भारवाही

Submitted by शाबुत on 4 October, 2012 - 03:35

जळतात ओठ माझे
गीत गावया सुखांचे
फुफटात पडलो आहे
दुर रान ते फुलांचे

जगण्याचा आंनद केव्हाच
घामात विरुन गेला
मरण्यासाठी जवळ केला
मध्याचा विषारी पेला

बिकट कोडे जिवणाचे
कधिच कसे सुटले नाही
वजन छाती वरती
झालो नुसता भारवाही

लागली एकच आस
आता शेवटच्या क्षणाची
पण उघडतिल का दारे
माझ्यासाठी रम्य स्वर्गाची

- श्यामराव.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

....!