वाट

Submitted by चिखलु on 7 October, 2012 - 23:37

वाट चालतच राहते अज्ञाताच्या प्रवासात
कधी थकली शिणली तर कुठे झाडाखाली विसावा घेते, आणि निघते पुढच्या प्रवासाला

तिला कुणाशी काही देणे घेणे नाही, पाणवठ्यावर तलावात नाहीतर विहिरीवर तहान भागवते
कोणी बोलावले तर घरातही जाऊन येते, शिधा घेते, पोट भरते, थांबत मात्र नाही

वाटसरू कधी हसत कधी रडत हुरहुरत चालत राहतो, वाटेला मात्र भावना नाहीत, तिला सुख दुखः माहित नाही
वाट अखंड प्रवास करते; न थांबता वाटसरूला मुक्कामी पोहचवते, तिला मात्र आहे मुक्कामाची घाई

मजल दरमजल करत, मुक्काम कधी येणार याची वाट बघत, वाट चालतच राहते

Hutma.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरा उपवनाजवळून थेट क्षितिजाच्या अज्ञातापर्यंत जाणारी वाट सुंदर चितारलीय तुम्ही चिखल्या, अन मनोगतही काव्यमय..एक 'वळण' नावाची माझी खूप जुनी कविता आठवली :))

शुभेच्छा