एक अबोल "मोरपिस"...

Submitted by prashantthakur on 22 October, 2012 - 17:50

विचरांच हे असं असतं काल पर्यंत त्या स्लॆमबुक ची आठवण पण नव्हती, काल मात्र बंड्याबरोबर गप्पा करताना विषय निघाला आणि बोलत सुटलो.

college चा शेवटचा वर्ष स्लॆमबुक भरण्याचि लगिन घाई चालू होति, स्लॆमबुक भरणे म्हणजे फ़ार काही कठीन वॆगरे असतं अशातला भाग नाही, जर तो एका मित्राचा असेल तर; पण एखाद्या मुलीचा असेल आणि ती मुलगी अगदी खास असेल तर..... तितकच अवघड होवून जात.

अशाच एका मुलीचा स्लॆमबुक माझ्याकडे आला , म्हणजे तिने दिला; एकदम अनपेक्षित पणे ती माझ्याकडे आली. मला अपेक्षाच नव्हती कारण, त्या तीन वर्षात ती खुप भाडंली मझ्यासोबत अगदी अबोलपने भाडांयची, अगदी अबोलपणे बोलयाची तिच्या अबोल नजरेन.
ती अबोल असायची कारण, तिलाही माहित होत कि, मी तिच्यावर प्रेम करतोय.

स्लॆमबुक माझ्या हातात देउन म्हणाली "लवकर परत दे" .
"बस्स... इतकच". अस्स म्हणाल ना तुम्ही.
माझ्यासाठी हेच खुप काही होत.
आता प्रश्न होता तो "काय लिहायच?"
मी तिचा स्लॆमबुक चाळुन पहिला, जवळ जवळ last लिहीणारा मी असेन मोजुन मापुन ४-५ पान उरली होती . आता काय लिहायच हा विचार करत असताना माझं लक्ष B. L. Thareja च्यां पुस्तकाकडे गेलं, अणि अवघड प्रश्नाचं साध ऊत्तर सापडल. तीन वर्षांपासुन जपुन ठेवलेल्या पिंपळपानात ते ऊत्तर दडलं होत. First Year ला असताना तिच्या वहीतून पडलेल. ते पान तिच्या स्लॆमबुक मध्ये चिटकवून त्यावर लिहीलं,
"....मी"
दुसरया दिवशी तिला स्लॆमबुक परत दिला.
तिने मला विचारल "इतक्या लवकर झाल लिहून"
मी म्हंटल"हो".
तीने स्लॆमबुक उघडलं आणि आज ती हसली त्या "....मी" बरोबर अगदी मनसोक्त हसली पण तिचं हसण सुध्दा अबोल होत तिच्या अबोल भांडणासारख.
तिने विचारल "तुझा स्लॆमबुक नाहि का देणार मला लिहायला?".
मी हसुन म्हंटल "तु माझा स्लॆमबुक लिहिण्याची गरज नाहि वाटत मला"
तीन विचारल "का?"
तिच्या ’का?’ ला खरंच किती सरळ आणि साधं ऊत्तर होत; पण मी हि अबोलपणे टाळलं आणि म्हंटल, "देतो उद्या".

आज मला ती सॆमबुक परत करणार होती. lecture सपंला आणि तिने मला बाहेर बोलावल, स्लॆमबुक माझ्या हातात देउन निघुन गेली. एका पानावर मोरपिस चिटकवुन तिन ही लिहीलं होतं,
"....मी"
ते मोरपिस आणि पिंपळपान खुप वर्षांपासुन एकत्र होते. तिच्या वहीत.
वहीतून पडलेल्या त्या पिंपळपानाची आणि मोरपिसाचि भेट होता होता राहिली..
पण मोरपिसांतली ती मात्र कायमची माझी झाली. आजही ती तशीच आहे अबोल.
एक अबोल "मोरपिस"........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

आभारी आहे...मायबोलीवर पहिल्यांदाच काहीतरी लिहिलंय...

माधव- बी ल थरेजा घेऊन जा पण त्यातल मोरपीस नाही मिळणार बंर का ? Happy