एक आगळा-वेगळा विश्वविक्रम

Submitted by अजित अन्नछत्रे on 17 October, 2012 - 11:46

_____________________________________________________________________

१४ ऑक्टोबर २०१२ रोजी एक आगळा-वेगळा विश्व विक्रम प्रस्थापित करण्यात आला.

Felix 1.png

या दिवशी ४३ वर्षाच्या फेलिक्स बाउमगार्टनर या ऑस्ट्रियन नागरिकाने ३९ किलोमीटर उंचीवरून उडी मारली. एका हेलियमने भरलेल्या बलूनमधून त्याला अंतराळकक्षेला लागून असणाऱ्या निर्वात stratosphere पर्यंत नेण्यात आले. हेलियम बलूनमधून त्या उंचीपर्यंत पोहोचायला त्याला अडीच तास लागले. तेथून उडी मारल्यावर जमिनीपर्यंत पोहोचायला त्याला ९ मिनिटे ७ सेकंद एव्हढा कालावधी लागला.

ही उडी मारताने फेलिक्स बाउमगार्टनर याने बरेच विश्व विक्रम मोडले:

1. सर्वात जास्त उंचीपर्यंत (३९ किमी) manned बलूनची flight
2. सगळ्यात जास्त उंचीवरून मारलेली उडी (३९ किमी)
3. जमिनीपर्यंत पोहोचण्याचा कालावधी - ९ मिनिटे ७ सेकंद
4. सगळ्यात जास्त gravity freefall कालावधी (४ मिनिटे २० सेकंद)
5. सर्वात जास्त freefall वेग (१३४२ किमी / तास ) - ध्वनी वेगा पेक्षा जास्त (१.२४ Mach)

या रोमांचकारी घटनेचा Youtube Video पुढील लिंकवर पहा : http://www.youtube.com/watch?v=7f-K-XnHi9I

(माहिती आणि इमेज इंटरनेट वरून)

________________________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच साहसी दिस्ताहेत हे साहेब, अजूनही डिटेल्स वाचायला आवडतीलच...

मा बो वर याविषयी कोणी लिहितंय याचेही कौतुकच....

थोडक्यात पण छान माहिती ! >> +१

धन्यवाद साजिरीजी आणि शशांकजी !

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा:

http://ca.news.yahoo.com/blogs/geekquinox/felix-baumgartner-space-jump-r...

या लेखात फेलिक्स बाउमगार्टनरने वापरलेली कॅपसूल, parachute, त्याचा पोषाख आणि काही उपयुक्त माहिती दिलेली आहे.

Happy reading !

इंद्रधनुष्य आणि सर्वजण,

पुढील लिंकवर फेलिक्स बाउमगार्टनरच्या Red Bull Stratos प्रोजेक्टबद्दल खूप interesting माहिती आहे:

http://en.wikipedia.org/wiki/Red_Bull_Stratos

Enjoy reading !

या लेखात फेलिक्स बाउमगार्टनरने वापरलेली कॅपसूल, parachute, त्याचा पोषाख आणि काही उपयुक्त माहिती दिलेली आहे. >>>> खूप छान माहिती ....

भयानक वेग आहे हा ! जिद्दीला सलाम.

आजच्या लोकसत्तामधे एका मराठमोळ्या तरुणाने केलेल्या पोहण्याच्या विक्रमाबद्दल बातमी आहे. त्याला अर्थसहाय्य पण नाही मिळाले.

अशीही शक्यता होती की जबरदस्त घर्षणाने युनिफॉर्म फाटून तो वीर मेला असता. पण तसे झाले नाही. हे टीव्हीवर सतत बघितले. ध्वनीहून अधिक वेग प्राप्त झाला त्या माणसाला. खराखुरा मृत्यूंजय म्हणायला हवा.

बिनधास्तजी, धन्यवाद ही माहिती येथेही टिपून ठेवण्याबद्दल

दिनेशदा:

आजच्या लोकसत्तामधे एका मराठमोळ्या तरुणाने केलेल्या पोहण्याच्या विक्रमाबद्दल बातमी आहे. त्याला अर्थसहाय्य पण नाही मिळाले>>>>>>>>>>>

ही खरोखरीच कीव करण्याजोगी गोष्ट आहे ! दुर्दैवाने आपला देश स्वार्थी आणि भ्रष्ट प्रवृत्तींनी एव्हढा बरबटलेला आहे कि अशा वैयक्तिक गुणांकडे समाजाचे लक्षच नाही !

बेफिकीरजी:

अशीही शक्यता होती की जबरदस्त घर्षणाने युनिफॉर्म फाटून तो वीर मेला असता. पण तसे झाले नाही. खराखुरा मृत्यूंजय म्हणायला हवा>>>>>>>>>>>

ही शक्यता होतीच ! दिनेशदानी लिहिल्या प्रमाणे, या वीराच्या जिद्दीला सलाम !!

ह्याविषयी बिलकुल माहिती नव्हते.
मिसळपाव वर प्रथम वाचले. नंतर तिथे लाइव्ह समालोच असते तसे प्रतिसाद आले होते. Happy

आपल्या मेडियाने ह्याची फारशी दखल घेतली नाही. अर्थात मी प्रिन्ट मेडिया म्हणतोय.
न्युज चॅनेल मी माहितीसाठी बघत नाही. क्वचित कधीतरी मसाला मनोरंजन म्हणुन बघतो..

माबोवर कुणीतरी लिहावं असं वाटत होतं. तुम्ही लिहिलत ते बरं झालं.. Happy

धन्स, झकासराव ! ही घटनाच एव्हढी मोठी आहे कि ह्या बहाद्दरला सलाम ठोकणे महत्वाचे !!