डोह

Submitted by उमेश वैद्य on 13 November, 2012 - 03:44

डोह

दिवाळीच्या अंगी काळी चंद्रकळा
जरतारी उजाळा अंगभर
नेसुनी निघाली यमुनेच्या जळी
डोईवर काळी मोकळी घागर

बुडता घागर बुडबुडे येती
त्याच्या लक्ष ज्योति जळामाजी
घागरीत पाही भरला प्रकाश
मग सावकाश विसावली

घागर वाहून गेलीया पाण्यात
बाहेर का आत पाणीच पाणी
उम्या म्हणे ऐसा खोल हा डोह
येता ना बायांनो पाणीयासी

उ.म. वैद्य.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्ला सी क !!!!

यास काय म्हणतात नाही माहीत पण ढोलकीवर थाप पडते अन शाहीर गायला सुरुवात करतो
त्यास काय म्हणतात ? तमाशात हा प्रकार असतो वग की गण काय म्हणतात का ?
असो जे असेल ते असो
क्लासिक जमलीय रचना
लाख लाख अभिनन्दन

तुमच्याकडून खूप काही शिकयला आवडेल लावणी या प्रकारात
धन्यवाद उमेशजी