Submitted by -शाम on 5 November, 2012 - 03:55
अन्नपुर्णेश्वरी तुझी आरती गातो
घास मुखी घेताना तुझे नाम मी घेतो ||धृ||
व्याकुळलेली सृष्टी जेंव्हा निजदृष्टी दिसली
काशी तिर्थावरी तेंव्हा गौरी प्रगटली ||१||
चराचरावर आई तुझे कोटी उपकार
विन्मुख दिसता कोणी सत्वर होशी साकार ||२||
भुकेजल्या जीवांच्या मुखी भरवीशी घास
तुझ्या कारणे चाले अवघ्या अवनीचा श्वास ||३||
तू मायेचा सागर अवघे चैतन्य तूचि
शाम विनवितो आता सकळा सुख वैभव देशी ||४||
.......................................................................................
आज तिसर्यांदा आणखी एक आरती रेकॉर्ड करण्याचं भाग्य, ईश्वर कृपेने आणि तुमच्या सदिच्छा/ आशीर्वादाने मिळत आहे. हा आनंद वाटून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
......................................................................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनन्दन शामजी आरती खूपच सुखद
अभिनन्दन शामजी
आरती खूपच सुखद !! धन्यवाद
अशीच यशाची शिखरे उत्तरोत्तर
अशीच यशाची शिखरे उत्तरोत्तर पादाक्रांत करीत जा अशी शुभेच्छा!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
वा ! छान आणि नवीनच
वा ! छान आणि नवीनच ..पहिल्यानेच अन्नपूर्णेश्वरीची आरती वाचली. अभिनंदन आणि धन्यवाद.
धन्यवाद दोस्तांनो ! खूप खूप
धन्यवाद दोस्तांनो !
खूप खूप आभार!
शाम, प्रथम अभिनंदन!! पण, मला
शाम,
प्रथम अभिनंदन!!
पण,
मला फार आवडली नाही ही आरती.
छान आहे.
छान आहे.
अभिनंदन
अभिनंदन