कोण्या एकेकाळचे प्रेम

Submitted by prafulladutta on 6 October, 2012 - 02:24

भावनांना तुझ्या तू घाल आता आवर
झाली अनेक वर्षे होवूनिया आपण दूर
कोणा एके काळी होतो भारावलेला मी
नाजूक भावनांनी झालो पुलकित दोन्ही
अनेक सांझवेळी गाणे तुझे मी गाई
माझ्या आणाभाकांनी तुझे मन तृप्त होई
तुझ्या एका स्पर्शासाठी असे मी आतुर
असे तुझे मन मात्र स्वप्नांमध्ये दूर
कशी केली तुझी मी निर्घृण प्रतारणा ग
रमलो चंदेरी दुनियेत अन विसरलो तुला मग
आलो परत आता पण झाला फार वेळ
पाहुनिया तुला पुन्हा आठवले सारे अन आले मळभ
मी जरी बदललो तरी तू तशीच आहेस
वय झाले खूप आता अन मला नाही साहस
तुझ्यातली निष्ठा अन पाहुनिया निरंतर प्रेम

शरमेने मी ग मेलो आधीच जीर्ण देह
आता कशी ग करू उतराई
जरी शिक्षा देशी एक जन्म पुरा नाही
पश्चात्ताप होतो मला मार्ग तूच दाव
करशील मला माफ माझे ओळखुनी भाव ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users