दाटते आहे निराशा फार हल्ली....(हजल-तरही) :-)

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 November, 2012 - 11:11

बंद केले मी मुखाचे द्वार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

चापते अन लोळते वाटेल तेव्हा
विसरते मी दिवस-महिने-वार हल्ली !

लोळण्याची पैज होते भटकण्याशी
द्वाड झाले सांगण्याच्या पार हल्ली

खर्चली मी तू दिलेली कॅश सगळी
पर्स माझी भरजरी-जरतार हल्ली

सदगुणांचे मोल कवडीमोल झाले
शोधती नवराच तालेवार हल्ली

जीवना रे राख थोडी बूज माझी
बघ टिकेचा चालला भडिमार हल्ली

रंग-रुपाला वयाची चाड नाही
शुभ्र कवळी, केस काळेशार हल्ली

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रचना हझल म्हणून ठीकठाक आहे
मीही असा प्रयत्न केला होता एकदा पण शायराला स्वतःच्या गझलेचेच असे विडम्बन का करावे वाटते हे आजही मला आजही समजलेले नाही Sad
http://www.maayboli.com/node/36421
http://www.maayboli.com/node/36419

>>>
शायराला स्वतःच्या गझलेचेच असे विडम्बन का करावे वाटते <<<

खरेतर, त्यासाठी मनही साफ असावे लागते.

आणखी एक...
समजा दुसर्‍यानेच विडंबन केले तर..? त्यापेक्षा..... Happy

Lol