गझल
पावले ऋतूंची मीही पाहणे जरूरी होते!
मी बरोबरीने त्यांच्या चालणे जरूरी होते!!
यायला निघाला होता मधुमास घरी माझ्याही....
मी घरात त्या वेळेला थांबणे जरूरी होते!
तो वहात गेला नुसता, वा-याने नेले तिकडे.....
समजले न त्या मेघाला बरसणे जरूरी होते!
एकेक रंध्र दरवळले, मोहरली काया सारी;
मी मनोगते स्पर्शांची समजणे जरूरी होते!
धावणे दूर, पण साधे चालता मला ना आले;
मी अंगरखा स्वप्नांचा दुमडणे जरूरी होते!
त्यामुळेच त्यांच्या गझला वाटल्या कागदी मजला;
शब्दांत गंध आत्म्याचा मिसळणे जरूरी होते!
केवढा गारठा आहे या हवेत वार्धक्याच्या;
मी ऊब तुझ्या स्मरणांची मुरवणे जरूरी होते!
वाटते सुधाही आता जळजळीत का हृदयाला?
कालचा विषाचा पेला विसळणे जरूरी होते!
...........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
केवढा गारठा आहे या हवेत
केवढा गारठा आहे या हवेत वार्धक्याच्या;
मी ऊब तुझ्या स्मरणांची मुरवणे जरूरी होते!
वाटते सुधाही आता जळजळीत का हृदयाला?
कालचा विषाचा पेला विसळणे जरूरी होते!
व्वा!!
तो वहात गेला नुसता, वा-याने नेले तिकडे.....
समजले न त्या मेघाला बरसणे जरूरी होते!
व्वा!!
बाकीचेही शेर आवडले.
वाह अप्रतिम, सर्वच शेर एकाहून
वाह अप्रतिम, सर्वच शेर एकाहून एक सरस !!!
धन्यवाद महेश, धन्यवाद जोशीजी,
धन्यवाद महेश, धन्यवाद जोशीजी, आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
सर, गझल आवडली
सर, गझल आवडली
धन्यवाद, अरविंदराव!
धन्यवाद, अरविंदराव!
गझल आवडली
गझल आवडली
आमचे नाव वाचूनही गझल वाचलीस?
आमचे नाव वाचूनही गझल वाचलीस? कमाल आहे बुवा!
तो वहात गेला नुसता, वा-याने
तो वहात गेला नुसता, वा-याने नेले तिकडे.....
समजले न त्या मेघाला बरसणे जरूरी होते!>>>>>>>छानच .
गझल आवडली.
वाह
वाह
गझल फारच आवडली, सर. सर्वच
गझल फारच आवडली, सर. सर्वच ख्याल अप्रतिम!
छान. शेवट्चा शेर तर अप्रतिमच.
छान. शेवट्चा शेर तर अप्रतिमच.
धन्यवाद मुंगेरीलालजी!
धन्यवाद मुंगेरीलालजी!
धन्यवाद कमलाकरराव!
धन्यवाद कमलाकरराव!