मी सोडले

Submitted by श्रावण१८ on 3 November, 2012 - 12:35

रंगविल्या चेहऱ्यांचे सत्य जाणणे सोडले
मी उडत्या पाखरांचे पंख मोजणे सोडले

हे विष देहात ज्यांचे रोज वाहते माझिया
त्या जहरी श्वापदांचे डंख मोडणे सोडले

घाव शरीरी नखांनी जे करी स्वत: आपुल्या
मी जखमांना तयांच्या मीठ चोळणे सोडले

ते रडगाणे तयांचे रोज तेच गाती उगा
मी फुकटे सांत्वनाचे शब्द बोलणे सोडले

कोमलशा भावनांचे ना कुणी इथे सोयरे
आज कुणा 'श्रावणा'ने जीव लावणे सोडले
@ 'श्रावण' (शंकर पाटील) - ०१/११/२०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैवकु,

मुळात अक्षरछंद दुय्यम आहे, हे कुणीच म्हटलेलं नाही, म्हणणारही नाही... किमान मी तरी. माझ्या मते इथेच घोडं पेंड खातंय. सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका, असं मी सुचवीन.
अनेकांना असा गैरसमज असलेला मी पाहिला आहे की,,गझल हे श्रेष्ठ काव्य आहे आणि गझलेतर कविता दुय्यम. अश्या लोकांची कीव करावी आणि कवितेची कास धरावी असं मला मनोमन वाटतं. त्याचप्रमाणे वृत्तबद्ध रचना श्रेष्ठ व मुक्तछंद व (अक्षर) छंदोबद्ध रचना दुय्यम हाही एक गैरसमज आहे.

'सुनित' रचना १४ ओळींचीच का असते?
त्यात शेवटच्या दोन ओळींतच कलाटणी असणे, ह्या मागचे कारण काय?
सातव्या ओळीनंतर कलाटणी का नाही...

असे प्रश्न कधी पडले का?

माझ्या मते जे जसं पूर्वापार आहे, ते पटत नसल्यास आपण स्वतंत्र पिल्लू जन्माला घालावं. त्याला एक नवीन नाव द्यावं आणि त्याचं संगोपन करावं, मोठं करावं. अनेक मान्यवरांनी अनेक वर्षांपासून मेहनत घेऊन 'गझल' आपल्या समोर आणली आहे. 'बने बनाए' घरात आपला एक कोनाडा पकडून वेगळी खोली बांधण्यापेक्षा स्वतंत्र महाल उभारावा आणि लोकांना आमंत्रित व आकर्षित करावं की ! किसने रोका हैं? Happy

मी कोणताही आग्रह धरत नाही आहे अक्षरछन्दाचा

मी म्हणत होतो की एखाद्यास जर गझल अक्षरछन्दात करायची असेल तर हे कसे चुकीचे आहे हे मी तरी सान्गत बसणार नाही शक्य झाल्यास बरोबर आहे व का / कसे हे सान्गायच्जा मी व्यक्तिशः प्रयत्न करीन जसा मी वरील काही प्रतिसादातून केला आहे

बने बनाए' घरात आपला एक कोनाडा>>अशा सन्कुचित मानसिकतेतून मी हे करत नाही आहे तर उलट या गझलेच्या महालात असाही एक कोनाडा आहे हे मला नजरेस पडले त्याबद्दल मी चार्-चौघाना सान्गीतले इतकेच ...माझ्या आधीही ह्या कोनाड्यास अनेकानी भेट दिली आहेच मी काही एकमेव नाही आहे !!

अनेक मान्यवरांनी अनेक वर्षांपासून मेहनत घेऊन 'गझल' आपल्यासमोर आणली आहे.>>>> होय!! ताजमहालच जणू !!!! (चान्गल्या भावनेने म्हणत आहे कुणीही माझ्यावर रागावू नका!! :))

पण हा जो महाल बान्धलाय तो जपणे .....तिथे लिंपणी सारवणी करणे ......गरज पडल्यास डागडुजी करणे त्याबरोबरच तीच्यात भर घालणे ......आहे त्यापेक्षा जास्त वढवणे हे ही आवश्यक आहे

असो

अवान्तर :मान्यवर वगैरे गोष्टी मानण्यावर असतात असे मी मानतो Wink

अति अवांतर -
>>मान्यवर वगैरे गोष्टी मानण्यावर असतात असे मी मानतो<<

नक्कीच.. कदाचित पहिला शब्द दुसर्‍याचा अपभ्रंशही असावा!! (मान्यवर - मानण्यावर!) Wink Happy

श्रेष्ठीजन हो, आमच्या पिल्लानं एव्हढा दंगा घातलाय हे मला माहित नव्हतं. माझ्या हातून काही चूक झाली असल्यास आपणा सर्वांची मी माफी मागतो. पण एक गोष्ट सांगाविशी वाटते, की 'NOTHING IS PERMANENT BUT THE CHANGE ITSELF'. कालमानाप्रमाणे होणाऱ्या बदलांना विरोध करून चालत नाही. अनुकूलनशीलतेचा अभाव असणाऱ्या गोष्टींचा कधीतरी ऱ्हास होतो. त्यामुळे नव्या येणाऱ्या बदलांना आपण सामावून घेऊ शकू की नाही याचा विचार होणे निश्चितच गरजेचे आहे.

पण एक गोष्ट सांगाविशी वाटते, की 'NOTHING IS PERMANENT BUT THE CHANGE ITSELF'. कालमानाप्रमाणे होणाऱ्या बदलांना विरोध करून चालत नाही. अनुकूलनशीलतेचा अभाव असणाऱ्या गोष्टींचा कधीतरी ऱ्हास होतो. त्यामुळे नव्या येणाऱ्या बदलांना आपण सामावून घेऊ शकू की नाही याचा विचार होणे निश्चितच गरजेचे आहे.

<<<

हे विधान येथे 'सरसकट' लागू होत नाही.

शंकर पाटील सर (श्रावण१८),

आपल्या प्रतिक्रियेत उपरोध किंवा नाराजी सदृश्य काही तरी जाणवलं, म्हणून हे लिहितो.......

अनुकूलनशीलतेचा अभाव असण्याचा आरोप आपण करत आहात, तो चुकीचा आहे. माधवराव ज्युलियन.... सुरेश भट.... आज हा गझलचा प्रवास आपण नीट अभ्यासलात, तर लक्षात येईल की त्या-त्या काळातील कवीमंडळींच्या नवनवीन प्रयोगांमुळे - ज्याला आपण अनुकूलनशीलता म्हणता - गझलेचं स्वरूप खूप बदलत गेलं आहे, आजही बदलत आहे. पण बदल मूलभूत सिद्धांतांविरोधात असेल, तर ती नवनिर्मिती ठरते, असं मला वाटतं.

कालमानाप्रमाणे येणार्‍या बदलांना सरसकट सामावून घेणे बरोबर नाही ना? त्याला पडताळून पाहायलाच हवे ना? केवळ बदलासाठी बदल स्वीकारणे आणि विरोधासाठी विरोध करणे, ह्या दोन्ही गोष्टी गैरच ना?

रणजीत जी, नाराजी किंवा उपरोधाचा प्रश्न येत नाही. प्रस्तुत गझल अभंग किंवा ओवीप्रमाणे अक्षरछंद आहे का? ही गझल मात्रावृत्तात बसत नाही का? हां, आधी या रचनेला गझल म्हणायचे का? कारण या रचनेच्या गझल असण्यावरच प्रश्नचिन्ह आहे. आम्ही शिकाऊ उमेदवार आहोत. त्यामुळे जाणकारांच्या फटक्यांचे वाईट वाटून घ्यायचे नसते, हे आम्हाला माहित आहे. या फटक्यातूनच आम्हाला शिकायला मिळेल.

या रचनेत १३+१३ असा २६ मात्रांचा आकृतिबंध आहे याकडे ध्यान दिले आहे का?

या रचनेत १३+१३ असा २६ मात्रांचा आकृतिबंध आहे याकडे ध्यान दिले आहे का? >>>
हे आत्ता सान्गून काय उपयोग???

<<<<< हे आता सांगून काय उपयोग?>>>>>>>>>>>>>>
मलाही हेच पाहायचे होते की जे जाणकार या गझलेवर भाष्य करत होते, ते किती सजग आणि चौकस आहेत?

शेवटून दुसर्‍या द्विपदीत १३-१३ नाहीये. म्हणून ही वृत्तबद्ध असेल, असं वाटलं नाही.

>>मलाही हेच पाहायचे होते की जे जाणकार या गझलेवर भाष्य करत होते, ते किती सजग आणि चौकस आहेत?<<

परत करणार नाही.
क्षमस्व.

>>शेवटून दुसर्‍या द्विपदीत १३-१३ नाहीये. म्हणून ही वृत्तबद्ध असेल, असं वाटलं नाही.<<<<<

ते रडगाणे तयांचे रोज तेच गाती उगा
मी फुकटे सांत्वनाचे शब्द बोलणे सोडले

कृपया नीट मोजून पहा. निश्चितच १३-१३ मात्रा आहेत.

Pages