तिने केला सुगंधाचा असा अभ्यंग शिडकावा!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 October, 2012 - 12:32

गझल
तिने केला सुगंधाचा असा अभ्यंग शिडकावा!
जणू काट्यांसही वाटे जरासा गंध उधळावा!!

तिच्या पाऊलस्पर्शाने लकाकू लागली धरणी!
जणू गर्भात धरणीच्या विजेचा लोळ उतरावा!!

तिच्या गज-यामधे बघुनी फुलांच्या ऎवजी तारे;
अरे, तो चंद्रही म्हणतो.....तिचा मुखचंद्र कवळावा!

अशाही चोरपायांनी सरी येतात स्मरणांच्या.....
पडावे ऊन्ह अन् तेव्हा जसा पाऊस बरसावा!

तशी येतील पेलाया अशी मी पाहिली स्वप्ने!
जरी सोशीक मी होतो, कितीदा बेत बिनसावा!!

मला सूर्यास्तही आता पहाटेसारखा वाटे!
जणू रंगात संध्येच्या उषेचा रंग मिसळावा!!

जगावे मोकळे कैसे कळाया लागले मजला....
असे वाटे मला आता जिण्यावर जीव उधळावा!

असा मी वेचला गेलो, असा मी फेकला गेलो!
निवडताना जसे तांदुळ, खडा वेचून फेकावा!!

न कोणी फोडला टाहो, दिला ना हुंदका कोणी;
असा चुपचाप मी तुटलो, जसा ताराच निखळावा!

कृपेच्या चार किरणांची कुठे मी मागणी केली?
तुझ्या एकाच किरणाने उभा हा जन्म उजळावा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आपली तुलनेने आरंभकाळातील गझल असावी असे वाटत आहे. अनेक ओळी स्वतंत्ररीत्या आवडल्या.

जसे:

अशाही चोरपायांनी सरी येतात स्मरणांच्या.....

तशी येतील पेलाया अशी मी पाहिली स्वप्ने!

मला सूर्यास्तही आता पहाटेसारखा वाटे!

असा मी वेचला गेलो, असा मी फेकला गेलो!

कृपेच्या चार किरणांची कुठे मी मागणी केली?

आणि
तुझ्या एकाच किरणाने उभा हा जन्म उजळावा! << वा

धन्यवाद, भूषणराव!
ही गझल १९९४, मार्चमधे लिहिलेली नोंद डायरीत मिळाली!
.........प्रा.सतीश देवपूरकर

फोन लागत नाहि.>>>>>>>>

आम्ही लावला की सरान्चा फोन लागतो बुवा नेहमी !!
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव !!!..असे तर नाहीना तुमचे ?? Wink

आम्ही स्वतासाठी फोन लावत नाही तुमच्या सारख्या गरजू लोकाना सरान्चा फोन लावून देतो ......

बा द वे : तेल तुमचेतुम्हीच आणायचे असते ..ती जबाबदारी आमची नाही ..तेल नसलेच तर कसे काय करतात ते आम्हाला माहीत नाही !!

खानिज तेल कसं आनायच ?>>>>>>>>>>>

भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.>>>>

.................हा पत्ता शोधत शोधत गेलात तर देवसर नक्की भेटतील (सुटीचे दिवस वगळून)...त्यानाच प्रत्यक्ष विचारा तेच स्पेशालिस्ट आहेत या विषयात !!

तेच्यासाठिच तर फोन लावतुय. तर तुमचं आप्लं किसिकि .. किसिका... बिचमे ... दौडा. दौडागौडा. द्वेवेगौडा.
करनाटकात काम हाये वाइच

चांगले चांगले गझलाकार असे फालतु प्रतिसाद देऊन राहीलेत Sad
गझल आवडत नसेल तर निदान गप तरी बसा
एकवेळ डु आयडी चे ठीक आहे.

धन्यवाद भूषणराव!
इतकेच आम्ही म्हणतो.........देवा, त्यांना माफ कर!
टीप:
लाख तो मज लक्ष्य करतो;
मात्र मी दुर्लक्ष करतो!