वेरुळ आणी अजीन्ठा बद्दल माहीती हवी आहे

Submitted by तनुदि on 10 November, 2012 - 08:49

राहण्याचे ठीकाण , चान्गले hotels etc.
फक्त स्त्रीया जाणार आहेत म्हणुन थोड व्यवसथित hotel हव.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही ठिकाणे औरंगाबाद वरुन जवळ आहे, त्यामुळे मुक्काम औरंगाबादला करु शकता, हॉटेल खुप आहेत. अगदी जालना रोडला म्ह्टले तर, लेमन ट्री , अमरप्रित, रामा इंटर्नॅशनल, ई.

अहो तनुदी किती ठिकाणी धागे बुनताय? आधी जिथे उघडलेत तिथे बघा की जरा किती प्रतीसाद मिळालेत ते.:फिदी:

दर सोमवारी लेणी मेंटेनन्स साठी बंद असतात. अजिंठाला MTDC चे एक हॉटेल आहे. पण खुपच गर्दी असते. अजिंठाला ४ किमी आधी आपल्या प्रायव्हेट गाड्या जाउ शकतात. त्यानंतर फक्त MTDC च्याच बसेस जातात. जाताना पाणी सोबत घेणे गरजेचे कारण MTDC चे हॉटेल खाली आहे व टेकडी चढल्यानंतर काहीही सोय नाही. लहान मुले बरोबर असतील तर खायला नेणे आवश्यक. ३-४ तास तर फिरण्यातच जातात. फिरुन झाले कि भराभर खाली उतरणे उत्तम , कारण फिरुन खुप भुक लागते आणि खाली एकच हॉटेल असल्याने तुफान गर्दी असते. प्रायव्हेट गाईड करायची गरज नाही अजिंठाला वर पोहोचल्यानंतर MTDC चे कर्मचारी सुद्धा गाईडचे काम करतात. बार्गेनींग करा. आम्ही तर एका कुटुंबाने गाईड केला होता त्यांच्या बरोबरच फिरलो. माणसे ओळखीची नव्हती पण त्यांनी आम्हाल त्यांच्यात सामील केले मग आम्हीही काही ठिकाणी त्यांना आमच्यात सामील करुन घेतले. अजिंठाला कॅमेरा किंवा मोबाईल नेताना विदाउट flash वाला नेणे. एल्लोराला शॉपिंग करताना ५०० चे ५०-१०० रु. पर्यंत बार्गेनींग करणे. खुप फसवणुक होते. आम्ही औरंगाबादला पंचवती हॉटेल मध्ये राहीलो होतो. आणि हॉटेलचीच गाडी केली होती. सोईस्कर होती.