक मत, विचार काही असोत. समोर तडफडत असलेल्या बाळंतिणिला वाचवायची मी शर्थ केली असती आणि मग खुशाल कायद्याला सामोरी गेले असते. अमेरिकेत खूप खूप हुश्शार वकील आहेत जे मला कायद्याच्या कचाट्यातून अलगद बाहेर काढतील Happy

इब्लिस व सती तुम्ही बाहेर म्हणजे भारत बाहेर प्रकटीस केली आहे का? नसेल तर जरूर कोणाकडून इथल्या पद्धती तपासा. युके मध्ये प्रचंड वेळ लागतो कुठल्या गोष्टींना. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी आह्माला सांगितले कि जर पाणी सुटले नसेल तर इकडे अजिबात आणू नका. २-३ तासात काही झाले नाही तर घरी पाठवू. शेवटी माझ्या सासुबाई जाम भडकल्या आणि फोने वर शिव्या घातल्या तेंव्हा या म्हणाले. रात्री १० वाजता गाडीतच बाल बाहेर आले होते. शेवटी कसे बसे त्या वाहन चालकानेच हॉस्पिटल मधल्यांना जागे केले. बाहेरचे शटर बंद. इकडे आमचा जीव टांगणीला. आत गेल्यावर सगळ्या मिडवाईफ्स. त्यामुळे आपल्याकडे असे होते आणि इकडे असे कसे झाले ह्यावर चर्चा करण्यात अर्थ नाहीये. माझा असा अनुभव तर दुसऱ्या एका मित्राला अतिशय उत्तम सेवा मिळाली. त्यामुळे असा अनुभव सगळ्यांनाच येतो असेही नाही. पण बाल गाडीत होणे वगैरे अश्या घटना इथे बऱ्याच होतात.

असो माझा आत्ता एकाच दात नीट करायला लेकाच्यांनी ३ महिने घेतलेत. असो.

चैतन्य ईन्या,
इथेच माबोवर इतर कुठेतरी मी अमेरिकन आरोग्य सेवेबद्दल 'दयनिय परिस्थिती' आहे असे म्हटलो. तीच परिस्थिती इंग्लंडातही आहे, किंबहुना जिथे जिथे इन्श्युरन्सवाल्यांनी 'मेडिकल इंडस्ट्री' 'टेकोव्हर' केली आहे तिथे तिथे. (माझी किती 'शिलगते' (शब्द कदाचित फार जड असेल इथे, पण apt आहे.) ते पाहून, ते तुम्हाला ठाऊक नाहिये. असो.)
डेंटिस्ट हा वेगळाच 'इशय' आहे...

(संपादन)
माझा असा अनुभव तर दुसऱ्या एका मित्राला अतिशय उत्तम सेवा मिळाली.<<
त्यांचे व तुमचे 'प्याकेज' तुलना करून पाहिलेत का? Wink मेडिकलचा प्ल्यान कोन्ता आहे त्यान्चा?
(/संपादन)

चैतन्य, अगदी बरोबर. म्हणूनच अँटिबायोटिक्सचा अपूरा वापर हे कारण असावं असं वाटतंय.
भारताबहेर जाऊन आलेल्या कित्तेक पेशंटसनी इथलि भारतातलीच सििस्टीम बरी असं आवर्जुन साम्गितलंय.
असो. तो इथला विषय नाही.
कल्पु, मी अगोदरच लिहिलंय की मातेच्या जीवापेक्षा कोणताच इश्यु महत्त्वाचा असू नये.
मात्र या केसमध्ये हा अ‍ॅबाऑर्शनच्या लिगलतेचा धार्मिक इश्यु चुकीच्या पद्धतीने एनकॅश होतोय असे वाटते.

साती, कारण काही असो... पण जर सविताच्या नवर्‍याला "ते' उत्तर दिले गेले असेल तर ते तसले 'उत्तर' चूकच ना? मग त्याचा बोलाबाला होणारच.

इकडे नौश्नाल इन्श्युरन्स असतो. अमेरिके सारखा प्रायवेट घेता येतो पण तो काहीच्या काही महाग आहे. मुख्य फरक लोकवस्ती मुले पडतो. जिकडे जास्त लोकसंख्या तितका वेळ जास्त किंबहुना संपूर्ण मेडिकल पद्धती विचित्रच आहे. सगळी नोकर्स्हीन्च्या हातात आहे. असो. ह्या बाफचा हा विषय नाही. पण मला वाटते आयर्लंड मध्ये हे असेच घडले असेल. एकदा का चूक झाली कि सगळे हॉस्पिटल त्यावर पांघरून घालायला उठते. त्यामुळे उलट सुलत भरपूर बातम्या येणार. जोपर्यंत १-२ गोरे मरत नाहीत तोपर्यंत फार काही होएईल असे वाटत नाही. शेवटी आपण उपरेच असतो.

>>इकडे अजिबात आणू नका. २-३ तासात काही झाले नाही तर घरी पाठवू.
इंग्लंडात बाळंतिणीला नक्की केव्हा दवाखान्यात न्यायचे याचे एकदम व्यवस्थित संकेत आहेत.
पाणी हा त्यातला महत्त्वाचा संकेत नाही. तर किती मिनिटात किती कळा येत आहेत हा आहे.

मुख्यत्वे, जर काही गुंतागुंत नसेल तर, दवाखान्यात न जाता घरीच प्रसूत होणे किंवा प्रसूतीगृहात - जिथे फक्त सुइणी असतात - तिथे जाणे श्रेयस्कर समजले जाते. कारण इथल्या संख्याशास्त्रीय संशोधनानुसार घरी किंवा प्रसूतीगृहात प्रसूत होणार्‍या बायांना एकूण कमी वेळात आणि कमी वेदनेत मोकळे होता येते.
दवाखान्याच्या (आजारपणाशी संबंधित) प्रतिमेमुळे नकळत मनावर टेन्शन येऊन प्रसूती लांबते असे सिद्ध झाले आहे. नुकतेच या विषयावरचा एक पेपर वाचल्याने हे लिहीत आहे. असो.

सविताची घटना खरोखर दुर्दैवी. तिच्या परिस्थितीचा विचार करून अस्वस्थ वाटते आहे अजूनही. नक्की कुठे काय चुकले हे समजेलच. तरी प्रोचॉइस मंडळी याचा उपयोग गर्भपाताबद्दल जनजागृती करायला करून घेत असतील तर माझा त्यांना पाठिंबा असेल.

मुख्यत्वे, जर काही गुंतागुंत नसेल तर, दवाखान्यात न जाता घरीच प्रसूत होणे किंवा प्रसूतीगृहात - जिथे फक्त सुइणी असतात - तिथे जाणे श्रेयस्कर समजले जाते. कारण इथल्या संख्याशास्त्रीय संशोधनानुसार घरी किंवा प्रसूतीगृहात प्रसूत होणार्‍या बायांना एकूण कमी वेळात आणि कमी वेदनेत मोकळे होता येते.
दवाखान्याच्या (आजारपणाशी संबंधित) प्रतिमेमुळे नकळत मनावर टेन्शन येऊन प्रसूती लांबते असे सिद्ध झाले आहे. नुकतेच या विषयावरचा एक पेपर वाचल्याने हे लिहीत आहे. असो.>>>
तुमचा मुद्दा योग्य आहे पण सब घोडे बारा टक्के ह्याप्रमाणे होते. मुळात पेशंटला पाहिल्याशिवाय कसे ठरविणार? मग अश्या घटना घडतात. पण फरक नक्कीच आहे की इकडे उगाचच आपल्याकडे जसे सर्रास सीझर बघायला मिळतात तसे दिसत नाही. हल्ली तर मुहूर्तावर बाळ जन्मवे म्हणून लोक डॉक्टराना सीझर करायला सांगतात आणि काही वेळेला डॉक्टर पण विचारतात. हे भन्नाट आहे. इतके होवून असे दिवटे पुढे कसे असतील काय माहिती.

तरी प्रोचॉइस मंडळी याचा उपयोग गर्भपाताबद्दल जनजागृती करायला करून घेत असतील तर माझा त्यांना पाठिंबा असेल. <<<
+१००

तरी प्रोचॉइस मंडळी याचा उपयोग गर्भपाताबद्दल जनजागृती करायला करून घेत असतील तर माझा त्यांना पाठिंबा असेल.

बाकिच्या जगात "pro-life" आणि "pro-choice" ही लेबल कुठ्ल्या अर्थाने वापरली जातात हे माहीत नाही परंतु आमच्या इथे प्रो-चॉइस हे लेबल 'गर्भपात करावा का नाही ही निवड करायचा हक्क आईलाच आहे" ह्या मताचा पुरस्कार करणार्‍यांना लावल जात. Not necessarily की ते गर्भपाताचा सरसकट पुरस्कार वा त्याबद्दल जन्-जागृती करणारे असतील. त्यांची चळवळ ही आईला पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल असते आणि तो पर्याय (chioce) निवडणे हा आईचा हक्क असला पाहिजे म्हणून या चळवळीला प्रो-चॉईस म्हणतात. Right to choose an option. One of the option could be an abortion but not always necessary.

अमेरिकेत राहणार्‍या बर्‍याच स्त्रिया सरसकट गर्भपाताला फारशी अनुकुलता दाखवत नाहीत. कुटुंब्-नियोजनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना गर्भ उखडून टाकायच हे बर्‍याच स्त्रियांच्या हळव्या मनाला पटत नाही. मात्र कारण काही का असेना, गर्भपाताचा चॉईस जर आईने निवडला तर safe abortion चा पर्याय तिला मिळायलाच हवा अश्या भावनेने मदत (donations) , पाठिंबा (Votes) देतात.

धन्यवाद. तुम्ही सांगितला नसता तर प्रो चॉइसचा अर्थ कसा कळला असता... आम्ही आपले माहिती नसताना उगाचच शब्द वापरत होतो.

"सविता" निमित्ताने गर्भ आणि गर्भपात या संदर्भातील कायद्याच्या कक्षेतील तसेच वैचारिक पातळीवरील जी चर्चा इथे खुलत आहे तिच्यामुळे अशा बाबतीतील ज्ञानात नक्कीच भर पडत आहे. वरील कल्पु यांचा सविस्तर व्याख्येचा प्रतिसाद वाचल्यावर लक्षात येते की चळवळीसाठी वापरल्या जात असलेल्या संज्ञामध्ये किती खोलवरचा अर्थ भरलेला असतो.

"प्रो-लाईफ" तर उघडउघड "गर्भपात" संकल्पनेला विरोध करणारी चळवळ असून तिला पाठिंबा देणार्‍यांची संख्या युरोप अमेरिकेतच नव्हे तर जपान सारख्या देशातही लक्षणीय आहे.

चीनमध्ये खुद्द सरकारने "प्रो-अ‍ॅबॉर्शन" पद्धत स्वीकारली आहे. इथे 'एक कुटुंब एक अपत्य' अशी पॉलिसी असल्याने कोणत्याही कारणाने स्त्री दुसर्‍या खेपेस गर्भवती राहिल्यास ती साहजिकच 'प्रो-अ‍ॅबॉर्शन'....[तसेच 'नो-चॉईस'] गटात येते आणि येऊ घातलेल्या अपत्यास जर समाज आणि शासनच स्वीकारण्यास तयार नसेल तर त्या स्त्रीपुढे गर्भपाताशिवाय अन्य विकल्प नाही. [चीनमधील या संदर्भातील कायदे खूप कडक वाटू शकतात आपल्याला....पण तो विषय इथे सविस्तरपणे चर्चेला घेणे म्हणजे विषयांतर होईल.]

एखादी स्त्री 'प्रथम' माता बनली असेल आणि तिच्या दुर्दैवाने ते बाळ जन्मजात डीफॉर्म्ड अवस्थेत असेल [ज्याला मेडिकल टर्म्समध्ये Birth Defects वा Genetic Disease असेही म्हटले जाते].....वा बलात्कार प्रकरणामुळे गर्भ राहिला असेल....इ.इ.... तरीही त्या अवस्थेतील बाळ नष्ट करण्याचा अधिकार 'नो-चॉईस' संकल्पनेत तिथे आणला गेला आहे. अशा प्रकरणी आई तसेच कायदेशीर वडील यांची संमती/नासंमती विचारात घेतली जात नाही....'नो चॉईस' तरतुदीअंतर्गत मातेचा अपत्याबाबतीतील अधिकार काढून घेतला गेला आहे.

[अर्थात विविध देशातील अशा संदर्भातील तरतुदी बर्‍या की वाईट यावर भारतीय मनोभूमिकेतून चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो. युरोप अमेरिकेत निदान अशा बाबतीत काही संघटना बाजूने वा विरोधात चळवळी तरी करू शकतात. जगातील अन्य कित्येक देशातील जनतेला तोही अधिकार नाही.]

अशोक पाटील

कुटुंब्-नियोजनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना गर्भ उखडून टाकायच हे बर्‍याच स्त्रियांच्या हळव्या मनाला पटत नाही. >>> हे वाक्य डोक्यावरून गेले. असे असेल तर अमेरिकेमधे सर्वसाधारणपणे स्त्रियांचाच गर्भपाताला विरोध आहे असे समजावे का? की माझा निष्कर्ष चुकतोय.?

गर्भपाताची वेळ ही असुरक्षित शरीरसंबंध याशिवाय बलात्कार, कुटुंब नियोजनाची साधने फेल होणे या कारणांमुळे येऊ शकते. अशा वेळेला अमेरिकेतल्या हळव्या स्त्रिया काय विचार करतात?

कुटुंब्-नियोजनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना गर्भ उखडून टाकायच हे बर्‍याच स्त्रियांच्या हळव्या मनाला पटत नाही. >>> हे वाक्य डोक्यावरून गेले. असे असेल तर अमेरिकेमधे सर्वसाधारणपणे स्त्रियांचाच गर्भपाताला विरोध आहे असे समजावे का? की माझा निष्कर्ष चुकतोय.?

चांगल डोक्यात गेलय की. बरोबर निष्कर्ष! आणि तुम्ही "सर्वसाधारपणे" हा जो शब्द टाकला आहेत त्याला खूप महत्व आहे.

गर्भपाताची वेळ ही असुरक्षित शरीरसंबंध याशिवाय बलात्कार, कुटुंब नियोजनाची साधने फेल होणे या कारणांमुळे येऊ शकते. अशा वेळेला अमेरिकेतल्या हळव्या स्त्रिया काय विचार करतात?

इथे आता pro-choice/pro-life विचारसरणीतल फरक द्यायचा मी प्रयत्न करते. pro-life विचारसरणी असलेल्या बायका/पुरुष (टिपिकली कॅथलिक वा तत्सम धार्मिक विचारांचा पगडा असणार्‍या) are always anti-abortion. कारण काहीही असो...गरोदर आईने गर्भाला वाढवून जन्म दिलाच पाहिजे. आईचा जीव धोक्यात असला तरी. बलात्कारानंतर बाळाला जन्म देउन वाढवणार्‍या/वा दत्तक देणार्‍या बायकांची उदाहरण talk show वरती अधून्-मधून येत असतात.

अमेरिकेत न राहणार्‍या लोकांचा एक गैरसमज असा होउ शकतो की pro-choice individuals are pro-abortion जे अजिबात खर नाही. ह्या विचारसरणीचे बायका/पुरुष, गर्भ वाढ्वायचा का पाडायचा हा निर्णय आईनेच घेतला पाहिजे असा आग्रह धरणारे असतात. त्यांना धर्म वा सरकारची ढ्वळाढवळ/influence आवडत नाही.

>>अमेरिकेत न राहणार्‍या लोकांचा एक गैरसमज असा होउ शकतो की pro-choice individuals are pro-abortion जे अजिबात खर नाही. ह्या विचारसरणीचे बायका/पुरुष, गर्भ वाढ्वायचा का पाडायचा हा निर्णय आईनेच घेतला पाहिजे असा आग्रह धरणारे असतात. त्यांना धर्म वा सरकारची ढ्वळाढवळ/influence आवडत नाही.>> +१

मी प्रोचॉइस आहे आणि सरसकट गर्भपाताचा मी कधीच पुरस्कार केला नाहिये. मात्र गर्भधारणा होऊ द्यायची की नाही, झाल्यास मूल जन्माला घालायचे नी स्वतः वाढवायचे/ अ‍ॅडॉप्शनचा पर्याय स्विकारायचा की गर्भपाताचा हा हक्क स्त्रीला असलाच पाहिजे. उद्या एखाद्या स्त्रीच्या घरचे जर का तिच्या मनाविरुद्ध तिला गर्भपातासाठी फोर्स करत असतील तर त्यालाही माझा विरोधच असेल. माझ्यासाठी प्रोचॉइस हे केवळ अ‍ॅबॉर्शन पुरते मर्यादित नाही तर एकंदरीतच स्त्रीची सेक्शुअल आणि रिप्रॉडक्टिव हेल्थ यात समाविष्ट होते. प्रोलाइफ वाले कॉन्ट्रासेप्टिव्जबद्दल 'मर्डर बिफोर द कन्सेप्शन' अशी टोकाची भाषा वापरतात, एच पी व्ही वॅक्सिनला विरोध करतात, इतकेच नाही तर अल्प उत्पन्न गटातील स्त्रीयांना मॅमोग्रॅमची सुवीधा देणार्‍या प्लॅन्ड पॅरेंटहुड या संस्थेचे फंडिंग बंद व्हावे म्हणून प्रयत्न करतात तेव्हा माणूस म्हणून असलेल्या मुलभूत हक्कावरच गदा येते.

कॅथलिक लॉ अ‍ॅबॉर्शन बद्दल थोडे बदलले आहेत ना.... फक्त सनातनी कॅथलिक लोकं अजूनही विरोध करतात असेच मी वाचले व बघितले आहे.

मला प्रो-लाईफ आणि प्रो-चॉइस या दोन्ही विचारसरणीबद्दल पुरेशी माहिती आहे, धन्यवाद. अमेरिकाच नव्हे तर जगातील इतर ठिकाणीदेखील ही लेबल्स कशासाठी वापरतात हे माहित आहे.

चांगल डोक्यात गेलय की. बरोबर निष्कर्ष! आणि तुम्ही "सर्वसाधारपणे" हा जो शब्द टाकला आहेत त्याला खूप महत्व आहे. >> नक्की काय महत्त्व आहे? सर्वसाधारणपणे म्हणजे जनरलाईज्ड विधान या अर्थाने की अ‍ॅव्हरेज वूमेन या अर्थाने?

तुमच्या पहिल्या पोस्टवरती माझा प्रश्न असा आहे की अमेरिकेमधे सर्वसाधारणपणे स्त्रियांचा च गर्भपाताला विरोध आहे का? दुसर्‍या शब्दांत विचारायचे झाले तर अमेरिकेतल्या सर्वसाधारण स्त्रिया प्रो-लाईफ विचारसरणीच्या आहेत का?

तुमच्या या अमेरिकेत राहणार्‍या बर्‍याच स्त्रिया सरसकट गर्भपाताला फारशी अनुकुलता दाखवत नाहीत. कुटुंब्-नियोजनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना गर्भ उखडून टाकायच हे बर्‍याच स्त्रियांच्या हळव्या मनाला पटत नाही. वाक्यावरून मला पडलेला प्रश्न आहे.

चांगल डोक्यात गेलय की. बरोबर निष्कर्ष! आणि तुम्ही "सर्वसाधारपणे" हा जो शब्द टाकला आहेत त्याला खूप महत्व आहे. >> नक्की काय महत्त्व आहे? सर्वसाधारणपणे म्हणजे जनरलाईज्ड विधान या अर्थाने की अ‍ॅव्हरेज वूमेन या अर्थाने? Average woman या अर्थाने.

तुमच्या पहिल्या पोस्टवरती माझा प्रश्न असा आहे की अमेरिकेमधे सर्वसाधारणपणे स्त्रियांचा च गर्भपाताला विरोध आहे का? दुसर्‍या शब्दांत विचारायचे झाले तर अमेरिकेतल्या सर्वसाधारण स्त्रिया प्रो-लाईफ विचारसरणीच्या आहेत का?
आकड्यांच्या भाषेतच बोलायच तर larger % of women are pro-choice. त्याचप्रमाणे थोडे डावीकडे झुकणारे वा liberal हे लेबल लावणारे पुरुष सुद्धा प्रो-चॉईस असतात. But again pro-choice has nothing to do with stance on abortion.

Pages