अमर आपटे येतोय.... लवकरच...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 October, 2012 - 12:53

१९९२.
अमर आपटे.
एक गुप्तहेर.
विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍यांच्या मागावर असलेला.
पुरतं जखडून टाकणार्‍या एका केसचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात असलेला.
खुल्या अर्थव्यवस्थेमुळे बदललेल्या नात्यांना, भवतालाला तोंड देण्याचा प्रयत्न करणारा.
अमर आपटे.
एक गुप्तहेर.

तो येतोय.
लवकरच.

'वळू', 'विहीर', 'देऊळ', 'मसाला' आणि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' यांच्या अपूर्व यशानंतर अरभाट निर्मिती व इंडियन मॅजिक आय प्रा. लि. सादर करीत आहेत 'पुणे ५२'.

दिग्दर्शक निखिल महाजन यांचा पहिला चित्रपट.

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

जागतिक प्रीमियर १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात.

दि. २४ ऑक्टोबर २०१२, आयनॉक्स, स्क्रीन नं. ५, रात्री ८ वाजता.

दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव.

दि. १ नोव्हेंबर, २०१२, क्लियरव्ह्यू चेल्सी सिनेमाज, न्यू यॉर्क, संध्या. ७ वाजता.

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy
"मसाला"च्या प्रिमियरच्या वेळेस ट्रेलर पाहिला होता. तेंव्हाच आवडला. Happy

वा..मस्त वाटतोय.. गिरीश कुलकर्णी हटके भूमिकेत दिसतोय. न्यू यॉर्क मधल्या शोचे डिटेल्स कुठे मिळू शकतील?

लिंक बद्दल धन्यवाद चिनूक्स
चला आता न्यू यॉर्क मधेही मराठी सिनेमा पाहाण्याची सोय झाली तर Happy