मख्खी : मस्ट वॉच

Submitted by अँकी नं.१ on 15 October, 2012 - 00:24

टीव्हीवर रोजच दिसणारा डब्ड साऊदी सिनेमांचा उच्छाद असताना, थेटरला जाऊन डब्ड सिनेमा, तो ही मख्खी नावाचा का पहावा असा विचार डोक्यात येणं सहाजिक आहे, पण तरी सांगतो, पहाच.

दिग्दर्शक एस. एस. राजमौलीचा हा सिनेमा (ओरिजिनल: ईगा-तेलगु. नान ई-तमिळ) म्हणजे टोटल एंटरटेनमेंट आहे.
खलनायकानी मारलेला नायक मृत्यूनंतर परत येतो अन खलनायकाला संपवतो, ही कथा घोस्ट पासून कर्ज (कर्ज्ज्ज सुद्धा...) पर्यंत य वेळा ऐकलेली अन पाहिलेली आहे पण यावेळची गंमत आहे नायकाचं माशी बनून येणं.
सुरुवातीला थोडा स्लो वाटणारा सिनेमा नायकाच्या कमबॅकनंतर माशीच्या उडण्यासारखाच भन्नाट वेग घेतो. एक छोटीशी माशी एका धडधाकट माणसाला काय काय छळवाद करू शकते हे ज्या प्रकारे राजमौलीनी दाखवलय ते जबरी आहे. प्रेक्षकाचं त्या माशीशी रिलेट होणं हा राजमौलीचा अन स्पेशल इफेक्ट्स टीमचा मोठ्ठा विजय.
ही माशी कुठल्याही दृष्यात विजोड वाटत नाही. अन ज्या प्रकारे ती इमोशन्स दाखवते, खलनायकाला टशन देते, मोठ्या हुषारीनी आपल्या लिमिटेड ताकदीचा खुबीनी वापर करते ते बघताना सॉलिड धमाल येते. ही माशीच सिनेमाचा रिअल स्टार आहे.

makkhi.jpg

कन्नड अभिनेता सुदीप (फूंक, रण, फूंक २) खलनायक म्हणून तगडा परफॉर्मन्स देतो. प्रत्यक्षात शूटिंगच्या वेळी अस्तित्वात नसलेल्या एका माशीच्या अ‍ॅक्षन्सना सुदीपनी दिलेल्या रिअ‍ॅक्शन्स खूप मस्त काँप्लिमेंट करतात. नायिकेचं काम ठीक-ठाक.

एकूणात सव्वादोन तास सान थोरांनी एकत्र बसून टोटल एन्जॉय करण्यासारखा हा सिनेमा आहे. नक्की पहा. (जमल्यास थेटरमधे, कारण छोट्या पडद्यावर छोटे छोटे डीटेल्स दिसणार नाहीत.)

माझ्याकडून चार तारे...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक मारली आणि तो "भू.रि." पाहायला गेलो..... खूप वाटत होतं की 'मख्खी' पाहावा... श्या:!

बघतो... आज-उद्यात जमल्यास नक्की पाहाणार.. बरेच चांगले 'रिव्ह्यु' आले आहेत.. ('रेडिफ'ने तर ५ पैकी ४.५ तारी दिलेत!)

काल मूव्हीज् ओके वर पाहीला. मस्तच होता. खूप आवडला. थोड्या उशीराने पहायला सुरूवात केली त्यामुळे मख्खीची एंट्री हुकली .. परत पहावा लागेल. परवा दशावतारम् पाहिल्याने अॅनिमेशन च्या नावाने बोंब असली तरी चालेल अशी मानसीक तयारी होती पण काय, आश्चर्याचा धक्का बसला. लय भारी ...