नजर

Submitted by राजेंद्र देवी on 12 October, 2012 - 04:43

नजर...

तुझी पाणावलेली नजर
सारे काही सांगून गेली
माझ्या स्वप्नांना
ओली नजर लावून गेली

स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री

आठवतो अजूनही
तुझी नजर ति ओली
अजूनही मोजतो आहे
मी माझ्या जखमांची खोली

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छन लिहिलय
भाषेवर पकड छान दिसतेय (मी अनेक रात्री..दोनदा दोन पद्धतीने वापरलय्त!)
कविता नेमकी ,नेटकी ,हळुवार , मधुर झाली आहे !! अभिनन्दन !!

पुढील लेखनास शुभेच्छा!!

मायबोलीवर हार्दिक स्वागत!!