चांदण्याचे रान व्हावे

Submitted by प्राजु on 23 October, 2012 - 01:44

चांदण्याचे रान व्हावे
त्यात मी बेभान व्हावे

दरवळावे आसमंती
केतकीचे पान व्हावे

तू, तुझे हे प्रेम सखया
जीवनी वरदान व्हावे

साद ऐकाया क्षणांची
प्राण सारे कान व्हावे

दु:खही गावे सुरीले
मैफ़िलीची शान व्हावे

काव्य 'प्राजू' तू रचावे
या जगी गुणगान व्हावे

-प्राजु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

pratical बोलायचे झाल्यास छोट्या बहराच्या गझल करणे म्हणजे बरीच रिस्क असते..
फार कमी जागा असते शेर गुंफायला..शेर थेट होण्याचा धोका असतो..

ही गझल मला तितकी भावली नाही...

तितकी मजा आली नाही जितकी नेहमी तुमच्या गझला वाचताना येते...

साद ऐकाया क्षणांची
प्राण सारे कान व्हावे
चांगला शेर...

काव्य 'प्राजू' तू रचावे
या जगी गुणगान व्हावे ==>
मक्ता फारच कमजोर वाटला...

शुभेच्छा..

चांदणी लाड , आपल्याला कच्ची वाटली गझल.. म्हणजे नेमके काय ते सांगाल का? एखादा शेर न आवडू शकतो. पण कच्ची म्हणाजे नेमके काय.. कुठे तंत्र चुकलेय काय? जरा स्पष्ट कराल का?

बाकी मंडळींचे आभार. Happy

स्वच्छ लेखन आहे.

बाकी गझल ठीकठाक वाटली.

चांदणीताईंच्या पुनरागमनाने हर्षित झालेला तिलकधारी बाहुला

प्राजक्ता,

गझलेच्या प्रत्येक शेरातून आपल्याला काय सांगायचे आहे त्यातला प्रभावीपणा शेरातल्या प्रत्येक शब्दातून ओसंडायला हवा असे मला वाटते.

उदा. दरवळावे आसमंती
केतकीचे पान व्हावे

ह्यात काय आहे? ही एक सामान्य इच्छा शेर कसा होऊ शकतो? मनात आलेल्या सर्व विचारांचे शेरच करू नयेत असेही मला वाटते.

आपली अलिकडची 'धुंद होते रातराणी' ही कविता हे एक उत्तम उदाहरण आहे माझ्या वरच्या विधानाचे समर्थन करणारे. त्या कवितेतल्या भावनांचे शेर नाही केलेत हे अगदी उत्तम.

कवीने मनातली अस्वस्थता सदैव जागी राहू द्यावी पण त्या अस्वस्थतेपोटी काहीतरी लिहून गझल लिहील्याचे समाधान मानून घेऊ नये.

कमी आधिक बोलले असल्यास मोठ्या मनाने माफ करावेत.

-चांदणी लाड

चांदण्याचे रान व्हावे
त्यात मी बेभान व्हावे << "गुलजार" ओळ.

साद ऐकाया क्षणांची
प्राण सारे कान व्हावे << क्या बात !

चांदणी जी <<<<<ही एक सामान्य इच्छा>>>>>>>
>>>>समान्य कशावरून म्हणताय ??? असे काही ठोकताळे असतात का ???
मला शिकायचे आहे अधिक सविस्तर सागावे ही विनन्ती !!

आपला नम्र
-वैवकु