आता खरी कळाली गोडी मला फळांची!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 November, 2012 - 00:43

गझल
आता खरी कळाली गोडी मला फळांची!
आयुष्य आज वाटे परडी जणू फुलांची!!

येते झुळूक जेव्हा जेव्हा तुझ्या स्मृतींची;
माझ्या उरात होते बरसात चांदण्यांची!

आलेख जिंदगीचा माझ्या कसा चितारू?
माझ्या समोर आहे यादी जणू चुकांची!

सुखही दिपून गेले, पाहून दु:ख त्यांचे....
इतकी झकास होती आरास आसवांची!

तू भीडभाड आता ठेवू नकोस माझी;
आली मला शिसारी माझ्याच कौतुकांची!

करशील तूच तुजला घायाळ बोलण्याने....
काढू नकोस खपली इतक्यात वेदनांची!

कल्लोळ शांततेचा घुमतो दहा दिशांना!
शहरात माणसांच्या गर्दी कलेवरांची!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येते झुळूक जेव्हा जेव्हा तुझ्या स्मृतींची;
आली मला शिसारी माझ्याच कौतुकांची!
कल्लोळ शांततेचा घुमतो दहा दिशांना!....हे मिसरे खूप आवडले..

सुखही दिपून गेले, पाहून दु:ख त्यांचे....
इतकी झकास होती आरास आसवांची! <<<< व्वा ! >>>>