हितगुज दिवाळी अंक २०१२ - परिसंवाद

Submitted by संपादक on 14 October, 2012 - 18:05

तंत्र हा आजच्या जगाचा मंत्र तर आहेच, परंतु तो आपला मित्र देखील आहे का, हे आजमावून पाहण्यासाठी हितगुज २०१२ दिवाळी अंकात आपण समाविष्ट केलाय 'तं तं तंत्रज्ञानाचा..' हा परिसंवाद!
आपण सगळेच या ना त्या मार्गाने तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, तेव्हा याच तंत्रज्ञानाविषयी विचार करायला, आमच्या काही प्रश्नांवर मत द्यायला आवडेल ना तुम्हांला?

* आजवर तुम्ही वापरलेल्या सर्व आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांमध्ये / प्रणालींमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त उपयुक्त, फायदेशीर ठरलेले, आवडलेले साधन, प्रणाली, तांत्रिक संकल्पना इ. कोणते? त्याचा तुम्हांला नक्की कसा फायदा होतो?

* तंत्रज्ञान / उपकरणे वापरताना दडपण येते का? त्यामुळे मानसिक तणाव जाणवतो का? तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलाशी कशाप्रकारे जुळवून घेता?

* तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एखाद्या कामासाठी लागणारा वेळ, ऊर्जा अथवा श्रम वाचतात का? त्या वाचलेल्या गोष्टींचा दुसरीकडे कुठे (व्यायाम, कुटुंबाबरोबर वेळ चालवणे, वाचन, छंद इत्यादी गोष्टींसाठी) सकारात्मक उपयोग केला जातो का?

* तुमच्या बाबतीत / आजूबाजूला एखादी अशी घटना घडलेली आहे का जिथे तंत्रज्ञानामुळे अडचणीवर मात करता आली? वैद्यकीय शास्त्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज मानवाचे आयुर्मान वाढले आहे असे वाटते का?

* तंत्रज्ञानाच्या होणार्‍या चुकीच्या अथवा अतिरेकी वापराबद्दल तुमचे काय मत आहे? ह्या बाबतीत तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर काही मर्यादा घालून घेतल्या आहेत का?

* सोशल नेटवर्किंगने जग जवळ येत आहे असे वाटते की माणसे दुरावत आहेत असे वाटते?

* नैसर्गिक आपत्तींचे संकेत तंत्रज्ञानामुळे ओळखता येऊन ते टाळता येतात पण दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास होत आहे असे तुम्हांला वाटते का?

तंत्रज्ञान विषयावरचे तुमचे विचार या दिवाळी अंकातून वाचकांपर्यंत पोचावेत हा या परिसंवादामागचा हेतू! यातील हव्या त्या प्रश्नांची उत्तरे किंवा तुमचे विचार लेखाच्या स्वरूपात संपादक मंडळाला ई-मेल ने पाठवा. या विषयावर तुम्ही स्वतंत्रपणे मांडलेल्या इतर मतांचेही नक्कीच स्वागत आहे.

संपादक मंडळ आपल्या लेखनाची वाट पाहत आहे.

आपले लेखन आम्हांला या दुव्यावर पाठवा.

http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २१ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]

काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हांला sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर जरूर संपर्क करा. संपादक मंडळ तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.

प्रकाशचित्रे freedigitalphotos.net वरून साभार.

विषय: 

.