सोलर वॉटर हिटर माहिती हवी आहे

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 31 October, 2012 - 01:56

बर्‍याच दिवसाचा विचार होता की घरी सोलर वॉटर सिस्टीम घ्यावी. पण ते बजट मध्ये जमत नव्हते, शिवाय त्यावर खरोखरच चांगले पाणी तापते काय? या बद्दल साशंक होतो. आता घ्यायची ईच्छा आहे. तसेच आता सिलेंडरचेही प्रॉबलेम सुरु झालेच आहे.
घरात अंदाजे वेळोवेळी येणारी पाव्हणे धरुन १० ते १२ व्यक्तीसाठी किती लिटर क्षमतेचे घ्यावे, कुठल्या कंपनीचे घ्यावे, अंदाजे किंमत व सबसीडी किती मिळेल कॄपया माहीतीगारांनी कळवावे हि विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरी (पुण्यात) ट्यूब पद्धतीचा सोलर वॉटर हिटर (१५ ट्यूब्ज) आहे - बरीच वर्षे झाल्याने किंमत वा कपॅसिटी आता लक्षात नाहीये - बहुतेक त्यावेळेस फक्त चायनीज का तैवानीज बनवत होते असले हिटर्स. सध्या बाजारात बर्‍याच वेगवेगळ्या कंपन्यांचे दिसतात. हा हिटर गच्चीत बसवलेला असून पहिल्या वा तळमजल्यावरील बाथरुम्समधे गरम पाणी पुरवतो. पण परफॉर्मन्स उत्तम. पावसाळ्यातील १५-२० दिवस सोडता आम्ही पाचजण व्यवस्थित गरम गरम पाण्याने आंघोळ करु शकतो - एक्-दोन पाहुणे आले तरी त्यांच्याही आंघोळी उरकतील एवढी कपॅसिटी आहे. बाकी इतर कुठल्या गोष्टीला (कपडे, भांडी धुणे) हे गरम पाणी वापरत नाही.
दोन्-चार तास सूर्यप्रकाश असेल तर पाणी प्रचंड गरम होते, थोडे ढगाळ वातावरण असले तरी पाणी गरम होते. हिटरची टाकी इन्सुलेटेड असल्याने रात्रीतही पाणी फार थंड होत नाही.
मेंटेनन्स काही नाही. चार -पाच वर्षांनी टाकी व हिटरचे पाईप्स स्वच्छ करावे लागतात -(हे पाण्यावरही अवलंबून आहे - आमच्याकडे पी एम सीचे पाणी असल्याने स्वच्छ पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये).
ट्यूब पद्धतीचा सोलर वॉटर हिटर मी तरी नक्कीच रेकमेंड करेन.

आमच्याकडील या हीटरला सुमारे १२ वर्षे झाल्याने त्यावेळेसची किंमत अंदाजे १७ हजार रु असावी. एक ट्यूब खराब झालीये (फुटलेली नाहीये, पण हिटर मेंटेनन्सवाल्याच्या म्हणण्यानुसार बदलायला पाहिजे) पण ती न बदलताही पाणी व्यवस्थित गरम मिळते आहेच. त्यावेळेसची सबसिडीही आता लक्षात नाहीये - पण हे सगळे जवळच्या एखाद्या एजंटकडून कळेलच.

Thermosyphon_tubular_Solar_water_heater.jpg

धन्यवाद शशांक !
काल थोडी चौकशी केली तर २०० लि. ४०००० रु. किंमत आहे म्हणाले !

मी आमच्या सांगवी एरियात चौकशी केली. २५० लि.चा हिटर ,२४०००/- विथ इंस्टॉलेशन चार्जेस म्हणालेत.
प्लंबिंगचा खर्च आपला.

नि.ग. च्या पानावर मी इंदोरच्या एका कंपनीचा पत्ता दिला होता. त्यांचे बरेच सोलर प्रॉडक्टस आहेत.
मला वाटतं आणखी थोडा काळ वाट बघितली तर बाजारात अनेक नवीन उत्पादक येतील. सिलिंडरचा प्रश्न सर्वानाच पडलाय. ( या क्षेत्रातही चीन शिरकाव करेल, आता )

२५० लि.चा हिटर ,२४०००/- विथ इंस्टॉलेशन चार्जेस म्हणालेत.
>> पुरतो मग घ्यायला आर्या

दिनेशदा धन्यवाद !
पण नि.ग. च्या ११ धाग्यातुन ते शोधावे लागेल ना Proud

काल थोडी चौकशी केली तर २०० लि. ४०००० रु. किंमत आहे म्हणाले !>>> आम्ही ह्याच किमतीला टाटा बी पी चा सोलर- (२ पॅनेल) बसवलाय. ३ वर्षे होऊन गेली. काही तक्रार नाही.

आमचा पसारा, आम्हाला बरोबर सापडतो ! हे घ्या !

SOLAR INDIA Inc.
½ OLD PALASIA 105 APOLLO ARCADE
INDORE (M.P.) Ph: 0731-2560554(O) 94253-12942 (M)
Email: solar_marketing@yahoo.com/solarindiainc@gmail.com
Website: www.solarindia.in

कुणाला सोलर दिवे / कूकर संबंधी माहिती असेल तर वरच्या पत्त्यावर संपर्क साधा. मला त्यांची इमेल आलीय.

धन्यवाद मंडळी , काही दिवसापुर्वीच ४४०००/- २०० लि. ट्युब (सुदर्शन सौर, औरंगाबद) घेतला आहे. पाणी अगदी उकळेल मिळत आहे. आम्हा कुटूंबियाला आरामात पुरते.

सध्या बहुतेक सर्व सोलारहिटर असेंब्लीज्‌ चायनीज असतात. सोलरहिटर हे लॉंगटर्म वापरावयाचे प्रॉडक्ट असल्यामुळे जेवढे चांगले मटेरियल तेवढे चांगले. माझे मत म्हणाल तर रेकॉल्डचा चांगला. एकतर स्टेनलेसस्टील टॅंक, स्पेशल ट्यूब, स्टेनलेसस्टीलटॅंकची वर्कमनशीप. इतरही स्टेनलेसस्टील मटेरियल वापरतात. पण त्यामध्ये ग्रेडेशन आहे. त्यामुळे किमतीत फरक पडतो.
तुम्ही कोणता व किती किमतीला बसवला हे कृपया नंतर कळवा, धन्यवाद.

सॉरी वरची पोस्ट आत्ता पाहिली. हार्दिक शुभेच्छा

मी मुंबईत राहाते. दहा मजली बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर. असा सोलार हिटर मला लावता येईल का? का सोसायटीला एकत्रित लावावा लागेल? मेण्टेनन्सचा खर्च किती येतो?.

सोसायटीच्या पॅसेजेस मध्ये सोलार कंदिल लावता येतील का? त्याचं चार्जिंग कसं होतं खर्च किती येतो

वेल, असा मधल्या मजल्याला नाही लावता येणार. सोसायटीच्या टेरेस वर लावू शकता. एकदा लावल्यावर खरंतर देखभालीचा तसा काहीच खर्च नाही. पाणी फक्त स्वच्छ वापरायचं अन टॅन्क साफ ठेवायची एवढी एकच काळजी.

एक करता येईल: एका मजल्यावरच्या २ किंवा ४ फॅमिलीज मिळून १ हीटर घेता येईल. स्वस्त ही पडेल, अन सोसायटीची परवानगी ही लवकर मिळेल लोक्स जास्त असल्यानी.

सोसायटीच्या पॅसेजेस मध्ये सोलार कंदिल लावता येतील का? त्याचं चार्जिंग कसं होतं खर्च किती येतो >>>
व्यवस्थित ऊन येतं का पॅसेज मध्ये?

पॅसेजमध्ये अजिबात ऊन येत नाही. दिवससुद्धा दिवे लावावेत अशी अवस्था आहे.

आमच्यकडे एका मजल्यावर दोनच घरे आहेत आणि समोरच्यांचे आणि आमचे अजिबात पटत नाही. सो सोलार हिटर शेयरिंग नॉट पॉसिबल.
कोणत्या एनजीओ माहित आहेत का ह्यावर काम करणार्‍या तर मी सोसायटीला इन्वॉळ्व्ह करू शकेन पण मला पूर्ण माहिती हवी. मग सोसायटीच्या सेक्रेटरी चेयरमनला भेटवू शकेन त्यांना.