Submitted by कमलाकर देसले on 9 November, 2012 - 06:50
नमस्काराय ..
सुखाची दु:ख ही माय;
दुधावरची जणू साय ..
पळाया सांगतो, मस्त ;
कुणाचे तोडुनी पाय ..
दुधाने पोसला.आणि ;
कसायाला दिली गाय ..
झुकावे रोज हे शीर ;
कुठे गेले असे पाय ?
कुणी सांगेल का ,फक्त ;
चितेच्याही पुढे काय ?
धरेने मारता हाक ;
बरसते तेच आभाय ..
तुझी सत्ता खरी एक ;
नमस्काराय कालाय ..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुधाने पोसला.आणि ; कसायाला
दुधाने पोसला.आणि ;
कसायाला दिली गाय ..
छान!! उद्बोधक!!
अनेक खयाल आवडले, काही ठिकाणी
अनेक खयाल आवडले, काही ठिकाणी अडखळलो.
सुखाची दु:ख ही माय .<< वा
जवळपास सगळेच खयाल आवडले.
मतल्याबाबत - दुधाची जणू साय म्हंटल्यावर सुखाची दु:ख ही माय ही ओळ वेगळा क्रम घेऊन येते. दुधावरची जणू की साय असे असते तर पहिल्या ओळीत सुखाचे वर्णन आले असते (जे दु:खाचे आल्यासारखे झाले आहे)
छान आहे
छान आहे
नमस्कार
नमस्कार
मजा आली कफिये-खयाल जोडी एकदम
मजा आली कफिये-खयाल जोडी एकदम परफेक्ट जमलीये प्रत्येक शेरात (एकजीव / एकात्म )
मस्त ...फक्त ....आणि या तीन शब्दात मात्रा गडबडताय्त असे वाटते आहे ; बहुधा मला लयीत वाचायला जमले नसावे
भूषणजी /वैभवजी 1)आपले
भूषणजी /वैभवजी
1)आपले निरीक्षण आणि आपले मत मी मन:पूर्वक समजून घेतो. आपण स्पष्ट मत व्यक्त करतात ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते . कधी कधी लेखनाच्या आवेगात अनावधानाने काही चुका होऊ शकतात . खरं तर त्याही व्हायला नकोच . आपल्या म्हणण्यातला भाव मी समजू शकतो.अर्थ स्पष्टतेसाठी मतल्यातल्या वरच्या ओळीत छोटासा बदल करतोय .
2)>>>>> "काही ठिकाणी अडखळलो" असे आपण म्हटले आहे .वैभवजींचही काहीसं असच म्हणणं आहे . पहिल्या वाचनात असं होऊ शकतं . मी वृत्त निर्दोष पाळले आहे असे मला वाटते . ल गा गा गा ,ल गा गा ल असा लगक्रम आहे . तो प्रत्येक ओळीत सांभाळला आहे.>>>>" मस्त...फक्त... आणि या तीन शब्दात मात्रा गडबडताय्त असे वाटते आहे ;">>> असे वैभवजींनाही वाटते . जोडाक्षराच्या आधीचे -ह्स्व अक्षर आघातामुळे दीर्घ (गुरु)होते . त्यामुळे मस्त ,फक्त यांचे लघुगुरू गा ल असे बरोबर येतात . आणि चा लागक्रम तर गा ल आहेच .
3)या गझलेत अकारांत काफिया येत असल्यामुळे पुढील प्रत्येक द्विपदीतल्या पहिल्या ओळीतही आकारांतचा जाचक नियम पाळावा लागला . "ओळीतले शेवटचे अक्षर -ह्स्व असले तरी ते दीर्घ समजण्यात यावे असाही एक नियम वाचला आहे . त्याचा आधार घेऊन अतिशय स्वाभाविकपणे मतल्याच्या खालच्या प्रत्येक द्विपदीतल्या आधीच्या ओळीत शेवटचे अक्षर स्वाभाविकपणे दीर्घ येत होते . जसे की,
पळाया सांगतो कारे !
कुणाचे तोडुनी पाय .. किंवा
झुकावे शीर विनयाने ;
कुठे गेले असे पाय ..
पण ,पुन्हा अकारांताचा नियम भंग झाला अशी चर्चा सुरू झाली असती .म्हणून अकारांत कटाक्षाने पाळला .असो .मन:पूर्वक आभारी आहे .
जोशी साहेब ,हर्षल , अरविन्दजी आपलेही आभार .
मतल्यातल्या बदलाविषयी प्लीज
मतल्यातल्या बदलाविषयी प्लीज ...
सुखाची दु:ख ही माय; दुधावरची
सुखाची दु:ख ही माय;
दुधावरची जणू साय ..
पळाया सांगतो, मस्त ;
कुणाचे तोडुनी पाय ..
दुधाने पोसला.आणि ;
कसायाला दिली गाय ..
झुकावे रोज हे शीर ;
कुठे गेले असे पाय ?
कुणी सांगेल का ,फक्त ;
चितेच्याही पुढे काय ?
सुंदर!
छोट्या वृत्तातील रचना आवडली कमलाकरराव!
प्रा.सतीश देवपूरकर
कुणी सांगेल का ,फक्त
कुणी सांगेल का ,फक्त ;
चितेच्याही पुढे काय ?
ह्या शेरावरून 'मीर' चा एक अप्रतिम शेर आठवला तो देत आहे,
मर्ग इक मांदगी का वक्फा़ है
यानी आगे चलेंगे दम लेकर
-------
धन्यवाद!
देवपूरकर सर ,धन्यवाद विजयजी ,
देवपूरकर सर ,धन्यवाद
विजयजी , मीरचा शेर खूप वजनदार आहे . आभारी आहे .
सुंदर !
सुंदर !
मस्तच.
मस्तच.
कुणी सांगेल का ,फक्त
कुणी सांगेल का ,फक्त ;
चितेच्याही पुढे काय ?
तुझी सत्ता खरी एक ;
नमस्काराय कालाय
हे दोन फार सुंदर. बाकी शेरही छान.