बावन्नपानी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 October, 2012 - 23:24

"एऽ, त्यांच्यात ना बदामसातला सत्तीलावणी म्हणतात."
"हो! आणि गुलामचोरला गुल्लीदंडा, साताठला हातओढणी आणि बेरीज झब्बूला जपानी झब्बू म्हणतात."
"मग काय झालं? नावं वेगळी असली तरी खेळ तोच ना? चला! आपणही जाऊ त्यांच्यात खेळायला."
"एऽ, पण मला ते तीनपत्ती का काय ते येत नाही खेळायला."
"एऽ, तो मोठ्यांचा खेळ असतो. आपण हिम्याकाका नाहीतर परागकाकाला सांगू हळूचकिनी आपल्याला शिकवायला, काय?"

असे संवाद ऐकू आले म्हणजे जवळपास कोठेतरी पत्त्यांचा डाव रंगात आला आहे असे समजावे!

अगदी लहानपणापासून भिकार-सावकार, पाच-तीन-दोन, एकेरी झब्बू, गड्डा झब्बू, लॅडिज, मेंढीकोट, तीनशेचार, कॅनिस्ट्रा असे पत्त्यांचे वेगवेगळे खेळ तुम्ही नक्कीच खेळला असाल! बावन्न पत्त्यांच्या बावन्न तर्‍हा! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना गुंगवून ठेवणार्‍या, गप्पांचा व आठवणींचा अड्डा जमविणार्‍या! नव्या ओळखी घडविणार्‍या व जुन्या खुणा जपणार्‍या!

या बावन्न पत्त्यांचे खेळही प्रांतांगणिक बदलतात. जितका वेगळा, नावीन्यपूर्ण खेळ तितकी डोक्याला चालना! एकेका डावासरशी रंगत जाणारे नाट्य, हमरीतुमरी, हुज्जत, सरशी - हार .... दरवर्षी सुट्टीत, प्रवासात या खेळांमध्ये पडणारी भर...

Pune-52.png

१२/१२/१२ रोजी इंडियन मॅजिक आय प्रा. लि. आणि अरभाट निर्मिती प्रस्तुत 'पुणे ५२' हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
एका गुप्तहेराची ही कथा.
पत्त्यांच्या खेळातले सारे डावपेच, सारी मजा या कथेतही आहे..

'पुणे ५२'च्या निमित्तानं तुमच्या परिचयाचे, आठवणीचे पत्त्यांचे खेळ इथे लिहूयात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळांबरोबर ते कसे खेळतात ते पण लिहा... काही खेळ नाव एकच असले तरी वेगवेगळ्य प्रकारे खेळले जातात.. किंवा काही खेळांची नावे वेगळी असतात पण तो खेळ एकच असतो... तेव्हा खेळांची जास्तीची माहिती पण लिहा...

सचिन ने वर म्हटले आहे तो लॅडिजचा डाव.. लॅडिज ४ जणात किंवा ६ जणात खेळता येते. ४ जण असतील तर सत्तीच्या वरची पाने घ्यायची आणि ६ जणात असेल तर दुर्र्या सोडून सारी पाने. दोन टीम पाडायच्या (२ च्या वा ३ च्या). पिशी पाडायची.

प्रथम ४ पाने वाटायची.

वख्खई म्हणजे काय ? :

आता समजा पहिल्या ४ पानात मला एक्दम भारी पाने आली असतील जसे की बदामचे एक्का राजा राणी आणि गुलाम किंवा बदामचे एक्का राजा आणि ईतर दोन एक्के तर मी "वख्खई" बोलणार. [वख्खई जास्तीत जास्त किती ची बोलता येईल हे डावाआधीच ठरवायचे. साधारण १ "लाडूची" ठेवायची मजा येते. १ लाडू म्हणजे ३२ कळ्या Happy ] मी "वख्खई" बोलली तर माझा भीडू पाने उपडी मांडून ठेवणार. आणि मग मी उतारी करणार. माझ्या ऊतारीवर ईतर २ लोक पाने टाकणार. अर्थात माझ्या पेक्शा चांगली पाने त्यांच्याकडे नाहीत की ज्याने ते माझे पान मारू शकतील. म्हणजेच दुसर्या टीमवर १ "लाडू" चढला. आता ही "वख्खई" कोणीही बोलू शकते. आणि सर्वात कमी ची म्हणजे ८ कळ्यांची बोलता येते. नंतर १६ आणि सर्वात जास्त ३२. साधारणपणे८ ची बोलणार जेन्व्हा ३ पाने छान आणि १ वाईट. आता हे १ वाईट एखादी राणी असेल किंवा राजा असेल आणि दुसर्या टीम मधल्या कडे त्याचाच ए क्का असेल तर "वख्खई" डुबली. डुबताना कळ्या दुप्प्ट होणार. म्हणजे पहिल्या डावात मी ८ ची बोलली आणि डुबली की १६ कळ्यानी आमच्या टीम वर पिशी.

साधा डाव :

समजा कोणीच "वख्खई" बोलले नाही तर ईतर ४ पाने वाटायची. ह्या ४ पानात हुकुम दडवायचा. मग नेहेमी खेळतो तसे हात करून घ्यायचे. ज्यांच्यावर पिशी आहे त्यानी ५ हात करायचे. नाही जमले आणि ३ हात झाले तर त्यांच्यावर ५ कळ्या चढणार. जर समान हात झले तर पिशी चालू. जर ५ हात झाले तर १० कळ्या उतरणार.

६/ ८ हात बोलणे म्हणजे काय? :

आता पूर्ण पाने वाटून झाली आहेत. समजा माझ्याकडे बदामचा भरणाच भरणा आहे आणि ईतर २-३ फालतू पाने आहेत तर मी माझ्या पार्ट्नर ला तू किती हात देणार असे विचारू शकतो. पार्ट्नर कडे एखादा एक्का असेल तर तो म्हणेल १ नसेल तर काहीच नाही. मला खात्री असेल की मी बदाम हा हुकुम बोलून ६ हात करू शकेन तर मी ६ बोलणार. हे कोणीही बोलू शकते. गुण वरिल फॉर्मुला प्रमाणेच Happy

मुंगूस
बेरीज झब्बु ने पानांची वाटणी करून मग गड्डेरी झब्बु
चॅलेंज
सात-आठ
पाच-तीन-दोन
नॉट अ‍ॅट होम
बदाम सात
स्मरणशक्ती (जोडीची पाने निघाली तर हात)

एकट्याला खेळायचे असेल तर
घड्याळ लावणे,
पत्त्याचे बुद्धिबळ (conventional बुद्धिबळाचा ह्या खेळाशी काही संबंध नाही!)

पत्त्यांनी करून दाखवायच्या जादू ही खूप आहेत.
"ठ" ची जादू
वाक्य सांगून क्लू पास करून पान ओळखणे

गुलामचोर, ३०४, मुंगुस .. नॉट अ‍ॅट होम ला आम्ही नाट्या काट्या ठोम म्हणायचो आणि पान नसेल तर "माझा तुला ठोम " असे Happy त्याचे खरे नाव नॉट अ‍ॅट होम असे आहे हे बरेच उशीरा समजले Sad

बदामचा भरणा >>> आम्ही म्हणायचो भरांडा! Lol

त्या निमित्ताने पत्ते खेळताना वापरले जाणारे शब्द ही लिहूयात! जसे एकाच रंगाची खूप पाने असतील तर म्हणायचे
"बदामचा भरांडा"!

आणिक

भजं .. (इस्पिकचा एक्का)
गुल्लू - गोटु किंवा गुलामचे पान

'नॉट अ‍ॅट होम' खेळताना एकाने समजा आपल्याकडे पाने मागितले आणि आपल्याकडे ते नसले की अत्यानंदाने आम्ही असे म्हणत असू "आटे नाटे काटे कराडे काटे कट कट ठोम" (थोडक्यात 'नॉट अ‍ॅट होम'!)
Rofl

त्या निमित्ताने पत्ते खेळताना वापरले जाणारे शब्द ही लिहूयात! >> +१ आणि खुणा सुद्धा .. खुणा आठवत नाहीयेत Sad

भजं +१११११११११११११ कसल भारी वाटल एक्दम Happy

नव्वी = नश्शी

पिकपिक = ईस्पिक

त्या निमित्ताने पत्ते खेळताना वापरले जाणारे शब्द ही लिहूयात! >> +१ आणि खुणा सुद्धा .. खुणा आठवत नाहीयेत

>>>>>>> लॅडीज आम्ही लाडू म्हणायचो. ३२ कळ्या चढल्या कि १ लाडू.

हुकुम बोलताना चौकट हुकुम सुचवण्यासाठी भिडुला दात दाखवायचो Proud
त्यालापण चौकटची चांगली पान असतील तर हुकुम चौकटच Happy

तशा खुणा दरवेळी बदलल्या जायच्या.

आमच्याकडे वरती लंपनने लिहिलेला वख्खईचा डाव भारी फेमस. मी, माझी आज्जी, पप्पा, मम्मी, काका, दादा असले सर्व नमुने खेळायला बसलो की आमचे आजोबा इकडे तिकडे फिरत म्हणायचे "सगळे खानदानी जुगारी आमच्याच घरात आहेत." आजोबा ब्रिज खेळणार्‍यापैकी. कसल्यातरी क्लबात जाऊन ब्रिज खेळायचे.

लंपन, आमच्याकडे माझे सहा, नाही माझे सात, नाही माझे आठ अशी पण बोली लागत बसते.

वख्खईला पिसणारा माणूस हुशार पाहिजे. बरोबर पत्ते लावणे हे वख्खई मिळण्याचे प्रमुख कारण असतं. Happy

आमचा पत्त्याचा डाव एकदा चालू झाला की संपायचाच नाही. भिडू बदलत रहायचे. भरपूर भिडू झाले की घरात असतील नसतील तेवढे कॅट घेऊन चॅलेंज खेळायचं. नऊ राजे ऊपर नऊ, माझे दहा असं काय वाट्टेल ते फेकत खेळायचं.

नॉट अ‍ॅट होम खेळताना आम्ही म्हणायचे "नाट्याच्या काट्याला ठूम मारली"

लंपन, आमच्याकडे माझे सहा, नाही माझे सात, नाही माझे आठ अशी पण बोली लागत बसते.
>>>>> +१

"नाट्याच्या काट्याला ठूम मारली" >>>> Lol

लब्बाडी करायची ना! >>> Proud

उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या गच्चीवरच्या जिन्यात खेळलेल्या झब्बुच्या खेळाबरोबर त्या गच्चीत वाळत घातलेल्या आणि अर्धवट सुकलेल्या पापड, पापड्या, कुरडयांची चविष्ट आठवण आहे. Happy

नॉट्याठोम खेळताना आणि विशेष करून म्हणताना कसला आवेश असायचा! Happy

सगळ्यात पहिले शिकलेला पत्यांचा खेळ म्हणजे भिकार सावकार. दोन भिडू लागणार. सहसा घरातलं लहान मूल आणि आई किंवा बाबा. घरात मिळतील तितके पत्ते गोळा करायचे. पत्यांचे रंग, रूप, आख्खा संच इ. क्षूद्र गोष्टी लक्षात न घेता रीतसर पिसून, काटून आणि पुन्हा पिसून त्याचे दोन सारख्या उंचीचे भाग करायचे. दोघांसमोर उपडे गठ्ठे ठेवायचे. एकेक पान काढून मध्ये टाकायचं. बदाम वर बदाम पडलं की त्याचा हात. या खेळात नेहमी म्हणत रहायचे 'इस्पिक (किंवा चौकट/ बदाम/ किलवर )वर इस्पिक (किंवा चौकट/ बदाम/ किलवर ) माझा हात'. ही त्या लहान मुलाकरता पत्यांची ओळख. ज्याचा गठ्ठा संपेल तो भिकारी मग त्यानं सावकाराकडून पाच पत्ते उधार घेऊन खेळ पुढे सुरू ठेवायचा.

वख्खईला पिसणारा माणूस हुशार पाहिजे. बरोबर पत्ते लावणे हे वख्खई मिळण्याचे प्रमुख कारण असतं. >> +१

आमचा पत्त्याचा डाव एकदा चालू झाला की संपायचाच नाही. भिडू बदलत रहायचे. >> +१

उन्हाळ्यच्या सुट्टीत वाड्यात आमच्या ओसरीवर दुपारी १२-१२.३० ला जे पत्ते सुरु होत ते ४.३० - ५ लाच संपत. ह्यात सारेच असत आई, शेजारचे पाजारचे काका काकू.. Happy धमाल यायची.

नॉट्याठोम खेळताना आणि विशेष करून म्हणताना कसला आवेश असायचा! >> तसाच आवेश कटपी असताना मोठे पान मारताना असायचा विशेषकरून एक्क्याला सत्ती अट्ठीने मारताना Happy

कोकणात, मेंढीकोट हा खेळ फार लोकप्रिय होता. सर्व पाने वाटायची, चार खेळाडू...हुकुम, भिडू वगैरे लॅडिज सारखेच, पण जिंकलेल्या हातात, जास्त मेंढ्या म्हणजे दश्श्या असतील, ती टीम जिंकते, चारी मेंढ्या मिळाल्या
तर तो मेंढीकोट... शिवाय खेळताना पत्ते खेळू असे न म्हणता, इस्पिकांन खेळू या असे म्हणत.

माझा आणि माझ्या बालमैत्रिणीचा खेळ म्हणजे दोघात खेळायचा, चित्रलॅडीज, यात फक्त एक्का, राजा, राणी आणि गुलाम हेच पत्ते घ्यायचे. बाकी खेळ तोच.

गोव्याला माझ्या घरी एकावेळी अनेक मायबोलीकर रहायला आले होते, त्यावेळी आम्ही जो खेळ खेळलो होतो, त्याचा स्कोअरबोर्ड अजून मी जपून ठेवलाय... ९ वर्षे झाली त्याला.

जी एस, क्षिप्रा, सई, आरती, गिरीराज, आरतीची बहीण आणि मी असे खेळलो होतो.

मेंढीकोट हा खेळ फार लोकप्रिय होता.
>>>> आमच्याकडे मेंढीकोट खेळताना हुकुम दडवी असायचा. कटपी उतारी लागली कि हुकुम खोलायचा, अर्थात त्या खेळाडूची इच्छा असेल तरच.

लहानपणी एकदा आजारी होते त्यामुळे पडून होते. मग संध्याकाळी मला कंटाळा आला म्हणून आई माझ्याबरोबर पत्ते खेळत बसली होती. त्याचवेळी आमच्या बिल्डिंगमधले एक सौदिंडियन काका घरी काही कामाला आले आणि आम्ही तिन्हीसांजेला पत्ते खेळतोय पाहिल्यावर अगदी कळवळून आम्हाला ओरडले होते की लक्ष्मी घरी यायच्यावेळी तुम्ही पत्ते कसे काय हातात घेतलेत? अ‍ॅक्युअली त्या ओरडण्यामागे इतका जिव्हाळा होता की आमची काहीतरी चुकच झाली असं वाटलेलं.

त्यानंतर बरेच वर्षांनी दिवाळीच्या रात्री नॉर्थ इंडियन मंडळी मुद्दाम तीनपत्ती खेळतात असं ऐकलं, वाचलं तर त्यावेळी त्या सौदिंडियन काकांच्या जागी मी जाऊन बसले. सणासुदीला कसे काय जुगार खेळतात लोकं असं वाटलं. गंमत म्हणजे दिवाळीच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून जुगार खेळतात.

दोन संस्कृतीतल्या विचारसरणींतला फरक, नं काय! Happy

गोव्याला माझ्या घरी एकावेळी अनेक मायबोलीकर रहायला आले होते, त्यावेळी आम्ही जो खेळ खेळलो होतो, त्याचा स्कोअरबोर्ड अजून मी जपून ठेवलाय... ९ वर्षे झाली त्याला.

>>>
Happy

गोव्याला माझ्या घरी एकावेळी अनेक मायबोलीकर रहायला आले होते, त्यावेळी आम्ही जो खेळ खेळलो होतो, त्याचा स्कोअरबोर्ड अजून मी जपून ठेवलाय... ९ वर्षे झाली त्याला.
>>> वॉव, दिनेशदा! लै भारी. Happy

तो एक जजमेंट नावाचा खेळही भारी असतो. मग डिटेलमध्ये लिहिन त्याबद्दल. त्याआधी कोणाला स्फुर्ती झाली तर कसा खेळायचा ते लिहा. Happy

मामी बरेच घरात मुलांना पत्त्ते खेळण्यावर मनाई असते. माझे असे अनेक मित्र होते. पत्ते म्हणजे फार वाइट असेच मत असायचे.

तो एक जजमेंट नावाचा खेळही भारी असतो. मग डिटेलमध्ये लिहिन त्याबद्दल. त्याआधी कोणाला स्फुर्ती झाली तर कसा खेळायचा ते लिहा. >> मला येतो पण लिहिणे .. पास Happy त्यात मार्क मांडायचे असतात ना?

Pages