मना सज्जना...

Submitted by चिखलु on 7 November, 2012 - 10:41

मना सज्जना गप्पा मारत जावे
तरी गगो पाविजेतो स्वभावे
जनी निंद ते सर्व सोडूनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे || १ ||

प्रभाते गगोवर सुप्र करीत जावा
पुढे दुपारी माबो चाळुन घ्यावा
प्रतिसाद हा थोर सांडू नये तो
माबो तोचि तो विपु धन्य होतो || २ ||

मना पाहता सत्य हे प्रतिसाद
जिता बोलता सर्व जीव मी मी
रोमातले ही सर्व मानिताती
अकस्मात बाय करुनी जाती || ३ ||

मना अ‍ॅडमिना हित माझे करावे
मम शत्रूंचे आयडी ब्लॉक करावे
कोणी दुष्ट वाकडा देई प्रतिसाद
त्वरित करावा तयाचा नायनाट || ४ ||

न बोले मना गगोवीण काही
तिथे रोमात राहता सुख नाही
प्रतिसादाने प्रतिसाद वाढत जातो
रोमात राहूनही पार्ले मजा देतो || ५ ||

प्रतिसाद-रक्षणाकारणे यत्न केला
परी शेवटी अ‍ॅडमीन घेवून गेला
करी रे मना भक्ती या माबोची
पुढे अंतरी सोडी चिंता फुकाची || ६ ||

इथे सापडतील वीर गझलधारी
गझल वाचता माबो थरारी
प्रतिसाद वाद जन फेकून मारी
गझलधारी गझलेतच प्रतिवाद करी || ७ ||

गझल करे एक दुजा शोक वाहे
अकस्मात तोही वाद घालीत जाय
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते
म्हणोनी जनी डु-आयडी जन्म घेते || ८ ||

बहु गझलता कष्टला गझलऋषी
तया कारणे गुलमोहर कष्ट सोशी
दिला प्रतीसादू तया उपमांनी
नुपेक्षी कदा देव गझलभिमानी || ९ ||

एक आयडी ब्लॉक होता
दुजा जन्म घेई
डूआयडी चे पीक
अमाप येई || १० ||

जनी मस्त प्रतिसाद लिहून टाकावा
जनी संवाद होताच एन्जॉय करावा
जगी तोचि तो व्यवहारी
जो बाफ चालवे हीतकारी || ११ ||

गप्पाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो मित्रत्वाचा
नमू स्मायली मूळ निर्मळ वाचा
गमू पंथ आनंद या चिखल्याचा || १२ ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपणाला कोणकोणते आयडी ब्लॉक करावयाचे आहेत ? यादी खूप मोठी असेल तर कुठले ठेवायचे आहेत ते लिहीणे सोयीचे होईल वाचण्यासाठी. ( या यादीत अ‍ॅडमिन आणि व्यवस्थापन यांना जागा मिळेल ही अपेक्षा Wink )

:))

आपणाला कोणकोणते आयडी ब्लॉक करावयाचे आहेत ? यादी खूप मोठी असेल तर कुठले ठेवायचे आहेत ते लिहीणे सोयीचे होईल वाचण्यासाठी. ( या यादीत अ‍ॅडमिन आणि व्यवस्थापन यांना जागा मिळेल ही अपेक्षा डोळा मारा )
>>>
लोल