केस नं १८/९ (Vazhakku Enn 18/9)

Submitted by विदूषक on 16 October, 2012 - 14:23

काही दिवसांपूर्वी rediff वर एक लेख वाचला या सिनेमाबद्दल, म्हणून मग कंपनीमधल्या तमिळ कलीगला विचारले आणि त्याने हा सिनेमा दिला अर्थातच subtitles सह.

चित्रपट सुरु होतो तो एका crime scene ने, मग सुरु होतो त्याचा तपास. flashback ने कथा उलगडत जाते आणि आपल्याला एक चांगला thriller बघितल्याचे समाधान मिळते. कथा एकदम साधी आहे, एका लहान शहरात घडणारी, चार-पाच पात्रांभोवती फिरणारी. पण flashback तंत्राचा पुरेपूर उपयोग करून चित्रपट कुठेही कंटाळवाणा होऊ न देता दिग्दर्शक ती आपल्या पुढे मांडतो. पटकथा खूपच सशक्त आणि वेगवान आहे, किंबहुना पटकथा कशी असावी त्याचा एक आदर्श नमुनाच आपल्याला पाहायला मिळतो. कुठेही अनावश्यक सीन नाहीत, typical दक्षिणात्य मारधाड/अतिरेक, मुद्दाम घुसवलेली पात्रे/विनोद अस काहीच नाही. (दिग्दर्शकाने ३ वर्षं घेतली आहेत कथा-पटकथा लिहिण्यासाठी आणि फक्त ५२ दिवसामध्ये चित्रीकरण पूर्ण केले आहे - इंटरनेट वरून नंतर माहिती मिळाली)

Cinematography अतिशय चांगली - एकदम raw आणि real, अभिनयाच्या बाबतीत पण चित्रपट चांगला आहे, कथा टीनएजर्सची असल्याने सर्व कलाकार नवीन आहेत पण दिग्दर्शकाने त्यांच्याकडून खूप चांगली कामे करून घेतली आहेत. गाणी २-३ आहेत पण ती background ला आहेत त्यामुळे जास्त लक्षात येत नाहीत आणि पार्श्वसंगीत पण कथेच्या वातावरणाशी match होणारं आहे.

एकूणच जबरदस्त पटकथा असलेला हा थ्रिलर अगदी must-watch आहे!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केस नं ९९ ह्या नावाचे एक मराठी नाटक आले होते मागे. त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? थोडक्यात कथाबीज द्यायचेत ना!

केस नं ९९ ह्या नावाचे एक मराठी नाटक आले होते मागे. त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? थोडक्यात कथाबीज द्यायचेत ना! >>>>
केस नं ९९ बद्दल काही माहिती नाही.. Sad

मी थोडक्यात कथानक द्यायला पाहिजे होतं, पण एकतर कथानक एकपदरी नाही, (There are 2-3 interconnected, overlapping stories shown in flashbacks in nonlinear style) आणि जास्त लिहीलं तर तो spoiler होईल (कदाचित मी व्यवस्थित लिहू शकणार नाही) असं वाटल्यामुळे लिहिलं नाही.

हा चित्रपट तमिळ सिनेमाने ऑस्करसाठी पाठवला आहे..

धन्यवाद!!

जे आहेत ते पदर उघडा....... असा ही तामिळ चित्रपट आहे........टेंशन घेउन नका..........इथे कोणी तामिळ चित्रपट चित्रपट गृहात जाउन पाहत नाही...... जास्तितजास्त नेट वर पाहतील........

हा चित्रपट बहुतेक टीव्हीवर आलाय. मीएकच सीन पाहिला ज्यामधे टीनेजर मुलग्याने मुलीचे काहीतरी मोबाईलमधे फोटो काढलेले असतात. तो मोबाईल ती बघते असा. नंतर पुढे बघितला नाही. पुन्हा केव्हातरी लागला तर बघेन.