आई शाळेत असल्यापासून सांगायची की आपल्याला अभ्यासा व्यतिरिक्त काहीतरी छंद असलाच पाहिजे......तेव्हा आईचा मनातून खूप राग यायचा....वाटायचं की, हे बरं आहे हिचं....छंद म्हणून काहीतरी करत बसलं की म्हणणार, " चांगले उद्योग शोधलेत गणितं सोडवायची सोडून" आणि नाही काही केलं की म्हणणार छंद पाहिजेत..... एवढ्याशा जीवाने काय काय करायचं???
पण तिच्या म्हणण्याचा अर्थ आत्ता कळतोय....जेव्हा आपलं शिक्षण ज्यात झालं ते आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी करता येत नाहीएत अशी परिस्थिती आहे. या डिपेन्डन्ट नावाच्या प्रकाराने न कधी कधी फार निराश व्हायला होतं.....असं वाटतं की आपणच का आपली नोकरी वगैरे सोडून आलो? हा नवरा का नाही थांबला तिकडेच?
पण परत डोक्यात विचार....आता आलोय ना.......मग पुढे बघा......मागे बघून पुढे चालणं शक्य नाहीये....खड्ड्यात पडायची लक्षणं.....हे ही आईचंच एक वाक्य!
या सगळ्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे मला काही बाकीच्या मुलांसारखे छंद वर्ग वगैरे लावले नव्हते....लावले नव्हते म्हणजे मी बुडवले...... लावलेले... त्यामुळे आता जेव्हा घरात बसायची वेळ आली तेव्हा जरा दडपणच आलं की आता काय करायचं? फेसबुक वर असलं फालतू स्टेटस टाकायचं म्हणजे लाजच वाटत होती कारण "अशा" नवर्याबरोबर परदेशी जाऊन कसले तरी "घरी केलेली भेळ" किंवा "बटाटे वडे" असे फोटो टाकणाऱ्या मुलींची आम्ही तेव्हाच्या लग्न नं झालेल्या मुलींनी यथेच्छ टवाळकी केलेली होती......पण मग शेवटी करायला काहीच उरलं नाही तेव्हा कसबसं पोस्ट टाकली, " "
आणि मग काय......सुरुवात कमेंट्स ना.........या भारंभार कमेंट्स.........go on a shopping spree काय .....enjoy this time with husband काय, answer the question "what would I have done if" काय...
अस्सल पुणेरी भाषेत सांगायचं तर मनात म्हटलं, "आवरा यांना कुणीतरी....." वाट्टेल ते सांगतायत.....या सगळ्याने डोक्याला कशी चालना मिळणार? आणि अख्खा दिवस कसा घालवायचा?
मग शेवटी सगळी कडून "लॉग आउट" झाले आणि स्वतःच विचार करायला सुरुवात केली...म्हटलं, लहानपणी जरी आईकडून चित्र काढून वह्या पूर्ण केल्या असतील, शिवणाच्या परीक्षेचे लहान बाळाचे मोजे आणि स्वेटर जरी आईने विणला असेल आणि एक परीक्षा सोडून कधीच कुठला भरतकामाचा टाका आपण घातलेला नसेल तरी आई काय करायची ते बघितलं तर आहे नं? फिर वोही सही......
असं म्हणून कापड आणि सुई, रेशीम, रिंग वगैरे आणलं......जे जे दुकानात दिसेल ते उचललं अक्षरशः....... आणि त्यातून जे काही बाहेर पडलं त्याचे हे काही फोटोज.........
काही मैत्रिणींकडून सूचना आल्या की आम्ही ऑर्डर दिली तर बनवून देशील का ग? त्याबद्दल अजून विचार सुरु आहे कारण...........कारणं शोधावी तितकी आहेत.......
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
(७)
(८)
नंदिनी +१. दिवाळी अंकासाठी
नंदिनी +१. दिवाळी अंकासाठी द्यायला हवा होता.
छान आहे तुमचे भरतकाम.
छान! छंद!! माझे दर दोन
छान! छंद!! माझे दर दोन वर्षांनी बदलतात
जे नोकरी करतात त्यांनी देखील काही ना काही नवीन शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या व्यवसायाशी निगडीतच असं नाही तर पुर्णपणे वेगळं काही शिकण्यात सही मजा येते.
Pages