एक मजेशीर निरिक्षण

Submitted by रमेश भिडे on 23 October, 2012 - 12:27

हा विषय माझ्यामते चर्चा करायला फार काही आक्षेपार्ह विषय नाहीये असं माझं मत असुन त्याकरता एका वेगळ्या विनोदी ढंगाने तो मी शेअर करु इच्छितो ( एकता कपुरसारख्या निर्मात्यांनी EXTRA MARITAL AFFAIRS ना जी प्रतिष्ठा व प्रसिध्दी मिळवुन दिली आहे त्यानुसार हा विषय आता एखाद्या CEO पासुन अशिक्षित मजुरापर्यंत सगळ्यांना भली भांती परिचित आहे) विवाहबाह्य संबंध ही माझ्यामते समाजाला लागलेली किड आहे..जी समाज आतुन पोखरत आहे. माझ्या निरिक्षण व अनुभवानुसार लहान खेडेगावापासुन मोठ्या शहरापर्यंत अगदी दर १५/२० घरांपैकी एका घरात या किडीने आपले स्थान घट्ट केले आहे...माझ्या संपर्कात येणा़ऱ्या व्यक्ति, त्यांचे विचार यावरुन मी त्यांनी याचे कसे उद्दात्तीकरण केलं आहे ते सांगतो...विवाहबाह्य संबंधांमागे माझ्यामते फक्त आणि फक्त "लैंगिक आकर्षण" हे एकमेव कारण आहे आणी असते...या मतावर मी येण्यापुर्वी अनेक लोकांची निरिक्षणे करुन त्यातुन हा निष्कर्ष काढला आहे...हा निष्कर्ष साफ चुकीचा आहे हे मत तुमच्यापैकी अनेकांचे असु शकते...पण माझ्या या निरिक्षणाला माझा १८/१९ वर्षाचा अनुभव, दांडगा जनसंपर्क, लोकांशी झालेल्या चर्चा, दर महिन्यातुन किमान ५ केसेस "हॅंडल" करण्याचा अनुभव अशा अनेक गोष्टी आहेत...मी मनाने अत्यंत मोकळा व सुज्ञ असलो तरी असल्या फालतु गोष्टिंचा मला तिटकारा आहे...विवाहबाह्य संबंध का आहेत याची मला मिळालेली चर्चात्मक स्पष्टीकरणे...व त्यानंतर कंसात माझे विचार...

१) " मी माझ्या बायकोशी मनाने कधीच एकरुप होऊ शकलो नाही"( अरे मग सोंड्या ...तुझ्या या आयटमला लॉज वर घेऊन तिथे काय मनाने एकरुप होतोस वाटतं)

२) माझी माझ्या बायकोबरोबर/माझ्या नवऱ्यबरोबर कधीच "Psychological Temparament"(काहीतरी भयंकर कठीण) जुळली नाहीत..त्याने मला कधीच समजुन घेतलं नाही(व्वा..व्वा...मग तु त्याला/तिला कधी समजुन घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का?)

३) माझी माझ्या बायकोबरोबर Intellectual Compatibility नाहीये...(हो का, उत्तम...मग एखादा तत्वज्ञ मित्र का बरे नाहीये तुझा? ही जी रंभा तुझ्या बाजुला बसली आहे ती Intellectual compatibility बरोबर आणखीन बरंच काही का देते तुला...चर्चा करा आणि आपापल्या घरी जा असे का नाही तुमचे?)

४) लग्नानंतर मला प्रेम मिळाले नाही...ते हिच्यामुळे ( शेजारी बसलेली अप्सरा) मिळाले...TRUE LOVE( अरे भोXXXX पन्नाशी आली आता लव्ह सुचतय काय रे तुला? आणि तुझी पोरे सांभाळत बसलेली बायको दिसत नाही का रे तुला?)

५) "अहो तसं काही नाही...अज्जिबात Physical नाहीये...आमचं "प्लेटोनिक" रिलेशनशीप आहे....( अच्छा अच्छा....प्लेटोनिक रिलेशनशीपसाठी मग गपचुप गपचुप महाबळेश्वरला का रे जावे लागते? घरी खोटे बोलुन?)

६) हिला बघितल्यानंतरच मला लक्षात आलं...हीच खरी माझी बायको व्हायला हवी होती.. आत्ताची आहे ती ना एकदम बेक्कार आहे हो. तिला संसार करणे जमतच नाही...( हो का बैला...मग लग्न करताना काय डॊळ्यावर झापडे लावुन बोहोल्यावर चढला होतास? संसार जमत नाही मग तुझे घर इतके टिपटाप कसे ठेवते? मुले अभ्यासात हुशार कशी काय रे तुझी? ती बॅंकेत नोकरी करुन हे कसं सांभाळते? आणी म्हणे संसार करणे जमत नाही तिला...)

७) तुम्हाला नाही कळणार हो ...लग्न हा THE END नसतो...पुरुषाला आणि बाईला अजुन खुप काही हवं असतं. जे एका व्यक्तित कधीच मिळत नाही आणि मिळणार नाही...( हो का? अच्छा अच्छा...म्हणजे या आयटमलाही तु लवकरच सोडुन देणार आहेस असं दिसतय)

असे अनेक युक्तिवाद आणि पळवाटा....पण मित्रांनो मी सांगतो. आज हा प्रकार मी जितक्या जवळुन बघतोय इतका आपल्यापैकी खुप कमी लोकांनी अनुभवला,बघितला असेल. विवाहबाह्य संबंध ही सुशिक्षित-सुसंस्कृत म्हणवुन घेणाऱ्या आपल्या संस्कृतीला लागलेली अशी एक कीड आहे की जी बरी करणे खुप कठीण आहे..अनेकांचे संसार बरबाद झालेले मी बघितलेत...अनेक मुले वाऱ्यावर सोडुन दिली आहेत....लोकं कर्ज घेऊन ही लफडी करतात...आपापल्या वैवाहिक जोडीदाराला फसवतात...( वर दिलेली उदाहरणे व संवाद हे स्त्रीपुरुष दोन्ही बाजुने होणारे आहेत, मी फक्त प्रातिनिधीक एकाच बाजुने लिहिले आहेत पण हे दोन्ही बाजुने बोलले जाते)...यात दोष कोणाला देणार?

......शिक्षणामुळे आलेला अहंकार?......टिव्हीवरच्या सिरिअल्स?......अतृप्त व आटोक्यात न येणारी असंयमीत वासना?......पैशाचा माज?......स्वार्थ?......की आणखीन काही?

आधारित*

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनोदी अन्गाने मान्डला तरी हा विषय पायात बोचलेल्या बाभळीच्या काट्यासारखा सम्पुर्ण समाजाचेच कुरपं करून पोखरतोय, अन तथाकथित सुशिक्षित विद्वान व्यक्तिस्वातंत्र्य आळविताहेत.>>>>असहमत ,-100

मण्डळी मी काही वर्शापूर्वी भारतात होतो , , माझा मित्र ज्योतिशी आहे ,त्याच्या अनुभवावर आधारित* हा लेख आहे ,हे सुरुवातीलाच स्पश्ट केलेले आहे...............

>>> .>>>>असहमत ,-100 <<<<< Lol
अस्णारच असहमत, त्यात तुमचा काय बी दोष नै.
असो.
आमचा समाज ढोन्गी आहे, अन अशा ढोन्गी समाजाने बहुमताने(?) निवडलेले सरकारही तितकेच किंबहुना काकणभर सरसच ढोन्गी आहे.
गावोगावी, गल्लोगल्ली मोकळ्या भिन्तीन्वर, गाड्यान्च्या पार्श्वभागावर, सरकारी हापिसात वगैरे "एड्स" निर्मुलनानिमित्ये, "कंडोम वापरा, सुरक्षित संभोग करा" या जाहिराती जन्तेच्या पैशाने करणारे सरकार प्रत्यक्षपणेच संदेश देत अस्ते की कुठेही शेण खा, फक्त कंडोम वापरुन करा तर तुम्ही सुरक्षित रहाल! या देशात एड्स्ने अशी कितीशी माणसे मरतात? अन त्याकरता देशभर हा व्यभिचाराचा कित्ता हे सरकार कुणाच्या सान्गण्यावरुन शिकवते? हे प्रश्न आम्हाला पडत नाहीत कारण आम्हीही त्या ढोन्गात सहभागी अस्तो, व आयुष्यात कधीना कधी तरी "सुरक्षितपणे" शेण खाण्याची स्वप्ने मनातल्या मनात बघत अस्तो.
अन जन्तेच्या आरोग्याचा इत्का कैवार घेऊन जिथेतिथे कंडोम वापराच्या जाहिराती करीत सुटणारे सरकार, दुसरी कडे "दारूच्या" बाबतीत मात्र भलताच पावित्रा घेते. जिथे तिथे दारूची दुकाने, परमिट रुम्स व बार, देशी दारुचे अड्डे वगैरेन्ची रेलचेल हेच सरकार करते, इतकच नव्हे तर याच सरकारातील सहभागी दारूधन्द्यामधेही सर्रास सहभागी अस्तात. मग एड्स पेक्षा कित्येक पटीन्नी माणसे मारणार्‍या व संसार उद्ध्वस्त करणार्‍या दारूला मात्र हे ढोन्गी सरकार वेगळा न्याय का लावते?
एखादी परकी सत्ता ज्याप्रमाणे एतद्देशीयान्चे दीर्घकालीक नुकसान होण्याचे दृष्टीने ज्या ज्या योजना आखेल्/आखू शकेल, त्या तशा परकी सत्तेलाही लाजविल अशी धोरणे येथिल ढोन्गी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे महाढोन्गी सरकार आखते, व राबवते.
याचे कारण हेच आहे कि "बहुसन्ख्यान्ना" शेण खाणेच आवडते, व्यभिचारच हवाहवासा वाटतो, अन म्हणूनच संभोगाकरीता कंडोम वापराच्या राजरोस जाहिराती त्यान्ना खुपत नाहीत, उलट उपयोगी वाटतात, अन दारूच्या बाबतीत तर काही बोलायची गरज आहेच का? ती देखिल या ढोन्गी समाजाचीच आवडती आहे!
तेव्हा वरील लेख गम्भिरपणे न घेता, विनोदी अन्गाने वाचावा व ज्याने त्याने आपापल्या "योजलेल्या" Proud कामान्ना लागावे हेच बरे! नै का?

माझ्या ऐकण्या-वाचण्यात आल्याप्रमाणे विबासं शहरापेक्षा खेडेगावात जास्त प्रमाणात (आणि जास्त उघडपणे) असतात!

लिंबूटिंबू, अगदी समर्पक निरीक्षण! विबासंचं पण तेच होणार, जे विवाहाचं होतं. मग एक जोडीदार सोडून दुसरी मग तिला सोडून तिसरी, आणि पुढे कायकाय! यातून वासना बळावत जाते आणि म्हातारपणाने देह जर्जर झाला की मन:शांतीचा नाश होतो. तेव्हा वेळेवर सावध झालेलं बरं.
आ.न.,
-गा.पै.

उष्ट्राणांहि विवाहेषु, मंत्रान्गायंती गर्दभः
परस्परं प्रशंसंती, अहोरूपमऽहो ध्वनी:||

अगदी समर्पक निरिक्षण!

रच्याकने : 'इथे' नीट रहा. मग 'वर' गेलात की उर्वशी टकलावर तेल थापेल, अन रंभा समोर नृत्य करेल. मेनका तिकडे ढेमशी चिरत बसलिये स्वयंपाकघरात. तिथे विबासं नाहीत, कारण या अखंड्कुमारिकांना विवाह करायची पर्वान्गी नै. <-- ह्ये आसं काब्रं भो? -(चार्वाक) इब्लिस

वर्ती गेल्यावर ८६ कुमारिका अस्तात असं पण सांग्तात म्हणे 'त्या' धर्मात? आणि आपल्याकडे काय अस्तं वेगळं? थितं जाऊन करायचं थे हितं केलं तर तुम्च्या प्वाटात का दुख्ल? लै हमसून हमसून इवळंत पर्तिसाद लिव्लेत लिंबू मारून. हितं काय भेळ खाय्ला येत्यात काय लोक?
स्वर्ग प्रिथ्वीवर आण्ला म्हून लै लोकाना धन्नेवाद दिल्ते की नै? आम्क्याने पारिजातक आन्ला. तम्क्याने गंगा आन्ली. आम्ही विबासं आन्लेत. ही प्रिथ्वी आन हे विबासं आन हा स्वर्ग! (म्हना बरं धन्नेवाद!)
आम्ही आत्ता मज्जा कर्नार.
तुमी 'वर' गेल्यावर करा Wink
हीच 'त्याची' मर्जी हाये.
हाकानाका
धन्नेवाद!

या जाहिराती जन्तेच्या पैशाने
"ज न ते" चा अर्थ कंडोमच्या अनुषंगाने लक्षात घ्या लिंबाजीराव. जनते, त्याच जनतेच्या भल्यासाठी जाहिरात आहे ती. सरकारकडे काय चित्रगुप्ताकडून हुंड्या येत नाहीत वटवायला. Wink पैकं जनतेनेच द्यावे लागतात.

>>limbutimbu | 26 October, 2012 - 04:52

लिंबू, अगदी बिनडोक पोस्ट!

मृण्मयी, सायो
+१००००००००००००००००००००००००००

असं बोलतोय जसं काही विबासं हे नवीन जमान्यातलं पाश्चात्यांकडून आलेलं खूळ आहे. जगातल्या कुठल्याही संस्कृतीत (भारतीय संस्कृतीत सुद्धा) जिथे विवाह व्यवस्था आली तिथे वेश्याव्यवस्था पण निर्माण झालेली आहे.
करू नका म्हणल्याने, त्यावर भाषणे ठोकल्याने, देवाधर्माची भिती घातल्याने विबासं थांबणार नाहीत हे उघड आहे. निदान महाभयंकर रोगाची धास्ती म्हणून काळजी तरी घेतली जावी या दृष्टीकोनात आक्षेपार्ह काहीही नाही.

झापड लावण्याला तरी लिमिट असते.

गामा, धन्यवाद Happy
[समर्पक अन अचूक म्हणजे तरी निरिक्षणात कित्ती अचूक यावं, नै? Wink
अगदी लग्गेच हा सूर्य अन हा जयद्रथ या न्यायाने प्रत्यय यावा.... Proud ]

नीधप,

>> असं बोलतोय जसं काही विबासं हे नवीन जमान्यातलं पाश्चात्यांकडून आलेलं खूळ आहे. जगातल्या
>> कुठल्याही संस्कृतीत (भारतीय संस्कृतीत सुद्धा) जिथे विवाह व्यवस्था आली तिथे वेश्याव्यवस्था
>> पण निर्माण झालेली आहे.

माझ्या माहितीप्रमाणे हिंदु धर्मात वेश्यांसाठीही आचारसंहिता (code of conduct) होती. अडचण अशी आहे की आज ही आचारसंहिता वेश्यांना पाळता येत नाही. कारण की बहुसंख्य वेश्या बळजबरीने त्या व्यवसायात ढकलल्या जाताहेत. त्यावर उपाय करण्याऐवजी सरकारने सवंगपणे निरोध वापरायला सुचवले आहे. हे म्हणजे एकीकडे दारूची जाहिरात करायची आणि दुसरीकडे यकृत प्रत्यारोपण पेढ्या उघडायच्या. काय परिणाम होणार ते उघड आहे.

आजून एक प्रश्न : वेश्यागमन आणि विबासं एक धरायचे का वेगवेगळे? वेश्यागमनात पुरुषाची मानसिक गुंतवणूक नसते असं गृहीत धरून हा प्रश्न विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

limbutimbu | 26 October, 2012 - 17:52 नवीन
>>> .>>>>लेमन्या, जरा पौराणिक कथा वाच, त्यातला 'काम' हा भाग काढला तर त्या कथांना शुन्य अर्थ राहील.पॉलीगामीची इच्छा उत्क्रांतीच्या टप्प्यात विकसीत झाली आहे, पॉलीगामीचे मानसशास्त्र समजुन घ्या. संस्कृतीच्या नावाने टाहो फोडायची गरज नाही.

आजून एक प्रश्न : वेश्यागमन आणि विबासं एक धरायचे का वेगवेगळे? वेश्यागमनात पुरुषाची मानसिक गुंतवणूक नसते असं गृहीत धरून हा प्रश्न विचारतोय.<<<

हा प्रश्न कोणासाठी आहे माहीत नाही. पण या दोहोंत (माझ्यामते) भलताच मोठा फरक आहे.

=================================

लिंबूंटिंबूंच्या पोस्टवर काय म्हणावे तेच कळत नव्हते. शेवटी मृण्मयींनी माझ्या भावनांना काहीसे तोंड फोडल्यासारखे वाटले. विबासंमध्ये सरकार का आणायचे हे समजेना! Sad

बेफिकीरजी,
ज्या यड*व्याने सरकारला शिव्या दिल्यात त्याच्यामतानुसार निरोधमुळे अनैतिक प्रकार वाढीस लागले आहेत .
ज्यांना एखादी गोष्ट वापरता येत नाही किंवा उपयोगाची नसते ते त्या गोष्टीलाच शिव्या देतात .. Biggrin

>>> विबासंमध्ये सरकार का आणायचे हे समजेना! <<<<
कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध "अनैतिक" मानले जाऊन ते सिद्ध करता आले तर घटस्फोट मिळू शकतो. त्याकरता शिक्षेची तरतुद आहे की नाही ते माहित नाही. कायदा सरकारच करते म्हणून सरकारचा संबंघ येतो. अन्यथा सरकार आणायचे नसेल तर मग तुमच्या साठी "खाप पन्चायतच" चान्गली, नै का? Proud
गामा, तुमचा "आजुन एक प्रश्न" भलत्ताच पॉवरफुल्ल आहे! Happy

लिम्बाजीराव,
ते नवीण ष्ट्र्याटेजी दिस्तंय माबोचं.
लेख लिवाय्चा. अन आंगाशी याया लाग्ला की गप्पांचा धागा कर्य्चा.

इचि गमभन!