देवो कुणीही काही दिलासा, रोगास माझ्या उपचार नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 October, 2012 - 11:14

गझल
देवो कुणीही काही दिलासा, रोगास माझ्या उपचार नाही!
ठाऊक आहे, हेही मला की, मी फार आता जगणार नाही!!

माझ्या उशाशी आयुष्य त्यांचे वर्षानुवर्षे जागेच आहे;
कालांतराने होईल सुटका माझी, असा हा आजार नाही!

अपरात्र झाली, आताच ये तू, येईल संगे, मृत्यू तुझ्या मी!
झोपेत आहे दुनिया, कुणाला काहीच आता कळणार नाही!!

यावा कवडसा अगदी तसा हा काळोख येतो हृदयात माझ्या;
तुम्हास माझ्या अस्वस्थतेचा अंदाज केव्हा येणार नाही!

भाळून झाले रूपावरीही, मोहून झाले रंगावरीही;
मी कोण आहे? जग काय आहे? कळते मला, मी फसणार नाही!

माझाच वारा, माझ्याच लाटा, माझी नदी अन् माझा किनारा!
मी ओघ आहे वेड्या अनादी, कोणामुळे मी थिजणार नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल फार आवडली.

माझ्या उशाशी आयुष्य त्यांचे वर्षानुवर्षे जागेच आहे;
कालांतराने होईल सुटका माझी, असा हा आजार नाही!<< वा वा

अपरात्र झाली, आताच ये तू, येई संगे, मृत्यो तुझ्या मी! (असे करावे लागेल मला वाटते)
झोपेत आहे दुनिया, कुणाला काहीच आता कळणार नाही!! << छान

यावा कवडसा अगदी तसा हा काळोख येतो हृदयात माझ्या;
तुम्हास माझ्या अस्वस्थतेचा अंदाज केव्हा येणार नाही! << दोन्ही मिसरे स्वतंत्ररीत्या आवडले.

भाळून झाले रूपावरीही, मोहून झाले रंगावरीही;
मी कोण आहे? जग काय आहे? कळते मला, मी फसणार नाही! << छान

माझाच वारा, माझ्याच लाटा, माझी नदी अन् माझा किनारा!
मी ओघ आहे वेड्या अनादी, कोणामुळे मी थिजणार नाही!! <<< चांगला शेर

गझलेसाठी अभिनंदन प्रोफेसर साहेब

-'बेफिकीर'!

येईन संगे, मृत्यो>>>>> हेच सान्गायला अलो होतो

वृत्त मस्त निवडले आहे निभावलेयही मस्त
काही खयाल नेहमीचे देवपूरकर स्टाईल नाहीयेत त्यामुळे गझल हटके झाली आहे
सर्व शेर मस्त

यावा कवडसा अगदी तसा हा काळोख येतो हृदयात माझ्या;
तुम्हास माझ्या अस्वस्थतेचा अंदाज केव्हा येणार नाही!>>>>>>>> हा सर्वोत्तम वाटला

धन्यवाद

सदनिकेची झाडलोट करतो आहे असे दाखवून चपळाईने मधून मधून टाईप करतो आहे! compचे अग्निहोत्र त्या उठायच्या आधीपासूनच चालू असते! त्या लवकर जागृत होवू नये म्हणून बरीच काळजी घेतो, तरीही बाईसाहेब जाग्या होतातच व चारदोन प्रेमाच्या शिव्या हासडून जातात. अत्यंत कावेबाजपणे व सफाईने आम्हास लिखाण करावे लागते. पण आम्ही आमचा कार्यभाग साधतोच!

शेवटचे दोन शेर नसते तरी चालले असते.

आधीचे चार शेर तूफान.

ठेवणीतल्या पैठण्या काढायला लागलायेत की काय प्रोफेसर? (हलके घ्या कृपया)

विजयराव, धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
आमचे जुने, दोन शेर देण्याचा मोह अनावर होत असल्याने, ते इथे देत आहोत, पहा कसे वाटतात ते.............. (२५-०६-९३रोजी लिहिलेले)

का स्तुतीमुळे हुरळू मी? का निंदेने कचरू मी?
परमेश्वर आता देतो लेखणीस माझ्या वाणी!

थकतील हात खणताना, उरतील हिरे अर्थांचे;
ह्या नव्हेत गझला माझ्या, ह्या चैतन्याच्या खाणी!

.........प्रा.सतीश देवपूरकर

देवो कुणीही काही दिलासा, रोगास माझ्या उपचार नाही!
ठाऊक आहे, हेही मला की, मी फार आता जगणार नाही!! << व्वा ! >>>

माझ्या उशाशी आयुष्य त्यांचे वर्षानुवर्षे जागेच आहे;
कालांतराने होईल सुटका माझी, असा हा आजार नाही!

अपरात्र झाली, आताच ये तू, येईल संगे, मृत्यू तुझ्या मी!
झोपेत आहे दुनिया, कुणाला काहीच आता कळणार नाही!!

यावा कवडसा अगदी तसा हा काळोख येतो हृदयात माझ्या;
तुम्हास माझ्या अस्वस्थतेचा अंदाज केव्हा येणार नाही!<<<< सुंदर>>>

मस्त गझल सर

निवडक १० मधे घ्यावीच लागली....

भाळून झाले रूपावरीही, मोहून झाले रंगावरीही;
मी कोण आहे? जग काय आहे? कळते मला, मी फसणार नाही!

माझाच वारा, माझ्याच लाटा, माझी नदी अन् माझा किनारा!
मी ओघ आहे वेड्या अनादी, कोणामुळे मी थिजणार नाही!!

सकस आणि सखोल लिहीलत.