उदय हुसेन - आणि त्याचा हमशकल लतीफ़ याहिआ

Submitted by नितीनचंद्र on 8 October, 2012 - 00:54

मुसलमान सत्ताधिशांच्या क्रौर्य कहाण्या ऐकल्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हे मुसलमान सत्ताधीश इतके रक्तपिपासु का असतात ? हा इतिहास मध्ययुगीन नाही तर जर जग जेव्हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रार्थमीक उंबरठा ओलांडुन वेगाने प्रगती करतय याही काळात हे नराधम मध्ययुगीन क्रौर्याच्या रक्तरंजीत प्रथांच पथानुगमन करताना दिसतात.

Latif.jpg

( लतिफ यांचे चित्र आंतरजालावरुन साभार )

शनिवार दि. ६ अक्टोंबर २०१२ रोजी बहुदा हिस्ट्री चॆनलवर ही कहाणी दाखवण्यात आली. या आधी कधीतरी ही दाखवली असेल पण माझ्या पहाण्यात प्रथमच आली आणि मायबोलीकरांना याचा सारांश कळावा या उद्देशाने हा लेख प्रपंच.

डेव्हील्स डबल या नावाने प्रसिध्द केलेल्या आत्मचत्रीच्या रुपाने व या फ़िल्मच्या रुपाने उदय सद्दाम हुसेन या क्रुरकर्म्याची नृशस कहाणी आज लोकांच्या पुढे आली आहे.

लतीफ़ याहिआ या एका इराकी सैनीकाला अचानक तत्कलीन सर्वोसर्वा सद्दाम हुसेन यांचे कुपुत्र उदय हुसेन याच्या समोर उभे केले जाते. उद्देश एकच की त्याने उदयचा हमशकल बनुन इराकी लोकांना मुर्ख बनवायचे आणि हल्ला झालाच तर मरायचे.

जर ही आज्ञा मानली नाही तर जश्या अनेक मुली/बायकांवर उदयने बलात्कार केला तीच भिती लतिफ़च्या बहिणींच्या बाबतीत स्वत: उदय लतिफ़ला घालतो. दुर्देवाने लतिफ़ ते काम करायला तयार होतो. मग सुरु होते डेंटल ट्रिटमेंट ज्यायोगे उदयच्या पुढच्या दोन दातात असलेली फ़ट लतिफ़च्या दातात निर्माण होते. सोनेरी पिंजर्‍यातला लतिफ़ तडफ़डत असतो पण सुटकेचा मार्ग नसतो.

मग सुरु होते लतिफ़चे प्रशिक्षण, उदयची चालण्याची पध्दत, बोलण्याची पध्दत, चिरूट ओढण्याची पध्दत याचे. यात प्रगती झाल्यावर त्याला सर्वोसर्वा सद्दाम हुसेन यांच्यासमोर उभे केले जाते. सद्दाम हुसेन लतीफ़ला काही क्षण देतात आणि सांगतात की मला रागाला आणु नकोस. बस्स.. संपते मुलाखत.

कुवेतवर इराक आक्रमण करते आणि उदय स्विझर्लंड्ला निघुन जातो. खाडी युध्द संपते आणि काही दिवसांनी उदय परत येतो. युध्दानंतर जनमत काहिसे सद्दाम आणि त्यांच्या राजवटी विरुध्द झुकते. याचू परिक्षा घेण्यासाठी उदय लतिफ़ला त्याच्या गाडीतुन अंगरक्षकांसमवेत एका हॊटेलात पाठवतो. कार मधुन उतरत असताना उदय समजुन लतिफ़वर प्राणघातक हल्ला होतो. उदयचे काही अंगरकक्षक मारले जातात व लतिफ़ गोळ्या लागुन जखमी होतो. त्याला इस्पितळात पाठवले जाते. त्याच्यावर उपचार चालु होतात तिथे उदय येतो. डॊक्टरशी विचारपुस करताना डॉक्टर लतिफ़च्या हाताची बोटे कापावी लागतील असे म्हणतो त्यावर चिडुन उदय डॉक्टरचा गळा पकडुन जीवे मारण्याची धमकी देतो.

या हल्ल्यातुन बरा झाल्यावर उदय लतिफ़ला पुन्हा कामवर यायला सांगतो. यावेळी गेली अनेक वर्षे पुरी न झालेली मागणी लतिफ़ पुढे करतो. लतिफ़ला त्याच्या परिवाराला भेटायचे असते. केवळ अर्ध्यातासाच्या भेटीची परवानगी घेऊन लतिफ़ त्याच्या आई-वडील बहीण यांना भेटायला जातो. आपला मुलगा युध्दात परागंदा झाला पण अद्याप कुठेतरी आहे या आशेवर जगणारे आई वडील लतिफ़च्या भेटीने खुष होतात. पण लतिफ़च्या डोळ्यात तरळत असते भिती. काही मिनीट आनंदात घालवल्यावर तो लतिफ़ वडीलांना परिवाराला घेऊन देश सोडुन जाण्यास सांगतो. वडील नकार देतात.

एका हॉटेलमध्ये एक नवविवाहीत जोडपे येते. तिथेच उदय आणि लतिफ़ बसलेले असतात. उदय लतिफ़ला नवविवाहीतेला घेऊन येण्याचे फ़र्मान देतो. उदयचे अंगरक्षक तिच्या नवर्‍याला पकडुन ठेवतात. लतिफ़ला हे पटत नाही पण त्याचे काही चालत नाही. त्या हॉटेलमधेच उदय त्या नवविवाहीतेवर बलात्कार करतो आणि ती नवविवाहीता चवथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करते.

अश्या अनेक घटनांच्या पार्श्वभुमीवर एकदा लतिफ़ उदयच्या तावडीतुन पळ काढतो आणि इराकची सीमापार करुन दुसर्‍या देशात जातो. २००३ च्या खाडी युध्दात उदय मारला जतो पण तत्पुर्वी लतिफ़च्या वडीलांना लतिफ़च्या देश सोडण्याची किंमत चुकवावी लागते.

आज लतिफ़ आयर्लंड मध्ये व्यावसायीक आहे. २१ गोळ्या खाऊन व चेहर्‍यावर एक जखमेची खुण घेऊन व्यवसाय करतो आहे. जानेवारी २०१२ ला त्याची ही कहाणी आत्मचरित्र आणि सिनेमाच्या रुपात प्रसिध्द झाली आहे.

अगणीत अत्याचारांपैकी ही एक कहाणी मनाला चटका लाऊन जाते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Terrible !
If this is a true story, then please remove it from "Chitrapat" category. It's creating confusion.

(In spite of choosing 'Marathi' option, I am not able to type in Devnagri script today. Dunno why.)

हिस्टरी चॅनेलेवर डॉक्युमेन्टरी दाखवली असावी . मी पाहिलाय डेव्हिल्स डबल हा चित्रपट. डॉमिनिक कूपरचा डबल रोल आहे त्यात. उदय आणि लतिफ म्हणून...

@नितिनचंद्र
हे माहीत नव्हते. बरेच हुकुमशहा असले उद्योग करतात त्यामुळे फार आश्चर्य वाटले नाही.
फार चांगली माहिति दिलीत. धन्यवाद!
@दिनेशदा | 8 October, 2012 - 10:36 नवीन
>>हि क्रूरता मला बघवणार नाही, तरीपण ऐतिहासिक सत्य म्हणून बघेन !<<

एकिकडे बघवणार नाही, म्हणता आणि दुसरीकडे ऐतिहासिक सत्य म्हणून बघेन म्हणता!
अहो इतिहासात अशा क्रूरतेच्या घटना हजारोंनी आहेत याची आपल्याला कल्पना नाही का?
'बंदा बैरागी' यांच्याविषयी इतिहासातून माहिती घ्या. हे केवळ एक उदाहरण!

>>'बंदा बैरागी' यांच्याविषयी इतिहासातून माहिती घ्या. हे केवळ एक उदाहरण!
हे काय आहे ??? म्हणजे 'बंदा बैरागी' ही व्यक्ती क्रूर होती की त्यांना काही भोगावे लागले होते ???

हायला गंमतच आहे.

हुसेनने क्लोन तयार केला तर मुसलमान कृरकर्मा असा धागा निघाला.

आणखी कुणी आपला क्लोन केला तर ' लाख मेले तर चालतील पण पोशिंदा जगावा' असा धागा निघाला.

>>हुसेनने क्लोन तयार केला तर मुसलमान कृरकर्मा असा धागा निघाला.
>>आणखी कुणी आपला क्लोन केला तर ' लाख मेले तर चालतील पण पोशिंदा जगावा' असा धागा निघाला.
दोन्हीच्या हेतूंमधे नक्कीच फरक असणार, नाही का ?

नितीनचंद्र,

उत्तम परीक्षण. अंगावर शहरे आणणारी कहाणी. तसंही तोतयाचं जिणं म्हणजे अळवावरचं पाणी. केव्हाही 'बोलावणं' येईल. उपरोक्त कथेतला लतीफ प्रचंड सुदैवी आहे. कारण की बर्‍याचदा खर्‍या धन्याला वाचवायला तोतयाचा नियोजित बळी दिला जातो. उदाहरणार्थ : मुअम्मर गदाफीच्या जागी मेलेला तोतया होता असा प्रवाद आहे. त्याला गदाफीच्याच लोकांनी मारला असंही ऐकून आहे.

समजा कोणी सत्ताधार्‍याचे ३ तोतये आहेत. धन्याला वाचवायच्या हेतूने कोण्या एका तोतयाचा बळी दिला, तर इतर दोघांनाही संपवावे लागते. ज्याअर्थी उदय (वा त्याचा दुसरा तोतया) मरूनही लतीफ जिवंत आहे त्याअर्थी लतीफ पराकोटीचा सुदैवी ठरतो. बळी द्यायचा तोतया जिवंतपणी सर्वात कमी उपयोगाचा असावा लागतो. म्हणजे लतीफ उदयशी खूप मिळताजुळता असणार! इथे तोतयांमधली स्पर्धा स्पष्ट व्हावी. Sad

आपल्याला केवळ धन्याची भूमिका वठवायची आहे अश्या भ्रमात कोणी तोतया असेल तर ते अज्ञानातलं सुख म्हणायला पाहिजे. आपल्यासारखाच दुसरा तोतया असू शकतो आणि तो (जिवंत असलेला) अधिक उपयुक्त असू शकतो. हे जेव्हा कळतं तेव्हा तोतयाचं जगणं संपतं. उरतं ते फक्त मरणाची वाट पाहणं! हे मरण शत्रू किंवा धनी कोणाकडूनही येऊ शकतं. हे असलं जिणं तर मूळ धन्यापेक्षा अधिक भयंकर आहे!! Sad

जाताजाता : पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवाजीमहाराजांसाठी स्वत:हून प्राण पणास लावणारा शिवा काशीद हा (बहुधा) जगातला एकमेव तोतया असावा. चू.भू.दे.घे.

आ.न.,
-गा.पै.

महेश | 8 October, 2012 - 12:23 नवीन
>>म्हणजे 'बंदा बैरागी' ही व्यक्ती क्रूर होती की त्यांना काही भोगावे लागले होते ???<<

बंदा बैरागी एक शीख होता. तो, त्याचा मुलगा आणि त्याच्या दोनशे शिष्यांना ते इस्लामचा स्विकार करायला तयार नव्हते म्हणून बादशहाच्या आज्ञेने ठार करण्यात आले.

मा. गामपैलवान,

ज्याअर्थी उदय (वा त्याचा दुसरा तोतया) मरूनही लतीफ जिवंत आहे त्याअर्थी लतीफ पराकोटीचा सुदैवी ठरतो. लतिफच उदय सद्दाम हुसैनचा तोतया होता हो अद्याप जिवंत आहे. त्याच्या शिवाय अन्य कोणी तोतया उदयने ठेवला असेलच तर त्याचा उल्लेख या चित्रपटात नाही.

या चित्रपटात/ डॉक्युमेंट्रीत अनेक चित्तथरारक् प्रसंग आहेत. खास करुन जेव्हा उदयशी वाद विवाद करुन लतिफ रागारागाने त्याचा महाल सोडतो. उदय त्याचा पाठलाग करतो. दोघांची पिस्तुलाने गोळीबारी होते. लतिफ सटकतो आणि कार चालवत बॉर्डर जवळ येतो. काहीही न बोलता उदयसारखे चिरुट तोडांत धरुन तोच उदय असल्याची बतावणी करतो. बॉर्डरचे सैनीक त्याला सॅल्युट करुन पुढे जाऊ देतात.

कधी कधी परमेश्वरच एखाद्याला सहाय करतो तो हा वरचा प्रसंग. यातील एक चुक सुध्दा लतिफला महागात पडली असती.

१) कारला किल्ली असणे व तिथे पहारा नसणे.
२) कार मध्ये पेट्रोल असणे किंवा रस्त्यात पेट्रोल विकत घेणे शक्य असणे.
३) उदयने तो पळाल्याचे पोलीसांना/मिलिट्रीला न सांगणे.
'४) उदय कधीही स्वतः कार ड्राइव्ह करत नसतो ( किमान चित्रपटात ) अश्या वेळी बॉर्डर पर्यंत कार ड्राईव्ह करत येणारा उदय कसा ही शंका बॉर्डरच्या पोलीसांना न येणे.

५) काहीही न बोलता तोंडात चिरुट पकडुन छ्द्मी हास्य करत बॉर्डर जवळ पोलीसांना गुंगारा देण्यासाठी आवश्यक मनोबल, साधने

वर जे तुम्ही लिहिले आहे त्या वर विश्वास बसत नाही... पण स्वतः त्या माणसाने सांगितले आहे आणि तो जिवंत आहे म्हणजे नक्की खरे असणार....

गापै चांगलं विवेचन

वर जे तुम्ही लिहिले आहे त्या वर विश्वास बसत नाही... पण स्वतः त्या माणसाने सांगितले आहे आणि तो जिवंत आहे म्हणजे नक्की खरे असणार....

अगदी असेच काही समजायला नको.
काल थोडे गुगलिंग केले तर बरीच उलटसुलट माहिती सापडली.

Irish Times journalist Eoin Butler and Sunday Times journalist Ed Caesar have questioned Yahia's various claims, including that he was Uday Hussein's body double, and pointed out that many of Yahia's activities since leaving Iraq in 1992, including his education, have not been verified.

In March 2007, Butler interviewed Yahia and highlighted inconsistencies in many of Yahia's statements. In 2011, just before the release of The Devil's Double, Butler commented that Yahia's stories about when he was Uday's double were "to put it mildly, far-fetched." After the 2007 interview, Yahia's ex-wife contacted Butler and told him that when she first met Yahia, he used a different name, Khalid al-Kubaisi. After the two married, she heard for the first time that Yahia claimed to have been Uday's body double, which she found "dubious."

In 2011, Caesar interviewed various people from the time of the Hussein regime. Two confidantes of Uday Hussein denied that he used doubles. One said that Yahia was arrested for impersonation of Uday in 1990, and the other corroborated the incident, also stating that Yahia pretended to be Uday to pick up women. A private guard at Saddam's presidential palace from 1989 to 2003 also denied that Uday used doubles. Saddam Hussein's former doctor and a plastic surgeon at the Ibn Sina hospital said that the reconstructive surgery Yahia claims to have undergone there was never performed.

(संदर्भः विकि)

या प्रकारच्या घटनांमधे "संपूर्ण सत्य" असे काही गृहीत न धरणेच शहाणपणाचे असते. रंजक इतिहास म्हणून याकडे पहावे, हेच बरे.

या प्रकारच्या घटनांमधे "संपूर्ण सत्य" असे काही गृहीत न धरणेच शहाणपणाचे असते. रंजक इतिहास म्हणून याकडे पहावे, हेच बरे.
संपुर्ण सत्य बाहेर येणे अशक्यच आहे. त्या फिल्म मध्ये दाखवले आहे त्या प्रमाणे सद्दाम हुसैन प्रमाणेच उदयचे स्वतःचे असे अंगरक्षक आणि स्वतंत्र निवास दाखवला आहे. उदयचे अंगरक्षक हयात आहेत की नाही यावर सगळे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. सर्वच अंगरक्षक सर्वच घटनांचे साक्षीदार असण्याची शक्यता पण नाही.

ज्ञानेश,

उत्तम माहीती! उदय हुसेन आणि त्याचा भाऊ कुसय हुसेन यांचा एकत्रित मृत्यू झाला होता. त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे अनेकांनी ती प्रेते उदय आणि कुसय यांची नसून तोतयांची आहेत असं म्हंटलं होतं. नेमक्या याच गोष्टीचा फायदा लतीफने उठवला असल्याचीही शक्यता असू शकते.

मात्र तोतये असतात आणि त्यांचं जिणं अत्यंत बेभरवशाचं असतं. ही बाब चित्रपटातून ठळकपणे दाखवण्यासाठी काही ठिकाणी मनोरंजनार्थ बदल टाकले असावेत.

आ.न.,
-गा.पै.

कधी कधी परमेश्वरच एखाद्याला सहाय करतो तो हा वरचा प्रसंग.

गंमतच म्हणायची.... काही घटना मात्र परमेशवर घडवतो आणि काही घटना मात्र कृर मुसलमान घडवतात... गंमतच नै का?

त्या तुमच्या यादीतील घटना देवाने घडवल्या .. मग तो हुसेन, त्याचा तो क्लोन, हुसेनला क्लोन करायची बुद्धी देणं... हे सगळं कुणी केलं?? त्या बंडाच्या केसमध्ये बादशाला २०० लोक मारायची प्रेरणा कुणी दिली?

तीन दिवस मायबोलीवरच आयुष्य असलेला मायबोलीकर नेमक्या ह्याच धाग्यावर येतो आणि नेमकी प्रतिक्रिया देतो यात परमेश्वराचाच हात आहे.

बाकी जो इराक मध्ये जगला, जो ही फिल्म बनवण्याची प्रेरण आहे त्याला काही किंमत नाही. जो म्हणतो " माझ्या माहिती प्रमाणे" की जी वर्तमान पत्रातली आहे किंवा दुरदर्शनवरची आहे आणि आत्ता त्याला पुरावा नाही ते मात्र १००% खात्रीलायक समजायचे का ?

एक तर्क आहे

गडाफी, उदय हुसैन इ. ( या लेखात अजुन उल्लेख नाही म्हणुन नाहीतर मुसलमान क्रुरकर्म्यांची नावे शोधता येतील ज्यांचे तोतये/हमशकल होते ). यांनाच तोतये ठेवण्याची का गरज पडावी ? ओसामा बीन लादेन याला मारण्याची कृती स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या नियंत्रणात का असावी ? त्यांनीच तो खराखुरा ओसामा होता हे का जगाला सांगावे ?

उत्तर साध आणि सोप आहे. त्यांची कर्म जी क्रुर होती आणि जी पुढे सिध्द होऊन मरणे इतका एकच पर्याय शिल्लक होता. दुर्देवाने ते भारतात नव्हते नाहीतर कसाब, अफजल यांच्या सोबत आणखी काही नावे जगापुढे आली असती.

भास्कर, कधी कधी क्रूरता, थेट चित्रीत न करता देखील, परीणामकारक करता येते.

एकाच विषयावरचे किनयारवांडा / हॉटेल रवांडा / समटाईम्स इन एप्रिल हे तीन चित्रपट नक्की पहा.

इंदीरा गांधींच्या पण डुप्लिकेट होत्या, अशी वंदता आणीबाणीच्या काळात होती.

इंदीरा गांधींच्या पण डुप्लिकेट होत्या, दिनेशदा, त्यांना कश्याला यात ओढता ? त्यांनी आणिबाणित फक्त विरोधक तुरुंगात घातले. त्यांना ठार मारले नाही. जनतेच्या दरबारात जाण्याची ( लोकशाही मार्गाने ) आवड इंदिराजींना जास्त होती.

@नितीनचंद्र-

यांनाच तोतये ठेवण्याची का गरज पडावी ?

....उत्तर साध आणि सोप आहे. त्यांची कर्म जी क्रुर होती आणि जी पुढे सिध्द होऊन मरणे इतका एकच पर्याय शिल्लक होता.

तुमच्या तर्कात गफलत आहे.
'तोतये ठेवण्याची गरज' ही जीवाच्या भीतीतून निर्माण होणे तुम्हाला मान्य आहे असे दिसते. आणि जीव जाण्याची भीती ही फक्त 'क्रूरकर्मा' कॅटेगरीलाच असते, असे काही नाही.

आपल्यावर प्राणघातक हल्ला होण्याचा संशय / भीती असलेला कुणीही (अर्थातच, पावरफुल) माणूस तोतया ठेवू शकतो. तो क्रूरकर्मा असलाच पाहिजे असे नाही.

आपल्यावर प्राणघातक हल्ला होण्याचा संशय / भीती असलेला कुणीही (अर्थातच, पावरफुल) माणूस तोतया ठेवू शकतो. तो क्रूरकर्मा असलाच पाहिजे असे नाही.
ज्ञानराज्या ट्रेंड काय दर्शवतो ?

इंदिराजी मला आजही आवडतात. त्यांच्यासारखा समर्थ नेता, भारताला कधी लाभलाच नाही.

गल्फ वॉर दरम्यान, उदयचे नाव कानावर येत होते. त्यावेळी आम्हाला उदय या नावाची गंमत वाटायची. ( मी गल्फ मधेच होतो आणि आजूबाजूला कुणीच दुसरा उदय नव्हता. त्यांच्यात फार नावे नसतात, एकंदर ९९९ च नावे आहेत. )

इंग्रजीत एक म्हण आहे. if you want to kill a dog, call it mad. यालाच अनुसरुन अमेरिकनान्नी सद्दाम व त्याच्या मुलान्विषयी अनेक प्रवाद पसरवले. ते क्रूर नसतीलच असे नव्हे पण मग अमेरिकन कहाण्यान्ना भंपकपणाचा वास अधिक येतो.....

Pages