मुंबै

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

Gateway of India

- - - - - - - - - -

विषय: 
प्रकार: 

आंबा , फोटो मोबाईलनी काढल्याने होरायझन तीरकं झालयं बाकी प्रमाण बरोबर आहे

क्या बात है! आकाश आणि पाणी सुंदर. पण मला पाठमोरी ती आणि बसलेला तो-दोन्ही लईच आवडले. ग्रेट ऑब्झर्वेशन्..अमेझिंग डीटेल्स!

मस्तच. प्रकाश फार सुरेख वाटतोय.
होरायझन तीरकं झालयं>> चित्रात सरळ करता आलं असतं ना.
रच्याकने कुठून काढला आहे हा फोटो?

सावली, चित्राच्या फोटोत तीरक झालय चित्रात बरोबर आहे, फोटो एडिटर मधे सरळ करता आले असते
ओरिजिनल फोटो माझा नहिये, पण फोटोग्राफर च्या परवानगीने रेफरंस वापरलाय, तो फोटो ताज पॅलेसच्या रुम मधुन घेतलाय.

तेच सांगायला आलो होतो. की कुठून घेतला आहे फटू.
तुम्ही म्हणता म्हणून फोटोवरून काढलंत म्हणू. पण फटूपेक्षा डायरेक्ट पाहून तुम्ही जास्त सुंदर काढलं असतं असे वाटते.

त्या ताजच्या नव्या बिल्डींग मधे माझ्या एका जुन्या ऑर्गनायझेशनचे ऑफिस होते त्यामुळे गेट्वेचा टॉप व्ह्यु चांगलाच डोक्यात आहे पण जुन्या ताज मधे कधी वर पर्यंत गेलो नाहि त्यामुळे दुसर्‍यांच्या फोटोवर अवलंबुन राहयला लागले.

छान.. Happy

मुंबईचे हे काढलेले चित्र पाहून बा. सी. मर्ढेकरांची कविता समोर आली!!!!

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

पाटील, सुंदर चित्राकरता धन्यवाद.

बी, सुंदर कवितेकरता धन्यवाद

बाकिच्यांना उगाचच धन्यवाद Happy

पाटील, हे सुंदर आहेच, पण तूम्ही थेट काढता, ते जास्त सुंदर असते.
आमची मुंबई, तूमच्या कुंचल्यातून फारच सुंदर उतरते.

पाटील, हे चित्र सुंदरच आहे. तुम्ही कधी फेरी व्हार्फचे चित्र काढले आहे का? मीमध्यंतरी कुठेतरी प्रदर्शनामधे फेरी व्हार्फचे एक चित्र पाहिले होते. मनामधे घर करून बसले आहे ते चित्र.

नंदिनी , वर्सोवा -मढ फेरीचे चित्र केलेय मी पण ते विकले गेलेय, जर फोटो असेल त्या चित्राचा तर टाकेन नंतर.

हे फेरी व्हार्फचे चित्र तेव्हा विक्रीसाठी नव्हते. (असतं तरी मला घ्यायला परवडलं असतं की नाही माहित नाही :फिदी:) तसं मला चित्रातलं ओ की ठो समजत नाही. पण ते चित्र खूप म्हणजे खूप आवडलं होतं. तुमच्या या वरच्या चित्राने मला फेरी व्हार्फचं ते चित्र आठवलं.

वर्सोवामढच्या चित्राचा फोटोदेखील अवश्य टाका इथे प्लीज.

Pages