उदय हुसेन - आणि त्याचा हमशकल लतीफ़ याहिआ

Submitted by नितीनचंद्र on 8 October, 2012 - 00:54

मुसलमान सत्ताधिशांच्या क्रौर्य कहाण्या ऐकल्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हे मुसलमान सत्ताधीश इतके रक्तपिपासु का असतात ? हा इतिहास मध्ययुगीन नाही तर जर जग जेव्हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रार्थमीक उंबरठा ओलांडुन वेगाने प्रगती करतय याही काळात हे नराधम मध्ययुगीन क्रौर्याच्या रक्तरंजीत प्रथांच पथानुगमन करताना दिसतात.

Latif.jpg

( लतिफ यांचे चित्र आंतरजालावरुन साभार )

शनिवार दि. ६ अक्टोंबर २०१२ रोजी बहुदा हिस्ट्री चॆनलवर ही कहाणी दाखवण्यात आली. या आधी कधीतरी ही दाखवली असेल पण माझ्या पहाण्यात प्रथमच आली आणि मायबोलीकरांना याचा सारांश कळावा या उद्देशाने हा लेख प्रपंच.

डेव्हील्स डबल या नावाने प्रसिध्द केलेल्या आत्मचत्रीच्या रुपाने व या फ़िल्मच्या रुपाने उदय सद्दाम हुसेन या क्रुरकर्म्याची नृशस कहाणी आज लोकांच्या पुढे आली आहे.

लतीफ़ याहिआ या एका इराकी सैनीकाला अचानक तत्कलीन सर्वोसर्वा सद्दाम हुसेन यांचे कुपुत्र उदय हुसेन याच्या समोर उभे केले जाते. उद्देश एकच की त्याने उदयचा हमशकल बनुन इराकी लोकांना मुर्ख बनवायचे आणि हल्ला झालाच तर मरायचे.

जर ही आज्ञा मानली नाही तर जश्या अनेक मुली/बायकांवर उदयने बलात्कार केला तीच भिती लतिफ़च्या बहिणींच्या बाबतीत स्वत: उदय लतिफ़ला घालतो. दुर्देवाने लतिफ़ ते काम करायला तयार होतो. मग सुरु होते डेंटल ट्रिटमेंट ज्यायोगे उदयच्या पुढच्या दोन दातात असलेली फ़ट लतिफ़च्या दातात निर्माण होते. सोनेरी पिंजर्‍यातला लतिफ़ तडफ़डत असतो पण सुटकेचा मार्ग नसतो.

मग सुरु होते लतिफ़चे प्रशिक्षण, उदयची चालण्याची पध्दत, बोलण्याची पध्दत, चिरूट ओढण्याची पध्दत याचे. यात प्रगती झाल्यावर त्याला सर्वोसर्वा सद्दाम हुसेन यांच्यासमोर उभे केले जाते. सद्दाम हुसेन लतीफ़ला काही क्षण देतात आणि सांगतात की मला रागाला आणु नकोस. बस्स.. संपते मुलाखत.

कुवेतवर इराक आक्रमण करते आणि उदय स्विझर्लंड्ला निघुन जातो. खाडी युध्द संपते आणि काही दिवसांनी उदय परत येतो. युध्दानंतर जनमत काहिसे सद्दाम आणि त्यांच्या राजवटी विरुध्द झुकते. याचू परिक्षा घेण्यासाठी उदय लतिफ़ला त्याच्या गाडीतुन अंगरक्षकांसमवेत एका हॊटेलात पाठवतो. कार मधुन उतरत असताना उदय समजुन लतिफ़वर प्राणघातक हल्ला होतो. उदयचे काही अंगरकक्षक मारले जातात व लतिफ़ गोळ्या लागुन जखमी होतो. त्याला इस्पितळात पाठवले जाते. त्याच्यावर उपचार चालु होतात तिथे उदय येतो. डॊक्टरशी विचारपुस करताना डॉक्टर लतिफ़च्या हाताची बोटे कापावी लागतील असे म्हणतो त्यावर चिडुन उदय डॉक्टरचा गळा पकडुन जीवे मारण्याची धमकी देतो.

या हल्ल्यातुन बरा झाल्यावर उदय लतिफ़ला पुन्हा कामवर यायला सांगतो. यावेळी गेली अनेक वर्षे पुरी न झालेली मागणी लतिफ़ पुढे करतो. लतिफ़ला त्याच्या परिवाराला भेटायचे असते. केवळ अर्ध्यातासाच्या भेटीची परवानगी घेऊन लतिफ़ त्याच्या आई-वडील बहीण यांना भेटायला जातो. आपला मुलगा युध्दात परागंदा झाला पण अद्याप कुठेतरी आहे या आशेवर जगणारे आई वडील लतिफ़च्या भेटीने खुष होतात. पण लतिफ़च्या डोळ्यात तरळत असते भिती. काही मिनीट आनंदात घालवल्यावर तो लतिफ़ वडीलांना परिवाराला घेऊन देश सोडुन जाण्यास सांगतो. वडील नकार देतात.

एका हॉटेलमध्ये एक नवविवाहीत जोडपे येते. तिथेच उदय आणि लतिफ़ बसलेले असतात. उदय लतिफ़ला नवविवाहीतेला घेऊन येण्याचे फ़र्मान देतो. उदयचे अंगरक्षक तिच्या नवर्‍याला पकडुन ठेवतात. लतिफ़ला हे पटत नाही पण त्याचे काही चालत नाही. त्या हॉटेलमधेच उदय त्या नवविवाहीतेवर बलात्कार करतो आणि ती नवविवाहीता चवथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करते.

अश्या अनेक घटनांच्या पार्श्वभुमीवर एकदा लतिफ़ उदयच्या तावडीतुन पळ काढतो आणि इराकची सीमापार करुन दुसर्‍या देशात जातो. २००३ च्या खाडी युध्दात उदय मारला जतो पण तत्पुर्वी लतिफ़च्या वडीलांना लतिफ़च्या देश सोडण्याची किंमत चुकवावी लागते.

आज लतिफ़ आयर्लंड मध्ये व्यावसायीक आहे. २१ गोळ्या खाऊन व चेहर्‍यावर एक जखमेची खुण घेऊन व्यवसाय करतो आहे. जानेवारी २०१२ ला त्याची ही कहाणी आत्मचरित्र आणि सिनेमाच्या रुपात प्रसिध्द झाली आहे.

अगणीत अत्याचारांपैकी ही एक कहाणी मनाला चटका लाऊन जाते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानेश | 9 October, 2012 - 13:40 नवीन
>>...... (अर्थातच, पावरफुल) माणूस तोतया ठेवू शकतो. तो क्रूरकर्मा असलाच पाहिजे असे नाही.<<
(१) म्हणजे आपल्यावर प्राणघातक हल्ला होण्याचा संशय / भीती असलेल्या कुणीही (अर्थातच, पावरफुल) बळजबरीने तोतया ठेवला तर त्यात मुळीच क्रौर्य नाही असे म्हणता येईल का?
(२) एखादा पैशाच्या आशेने तोतया होण्यास तयार झाला आणि त्याला कामावर ठेवले तर यात क्रौर्य नाही असे समजायचे किं नाही?

<<हुसेनने क्लोन तयार केला तर मुसलमान कृरकर्मा असा धागा निघाला.

आणखी कुणी आपला क्लोन केला तर ' लाख मेले तर चालतील पण पोशिंदा जगावा' असा धागा निघाला.>>>

वाहवा, आता महाराणा प्रताप, छ्त्रपती शिवाजी महाराज याच्यासारख्यांची तुलना चक्क 'उदय हुसैन' सारख्या महामानवाशी व्हायला लागली.
राणाजी, महाराज...तुमचे आयुष्य सार्थक झाले बरं का !

@भास्कर-

(१) म्हणजे आपल्यावर प्राणघातक हल्ला होण्याचा संशय / भीती असलेल्या कुणीही (अर्थातच, पावरफुल) बळजबरीने तोतया ठेवला तर त्यात मुळीच क्रौर्य नाही असे म्हणता येईल का?

नाही.
माझे विधान 'तो क्रूरकर्मा असलाच पाहिजे असे नाही' असे आहे. याचा अर्थ तो क्रूरकर्मा असूही शकतो किंवा नसूही शकतो. 'क्रूरकर्मा' पद मिळवण्यासाठी तोतया ठेवणे हा एकमात्र निकष असू शकत नाही. सदर इसमाची अन्य कृष्णकृत्ये त्याला अशी पदवी मिळवून देऊ शकतात.

(२) एखादा पैशाच्या आशेने तोतया होण्यास तयार झाला आणि त्याला कामावर ठेवले तर यात क्रौर्य नाही असे समजायचे किं नाही?

नाही.
पैशासाठी जीवाला धोका असणारी नोकरी स्वीकारणे यात मला 'क्रौर्य' दिसत नाही.

@ज्ञानेश
पैशासाठी जीवाला धोका असणारी नोकरी स्वीकारणे यात मला 'क्रौर्य' दिसत नाही.<<
पैशासाठी जीवाला धोका असणारी नोकरी एखाद्याला दिली तर नोकरी देणार्‍यात मला 'क्रौर्य' दिसत नाही असे तुम्हाला म्हणावयाचे असावे. हे बरोबर आहे ना? कारण माझा प्रश्न तसा आहे.

मुसलमान सत्ताधिशांच्या क्रौर्य कहाण्या ऐकल्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हे मुसलमान सत्ताधीश इतके रक्तपिपासु का असतात ?
>>>>
बहुतकरुन सर्वच सत्ताधिश हे सत्ता/खुर्चीप्रेमी असतात. त्यासाठी ते रक्तपिपासू/कृर वगैरे बनतात. त्यासाठी मुसलमानच असले पाहिजे असे काही नाही. उदा: स्टालिन, ख्मेर रुजचा पोल पॉट, माओ, अगदी नव्या युरोपातले उदाहरण म्हणजे मुसलमान बोस्नियावर झालेला ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांचे अत्याचार..

गल्फ वॉर दरम्यान, उदयचे नाव कानावर येत होते. त्यावेळी आम्हाला उदय या नावाची गंमत वाटायची. ( मी गल्फ मधेच होतो आणि आजूबाजूला कुणीच दुसरा उदय नव्हता. त्यांच्यात फार नावे नसतात, एकंदर ९९९ च नावे आहेत. )

----- नावाचा उच्चार उदे आणि कुसे असा आहे ना ? नावांत साधर्मता दिसते म्हणुन माझा दुर रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न.

गल्फ मधे त्यांच्या नावांचा उच्चार कसा होतो ?

मला तर उदय हुसेन चे काही फोटो कमल हसन सारखे वाटतात. गुगल करुन बघा. Proud Proud Proud

या चित्रप्टाबद्दल नुकतेच ऐकले होते. netflix वर आहे.

वाह

Pages