उदयपुर

Submitted by इंद्रधनुष्य on 29 October, 2012 - 02:23

'City of Lakes' अशी बिरुदावली मिरवणारं 'उदयपुर' हे राजस्थानच्या दक्षिणेकडील एक सुंदर शहर. मेवाडच्या गौरवशाली इतिहासातील एक महत्वाच ठिकाण.

मेवाडचा महाराणा उदय सिंग (दुसरा) याने १५व्या शतकातच्या उत्तरार्धात उदयपुरचा राजधानी म्हणुन विकास केला. उदयपुरचा राजमहाल (City Palace) ही उदय सिंगच्या कार्दकिर्दीतील सर्वोत्तम निर्मिती. उदयपुरला मेवाडच्या हस्तकले सोबत बहुरंगी पेहरावांचा वारसा लाभलेला आहे. येथील देवळांतील सुंदर कोरिवकाम लक्षवेधक आहे.

१. City Palace
उत्तरेकडील नाग्डा कडून चित्तोर आणि मग उदयपुर अशी मेवाडच्या राजधानीची स्थित्यंतरे होत असताना महाराणा उदय सिंग (दुसरा) याने 'पिचोला' तलावाच्या साथीने एक भव्य दिव्य राजमहाल उभारला. पंधराव्या शतकातील राजेशाही थाट मिरवणारा हा 'City Palace' म्हणजे उदयपुरचा मानबिंदू ठरला आहे.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

या सुर्यवंशी राजांच्या राजमहालाचे प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असून आत इतर ११ महाल आहेत.

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

ग्रॅनाईट आणि संगमरवरावर बांधलेल्या या राजमहालाच्या प्रत्येक दालनाला चांदी आणि काचेच्या सुंदर नक्षीकामाची साथ लाभलेली आहे. झरोख्यांना लावलेल्या रंगीत काचा आतील भित्तीचित्रांच्या मोहकतेत अधिकच भर घालतात.

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

राजमहालाच्या सर्वात वरिल भागातून दक्षिण्-पश्चिम पसरलेल्या 'पिचोला' तलावाचे विहंगम दृश्य नजरेस पडते.

प्रचि २०

प्रचि २१

२. जगदीश मंदिर
महाराणा जगत सिंग यांनी १६व्या शतकात बांधलेले हे श्री विष्णूचे मंदिर म्हणजे स्थापत्य केलेचा एक सुंदर नमुना आहे. मंदिरात गायले जाणारे ठेकेदार भजन केवळ श्रवणीय असते.

प्रचि २२

प्रचि २३

३. गुलाब बाग
महाराणा सज्जन सिंग यांनी मुख्य राजवाड्या पासून जवळच ही बाग बांधलेली आहे. टॉय ट्रेन हे इथले अबाल-वृद्धांचे खास आर्कषण. टॉय-ट्रेनच्या फेरी दरम्यान बागेतील प्राणी संग्रहालय पहाता येते.

प्रचि २४

४. फतेह सागर तलाव
१६व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराणा जय सिंगाने पिचोला तलावाच्या उत्तरेला फतेह सागर तलाव बांधला. तलावाच्या मध्यभागी असलेले 'नेहरु गार्डन' म्हणजे सतराव्या शतकात बांधलेल्या 'जग मंदिर'चा भाग आहे.

प्रचि २५

५. सुखाडिया Circle
राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. मोहनलाल सुखाडिया यांच्या स्मरणार्थ बांधलेले तीन मजली कारंज्याचे ठिकाण म्हणजे सुखाडिया Circle. शहरातील हे मध्यवर्ती ठिकाण असून कारंज्या शेजारील तलावात नौका विहाराचा आनंद घेता येतो. खवैय्यांनी येथील लज्जतदार पाव्-भाजीची चव नक्की घ्यावी.

प्रचि २६

प्रचि २७

६. सहेलियों की बाडी
उदयपुरच्या राजकुमारीला हुंड्यात मिळालेल्या ४८ तरुण सेविकांसाठी केलेली रहाण्याची सोय म्हणजे सहेलिंयो की बाडी. फतेह सागरच्या तटबंधी शेजारी असलेल्या या बाडीतील खासियत म्हणजे येथील कमळ तलावातील कारंजांचे सुमधुर गुंजन.

प्रचि २८

प्रचि २९

७. एकलिंगजी
उदयपुर पासून २२ कि.मी. वर कैलाशपुरी गावा जवळ वसलेले एकलिंगजी हे महादेवाचे मंदिर आहे. १०८ देवळांचा समुह असलेला एकलिंगजीचा परिसर म्हणजे शिवभक्तांच्या श्रद्धेचा महापुर आहे. मुख्य शिवमंदिर दुमजली असुन प्रवेशद्वारावर दगडी हत्तीचा पहारा आहे. (मंदिर परिसरात कॅमेर्‍यावर बंदी आहे)

प्रचि ३०

८. नाथद्वारा
औरंगजेबा पासुन जेव्हा मुर्ती पुजेस उपद्रव होऊ लागला तेव्हा हिंदु भक्तांनी आपले आराध्य श्रीनाथजींची स्थापना सुरक्षीत ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. स्थलांतरा दरम्यान श्रीनाथजींचा रथ चिखलात रुतून बसला. हा देवाच्या विश्रांतीचा संकेत असावा असे समजून श्रद्धाळुंनी त्याच ठिकाणी श्रीनाथजींच मंदिर बांधले. (मंदिर परिसरात कॅमेर्‍यावर बंदी आहे)

९. हल्दीघाटी
महाराणा प्रताप यांनी १५९७ च्या युद्धात अकबराची कोंडी करण्या साठी निवडलेले ठिकाण म्हणजेच हल्दीघाटी. हळदी सारखा पिवळा रंगाची माती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. येथूनच साधारण १५ ते २० किमीच्या अंतरावर महाराणा प्रताप यांच्या प्रिय घोड्याचे 'चेतक स्मारक' आहे. जवळच असलेल्या महाराणा प्रताप संग्रहालयातील 'Light & Music Show' जरुर पहावा.

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

१०. कुंभलगड
उदयपुरच्या उत्तरेकडे ८४ किमी. वरील तालुका केलवाडा, जिल्हा राजसमंद येथील १५व्या शतकातील 'राणा कुंभा'ने अरवलीच्या पर्वंतरांगा मधे उभारलेला बलाढ्य दुर्ग 'कुंभलगड' आपले लक्ष वेधून घेतो.

प्रचि ३५

दक्षिणेकडच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर हल्ला पोल, हनुमान पोल, राम पोल, विजय पोल आपल्या स्वागताला हजर असतात.

प्रचि ३६

गडा वरिल प्रमुख मंदिरांपैकी गणेश मंदिर, नीलकंठ महादेव मंदिर, बवान देवी, पितालिया, प्रसवनाथ मंदिर इत्यादी मंदिरांचे बांधकाम मुख्यत्वे १४ ते १५व्या शतकातील आहे.

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

पगडा पोल मधुन आत प्रवेश केल्यावर दुमजली 'कुंभा महाल' नजरेत भरतो. राणा फतेह सिंग यांनी १८व्या शतकात 'बादल महाल' उभा केला. बाले किल्ला शोभावा असा हा महाल गडावरिल सर्वोच्च ठिकाणी आहे.

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

नीलकंठ महादेव मंदिर शेजारी रोज संध्याकाळी दाखविला जाणारा 'Light & Sound Show' केवळ अप्रतिम असतो.

प्रचि ४४

प्रचि ४५

------------------------------------------------------------------------------------
माहिती स्तोत्र : Wikipedia

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंद्रा मस्त फोटो... आम्ही गेलो होतो तेव्हा नेमके राजवाड्यात कोणाचे तरी निधन झाले होते त्यामुळे राजवाडा बंद होता... तो बघायला मिळालाच नाही.. पण बाकीची ठिकाणे बघितली होती.. राजवाडा फोटोतच बघितला आहे.. फोटो मस्त आलेत..

हल्दी घाटीची तिथे गुलाब जल आणि गुलकंद घेतलात की नाही.. तिथल्या गुलाबाच्या फुलांचा वास अप्रतिम असतो.. मस्त दरवळ असतो त्या परिसरात..

सुंदरच फोटो,

माझ्या दोन आठवणी मुद्दाम लिहिण्यासारख्या...

राजवाडा उघडायला अवकाश होता म्हणून आम्ही एका देवळात थांबलो. तिथे एका वृद्धाने सहजच मीराबाईचे भजन ( एरी मै तो ) गायला सुरवात केली आणि तिथेच असलेल्या एका वृद्ध स्त्रीने सहजच नाचायला सुरवात केली. इतके उस्फुर्त गायन आणि नृत्य मी आयूष्यात कधी, आधी वा नंतर बघितले नाही.

राजवाड्यातल्या गच्चीवर एक अंध गायक, स्वतः तबला वाजवत गात होता.. मला त्याचे गायन खुप आवडले. मी त्याला तिथे धमार ऐकवायची फर्माईश केली, त्याने ऐकवलेला, आयो फागण मास, हा धमार अजूनही कानात आहे. त्याने एकट्यानेच, तबला वाजवत हे गायन केले होते.

तिथल्या गुलाबाच्या फुलांचा वास अप्रतिम असतो.. मस्त दरवळ असतो त्या परिसरात..>> अगदी अगदी.
पुष्करमध्ये सुद्धा अशीच खूप छोटे गुलाब दिसले. वास तर काय त्यांचा, नुसता घमघमाट पसरलेला असतो. आम्ही गेलो होतो, तेव्हा काहीतरी कार्यक्रम होता, तेव्हा रस्ताभर गुलाबाच्या पाकळ्या उधळत चालले होते.

उदयपुरच्या राजवाड्यामधला साउंड आणि लाइट शो सुद्धा छान असतो. त्यात शिवाजी महाराज, मराठ्यांचा उल्लेख आहे.

तुम्ही, उदयपुरमध्ये शिरताना लागणारे, रणकपुरचे जैन मंदिर पाहिलेत की नाही? तळपत्या वाळवंटामधून आल्यावर अचानक ते पांढरेशुभ्र, भव्य संगमरवराचे मंदिर दिसणे म्हणजे एक अनुभव आहे. अप्रतीम कारागिरी आहे या मंदिरात.

धन्यवाद मित्रांनो Happy

हिम्स @ अरे राजवाडा हुकला म्हणजे उदयपुरची सफर अधुरी म्हणावी लागेल. खास राजवाड्यासाठी तरी परत जाऊन ये... पैसा आणि श्रम दोन्ही वसुल Happy

तिथल्या गुलाबाच्या फुलांचा वास अप्रतिम असतो.. >>> अगदी ... आम्ही फेब.१२ ला गेलो होतो तेव्हा गुलाबांचा सिजन नव्हता असे सांगण्यात आले. पण ती भांडी आणि गुलकंद बनवण्याची प्रक्रीया भारी आहे.

दिनेशदा @ राजवाड्या जवळच जगदिश मंदिर आहे. तेथील ठेकेदार भजन मलाही खुप आवडले होते.

स्वाती @ साउंड आणि लाइट शो नाही पाहिला कारण इतर ठिकाणं फिरायची होती.
रणकपुरचे जैन मंदिर पाहिलेत की नाही? >> आम्ही उदयपुर मार्गे गेलो होतो आणि सगळ्यात शेवटी रणकपुरचे जैन मंदिर पहायचे होते... पण शेवटच्या दिवशी थंड वातावरणामुळे चिरंजीवाची तब्येत अचानक बिघडली आणि आम्हाला रणकपुर न करताच माघारी यावे लागले.

इंद्रा... जबरी फोटोज...सगळेच एक से एक....
५ व्या प्रचिमधे खिडकीतुन खोलित पडणारे ऊन खुप छान वाटतय.
३५ मधे आकाश थोडे कमी करुन बघ.... संपुर्ण फ्रेम मधे आकाशच जास्त दिसते आहे ... ते थोडे कमी केलेस तर किल्ला जास्त उठुन दिसेल फ्रेम मधे... (हेमावैम Happy )