"हो सुट्टा सुट्टा हृदया"

Submitted by बेफ़िकीर on 29 October, 2012 - 04:29

नुसतेच कडेवर बसणे
मग हे घे ते घे करणे
काहीही निरखत फिरणे
काहीही मागत रडणे
मी नाही नाही म्हणणे
येईल बुवा ऐकवणे
तू काहीदा घाबरणे
तू धडधड करणे
मग त्याने मी घाबरणे
मी डॉक्टरला दाखवणे
तू औषध नाही म्हणणे
मी बळेच ते चाटवणे
मग तू भोकाड पसरणे
मग थोडा उतार पडणे
मग तुला पुन्हा हिंडवणे

तू सरावणे सार्‍याला
आजाराच्या मार्‍याला
त्या डॉक्टरी उतार्‍याला
मरणाच्या.. इशार्‍याला
मसणाच्या..निवार्‍याला
आगीच्या.. उबार्‍याला
करपटल्याश्या वार्‍याला
जळलेल्या .. बिचार्‍याला
श्वासांच्या .. भिकार्‍याला

हे कडेवरी बसल्याने
झालेले आहे सारे
मी लाड तुझे केल्याने
झालेले आहे सारे

तेव्हाच म्हणालो असतो
तर नसते झाले आता

"हो सुट्टा सुट्टा हृदया
मी दमलो आहे आता"

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

भावना पोचल्या
लाम्बी-रुन्दीने कविता जराशी जास्तच विस्तारली आहे असे वाटले ......वैयक्तिक मत ...चुकीचे असल्यास क्षमस्व
Happy

<<तू सरावणे सार्‍याला
आजाराच्या मार्‍याला
त्या डॉक्टरी उतार्‍याला
मरणाच्या.. इशार्‍याला
मसणाच्या..निवार्‍याला
आगीच्या.. उबार्‍याला
करपटल्याश्या वार्‍याला
जळलेल्या .. बिचार्‍याला
श्वासांच्या .. भिकार्‍याला >>

'शरीर म्हणजे धडधडते हृदयच सर्वव्याप्त..' शरीर म्हणजे कवीचं हृदयच अभिव्यक्त. सुट्टं होणं म्हणजे समर्थ होणं.त्याच्याबद्दल कवितेत दाखवलेला अपत्यभाव खूप सुंदर, अर्थवाही.

अपत्यभाव>>>>>>

भारतीताई ; अपत्यभाव बद्दल सविस्तर सान्गाल का प्लीज !! मला शिकायचे आहे काय असते ते ..प्लीज

आपला नम्र .कृपाभिलाषी
-वैभव
Happy

वैभव, आज माझी पाळी आहे वाटतंय फिरकी घेतली जाण्याची. :))
स्वत;च्या हृदयाला स्वतःचं अपत्य समजून दटावणं, थोडं मायेने दमून विनवणं असा पवित्रा बेफिकीर घेताहेत या कवितेत, तो आवडला असं आपलं माझं सरळपणी उत्तर.

व्वा !

वेगळीच कविता, पण छान - हृदयाचे (पण) चोचले पुरविण्यात काही अर्थ नाही !

मस्तच!!

व्वा!!
आवडली कविता... वेगळीच आहे.

रागवु नका पण आधी 'हो सुट्टा सुट्टा' वाचलं आणि वाटलं की सुट्टा म्हणजे सिगरेटचा सुट्टा वगैरे की कॉय Uhoh

हो शाम, दोन वेळा 'धडधड' हा शब्द हवा आहे तो एकदाच लिहिला गेला. धन्स लोला Happy

सर्वांचे आभार्स

-'बेफिकीर'!

दोन रट्टे ठेवुन द्या राव हृदयाला
हाकानाका

<<<

देणार होतो, पण ती तुमच्या हृदयावरची कविता आहे, त्यामुळे कीव आली त्या हृदयाची.