तिच्या घुसमटीवर उत्तर काय ?

Submitted by सखी अबोली on 5 November, 2012 - 06:51

हा विषय थोडा बोल्ड वाटला नेहमीच्या आयडीने मांडण्यासाठी. खरच का बरं मोकळेपणे लिहीता येऊ नये ? असा विषय समजण्यासाठी खरं तर स्त्रीच असावं लागतं. पुरुष कदाचित साजून घेऊ शकेल पण समजू शकेलच असं नाही.

नुकत्याच निधन पावलेल्या एका सुपरस्टारबद्दल चर्चा चालली होती. तेव्हा ऑफीसातल्या एका तथाकथित आगाऊ सहका-याने त्याच्या अभिनेत्री पत्नीबद्दल नको त्या कमेण्टस पास केल्या. डबे खाताना आमची त्याबद्दल चर्चा झाली. त्या अभिनेत्रीचीची जखम कुणाला दिसते का ? तिचं सेक्सी असणं / दिसणं इतकंच पुरुषांसाठी बस होतं. तिचे कुणाबरोबर काय संबंध होते आणि त्यामुळं तो कसा निराश झाला, दारू पिऊ लागला वगैरे.

तिचं पहिलं पिक्चर हिट झालं तेव्हा ती जेमतेम सोळासतरा वर्षांची असेल. तेव्हां हा अमाप लोकप्रिय होता. त्याने मागणी घातली तेव्हां तिला काहीच सुचलं नसेल. पण दोघांच्या वयात कितीतरी फरक होता. पुढे जेव्हा दहा एक वर्षे होऊन गेली तेव्हा हा चक्क वयस्कर म्हणावा असा होता तर तिने जास्तीत जास्त पंचविशी ओलांडली असेल. तिची काय घुसमट होत असेल ते तिचं तिलाच माहीत. ही एक गरज आहे असं आपल्याकडे मानतच नाहीत. स्त्रियांनी तसले विनोद सांगणे म्हणजे ती बाई चांगली नाही बरं का ! नेटवर तसल्या साईट्स असतात. त्याच्यावर चिटींग वाईव्हज हा शब्दप्रयोग असतो. चिटींग हजबण्ड्स असा शब्दप्रयोग असूच शकत नाही. तो पुरुषाचा हक्कच ! त्यात काय मोठंस ! पण परपुरुषाबरोबर संबंध ठेवू पाहणारी स्त्री म्हणजे काय ! संस्कृती बुडालीच समजा ! किंवा मग काय बाई आहे ही. नव-याला फसवते म्हणजे काय ?

त्या अभिनेत्रीच्या बाबतीत हेच झाल. वयातल्या फरकामुळे त्याने तिची अवहेलनाच केली आणि त्यातून त्याची चिडचिड झाली. पण दोष तिच्या माथी ! गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये. तो उद्देशही नाही इथं फक्त तिच्या नैसर्गिक गरजांची हेळसांड होऊनही तीच दोषी कशी हा प्रश्न विचारायचा आहे. ही गरज भागवूनही संसार करण्याचा हक्क तिला नाही का ? तिलाच का अशा अनेकींना हा हक्क मिळू शकेल का ? आपला समाज देईल ? कि या जगाचा अंत होईपर्यंत ती तशीच कुढत राहणार आहे ? फक्त घटस्फोट हेच उत्तर अशा समस्येच आहे का ? पुरुषाला हाच न्याय लावतो का आपला समाज ?

(कृपया विषयाचं गांभीर्य समजून घेऊन मगच प्रतिक्रिया द्य्व्यात ही विनंती. प्रशासनाने कृपया बाफकडे लक्ष द्यावे. नको ते वळण लागल्यास बाफ उडवावा. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटाचाच विषय आहे तर अनेक चित्रपटात, असे संबंध पुरेश्या गांभीर्याने मांडलेले आहेत ( म्रूत्यूदंड, रिहाई वगैरे) जर तिला, अपराधीपणाची भावना नसेल, तर तिने जगाच्या मताची किम्मत करु नये. इथे जग जग म्हणजे, फारच डोक्यावर घेतलेला शब्द आहे. कुणीही कुणाला फुकट जेवायला वाढत नाही, त्यामूळे कुणाच्या
शेर्‍यांची पर्वा का करा.. ?

कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना..

काश ! इतकं सोपं असेल तर मग ! अपराधीपणाची भावना नसेल असं नाही होणार. ती असणारच. पुरुषालाही असतेच. स्त्री च्या या कृतीकडे पाहण्याचा टिंगलयुक्त दृष्टीकोण, लोकांच्या नजरा, टोमणे हे तिला जगू देत नाही. वरचे दोन्ही मुवीज मी पाहिले नाहीत. नुकताच एक जुना मुवी पाहिला. शबाना आजमि आणि स्मिता पाटिल दोघींचा. बहुतेक अर्थ. नेमका प्रश्न विचारते शेवटी ती.

मग त्या अर्थाने दोन्ही चित्रपट पहाच. त्यातल्या नायिका, अत्यंत आत्मविश्वासाने हा प्रश्न हाताळतात ( शबाना आझमी आणि हेमामालिनीने या भुमिका केल्यात )
अपराधीपणाची भावना न ठेवणे, हेच या दोघी नायिकांचे बलस्थान आहे... हेमामालिनीने तर प्रत्यक्ष आयूष्यात हे सिद्ध केलेय. आपला आदर्श ठेवावा, किंवा आपण केले ते बरोबर केले, असे ती कधीच म्हणाली नाही.

असा विषय समजण्यासाठी खरं तर स्त्रीच असावं लागतं. >> का बरं ?
वैचारीक गोंधळ झाल्यामुळे नेमकं काय म्हणायच आहे हे कदाचित क्लिअर नसावं. चाचांच्या मते विषय जुनाट आहे आणि थोडा सर्च दिला तर नेटवर लाखो चर्चा / लेख सापडतील. खरं तर चाचांना काहीच समजत नाही हे चाची नेहमी म्हणतच असते.

इथे जग जग म्हणजे, फारच डोक्यावर घेतलेला शब्द आहे. कुणीही कुणाला फुकट जेवायला वाढत नाही, त्यामूळे कुणाच्या शेर्‍यांची पर्वा का करा.. ? >>> +१००००००००००००००००

हा चक्क वयस्कर म्हणावा असाहोता तर तिने जास्तीत जास्तपंचविशी ओलांडली असेल. तिचीकाय घुसमट होत असेल ते तिचं तिलाच माहीत. ही एक गरज आहे असं आपल्याकडे मानतच नाहीत.स्त्रियांनी तसले विनोद सांगणे म्हणजे ती बाई चांगली नाही बरं का ! नेटवर तसल्या साईट्स असतात. त्याच्यावर चिटींग वाईव्हजहा शब्दप्रयोग असतो. चिटींगहजबण्ड्स असा शब्दप्रयोग असूच शकत नाही. तो पुरुषाचा हक्कच ! त्यात काय मोठंस ! पणपरपुरुषाबरोबर संबंध ठेवू पाहणारी स्त्री म्हणजे काय! संस्कृती बुडालीच समजा ! किंवा मग काय बाई आहे ही. नव-याला फसवते म्हणजे काय ?>>>> बायका 'त्या' बाबतीत फारच दांभिक असतात हो, त्यांना 'त्यातली' प्रत्येक गोष्ट पुरुषांईतकीच हवी असते .फक्त सोज्वळपणाचा आव आणतात. जाऊ द्या ,'त्या'बाई दांभिक नाहीत हे एक चांगले.

हा विषय जर गभीर आहे तर दुसरा आयडी का घेतला ? तुम्हाला ख-या नावाने लिहायचं नाही तर पब्लिकने कशाला ख-या नवाने यायचं ? प्रत्येकालाच ड्युआय घेऊन लिहायला लागल. तस पण इथ पुरुष आयडीन काही लिहीणं धोक्याच आहे कारण कुठल्याही बाजुने लिहिलं कि धुलाइच होणार आहे. हा तर सापलाच लावल्यासारखा आहे. बाहेरख्यालीपणा करू न देणं ही घुसमट आहे का असं विचारल तर तुम्ही नाही का करत विचारणार . जर अस म्हटलं कि गंभीर विषय आहे तुमचा नंबर द्या आपण चर्चा करू तर कारवाई करनार. लहान पोरांनी मजा घेतली तर बघा हा पुरुषी दृष्तीकोन म्हणणार . कैच्याकै

सखी अबोली - तुम्हाला त्या superstar चे नाव घ्यायला का भिती वाटली?
त्या अभिनेत्री नी ( Dimple ) पण स्वता चे सुंदर आणि sexy दिसणे च विकले. एकदा public figure झालात की अश्या गोष्टी लोक बोलणारच.

स्वता चे sexy दिसणे इतकेच भांडवल घेउन तिने cinema केल्यावर लोकांन्नी तरी का ते सोडुन दुसर्‍या विषयावर बोलावे. फक्त dimple बद्दल च का राजेश खन्ना बद्दल पण असेच बोलतात की लोक.

उगाचच एखाद्या non-issue ला issue बनवु नका

प्रसाद१९७१ +१०००००००००००००००००००००००

नव-याला सोडल तर घुसमट बंद होईल कि. का नाही सोडत मग ?

राजेश खन्ना ची मालमत्ता म्हणे ५०० कोटी ची आहे.

कारण हे ही असु शकेल कदाचित.

किंवा दोघांचे खरे प्रेम पण असु शकेल एकमेकांवर Happy

sakha abola राजेश खन्ना नुकतेच निवर्तले.
तथापि स्वतःच्या आत्यंतिक प्रेमात असलेला हा सुपरस्टार होता. अजूनही तो स्वतःलाच सुपरस्टार समजत होता, अभिनयाचा आनंदच होता.पण दिसण्याच्या व मान हलवत डोळे पिटपिट्ण्यावर फिदा झालेल्या मुलींच्या जीवावर त्याने राज्य केले. आपला पुढचा सिनेमा इंड्स्ट्री गाजवून सोडणार आहे ह्या भ्रमात तो कायम होता असेही वाचनात आले. शिवाय पैसा, उंची षौक ,दुसर्यांना भाव न देणे, अनेक 'प्रकरणे' हे सगळे बघता त्याने कुठलीही बायको केली असती तरी तिची घुसमट होणे अपरिहार्य होते.