तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !

Submitted by रसप on 2 November, 2012 - 02:56

तुझ्या प्रत्येक स्वप्नाला दिली मी मूठमाती
रिकामे भाळ घेउन धाय मोकलतात राती

कुणासाठी कुणी मेले तरीही नाव नसते
पतंगाचे दिव्यावर प्रेम, जळती तेल-वाती !

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !

कुणी मुलगा, कुणी दासी, कुणी तर प्रेयसीही
तुझ्या सगळ्याच भक्तांची तुझ्याशी भिन्न नाती !

नको तू भेदभावाला 'जितू' मानूस कुठल्या
तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !

....रसप....
१ नोव्हेंबर २०१२

http://www.ranjeetparadkar.com/2012/11/blog-post_2.html

============================

टीप:-
समांतर/ पर्यायी एखाद-दुसरा शेर चालेल. अख्खी गझल देण्याचा आगाउपणा कृपा करून करू नये. हे आधीच सांगतो आहे कारण नंतर कंटाळवाण्या चर्चांची गुर्‍हाळं सुरू होतात, जी मला माझ्या गझलेवर नको आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !<<< व्वा वा

मस्त

सहज सूचना :
<<<<<<<तरीही फॉर्म भरताना लिही जाती-प्रजाती !>>>>>> असे केले तर ??....सहजच !! गैरसमज नसावा Happy

धन्यवाद

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !
अप्रतिम शेर...
कुणी मुलगा, कुणी दासी, कुणी तर प्रेयसीही
तुझ्या प्रत्येक भक्ताची तुझ्याशी भिन्न नाती !
सुरेख...
नको तू भेदभावाला 'जितू' मानूस कुठल्या
तरीही कागदावरती लिही जाती-प्रजाती !
छान...

सुंदर गझल...शुभेच्छा..

वैवकु,

तसंही करता येऊ शकेल, पण मी ते टाळलं कारण इंग्रजी शब्द आल्याने एक हझलीश आभास निर्माण होतो, असं वाटलं.

धन्यवाद !! Happy

छानच रसप.
>>तरीही कागदावरती लिही जाती-प्रजाती !
इथे
'तरी प्रत्येक अर्जावर लिही जाती-प्रजाती'
कसं वाटेल ??

>>तरी प्रत्येक अर्जावर लिही जाती-प्रजाती'<<

मस्त बदल सुचवलात भारती ताई !
पण दोन वेळा आधीच 'प्रत्येक' येऊन गेलं आहे. त्यातीलही एक कमी करायचा विचार करतो आहे.

तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती - असं करतो.

आणि

तुझ्या सगळ्याच भक्तांची... - असंही करतो आहे..

अनेकानेक धन्यवाद! Happy