दाटते आहे निराशा फार हल्ली...... (तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 November, 2012 - 08:44

बंद केले मी सुखाचे दार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

वेदनेने वेढले आयुष्य केव्हा ?
विसरते मी दिवस-महिने-वार हल्ली !

यातनांची पैज होती हुंदक्यांशी
दु:ख गेले आसवांच्या पार हल्ली

झेलले वर्मी दिलेले घाव तेव्हा
जखम माझी भरजरी-जरतार हल्ली

भावनांचे मोल कवडीमोल येथे
कोरडा व्यवहार तालेवार हल्ली

जीवना रे राख थोडी बूज माझी
संकटांचा चालला भडिमार हल्ली

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<क्षमस्व!! >>>>

त्यात काय एवढ माफी मागण्यागत वैवकु?

उलट प्रत्येकाच्या प्रतिसादाला 'सहमत' होण्यापेक्षा स्वतःचा तुमचा आलेला हा प्रतिसाद फा....र बोलका वाटला Happy

-सुप्रिया.

जीवना रे राख थोडी बूज माझी
संकटांचा चालला भडिमार हल्ली<<<

छान, एकुण गझलही छान

बंद केले मी सुखाचे दार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

यातनांची पैज होती हुंदक्यांशी
दु:ख गेले आसवांच्या पार हल्ली

>>> हे दोन शेर आवडले.

यातनांची पैज होती हुंदक्यांशी
दु:ख गेले आसवांच्या पार हल्ली << सुंदर शेर >>

भावनांचे मोल कवडीमोल येथे
कोरडा व्यवहार तालेवार हल्ली << व्वा ! >>

तरही आवडली