सिद्धगड भीमाशंकर - एक विलक्षण ट्रेक अनुभव

Submitted by वेडसह्याद्रीचे on 3 October, 2012 - 04:50

पहिली आठवण ....इथे क्लिक करा
http://www.maayboli.com/node/38361

दुसरी आठवण
२)मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट :

सिद्धगडहून भिमाशंकरला जाणारी ती जंगलातली पायवाट आणि त्या मार्गी जात असता घडलेला तो प्रसंग अजून लक्षात आहे....ताजा आहे .
आणि तेच आज मी तुम्हाला इथे कथन करणार आहे . ..सांगणार आहे .

तर मागील भागत आपण पाहिले ...कि कसे आम्ही वाट काढत काढत ...सिद्धगड च्या नेहमीच्या वाटेलां येऊन मिळालो.
तिथे ज्या निर्जन स्थळी जे काका भेटले त्यांनी आम्हाला गडावर जाणारी वाट दाखविली ...आणि ते स्वताहा काही अंतरा पर्यंत आमच्या सोबत आले .
394950_319704401385810_95599233_n_800x600.jpg

तिथून पुढे काही वेळेतच दगडांच्या त्या राशी पार करत करत ..घाम गाळत गाळत आम्ही सिद्धगड च्या त्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो , अन थोडीशी विश्रांती घेऊन ,माझ्या डिजिटल कॅमेरातून आमच्या चौघांची एक आठवण म्हणून त्या दरवाजापाशी एक छानशी छबी घेतली .
395100_319704964719087_1928958691_n.jpg
अन पुढे सरसावलो .

दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही मळलेल्या वाटेने वेडे वाकडे होत होत. मंदिरा जवळून सिद्धगड वाडीत पोहोचलो . (सिद्धगडा वरच वसली आहे ती सिद्धगडवाडी )
394278_319705428052374_1904712344_n.jpg

वाटेत आम्हास ''शर्मा नावाचा एक गृहस्थ '' दिसला 'तरुणच होता .
नुकताच तो भीमाशंकर करून कोंढवळ गावा मार्गी सिद्धगड ला आला होता आणि इथून मग गोरखगडाच्या दिशेने तो वाटचाल करणार होता.
402326_319705118052405_1620448355_n (1).jpg

एकटाच तो ....सोबत कुणी नाही . ..तरीही ३-४ दिवसाचे ट्रेक करायचा ..जंगलात रात्र काढायचा .मैलो नि मैल चालायचा ...त्याच ते धाडस खरच कौतुकास्पद होत.
घनदाट जंगलात..त्या किर्र किर्र आवजात ...निर्जन वस्तीत ...एकट्याने रात्र काढण ....म्हणजे खूपच मोठ धाडस आहे....ते चित्र डोळ्यासमोर आणताच अंगावर हि माझ्या काटा येतो .
नर्मदा परिक्रमा हि त्याने पूर्ण केली होती. त्याने मी तर भारावून गेलो होतो.
मागे मी मलंगगड ट्रेक केला होता ..''एकट्याने'' तो त्याच्याकडून मिळालेल्या त्या प्रेरणेनेच.

आमचा त्याच्याशी परिचय झाल्यानंतर तो ...त्याच्या मार्गी ..गोरख गडाच्या दिशेने निघाला.
नि आम्ही सिद्धगडवाडीत एका घराच्या मोकळ्या अंगणात ..त्या घरातील आजीला विचारून पाय मोकळे केले . नि लगेचच पाठपिशवीतील आमचे जेवणाचे डबे काढून जेवणावर ताव मारण्यास सुरवात केली.
माझ्या बहिणी बाईनी म्हणजेच संपदा ने मस्तपैकी इडली अन सोबत चटकदार चटणी आणली होती.
404311_319705298052387_2122427932_n.jpg
यतीन महराज ने घावन्या सारख काहीतरी पदार्थ आणले होत. (नाव आठवत नाही आता, पण खूपच चवीस्ट होत .). आणि रश्मी ने मस्तपैकी खिचडी भात . आणि अजून काहीतरी होत (ते हि आता आठवत नाही ) पण ...
सगळे कसे पोटभर जेवले . संपदाने आणलेल्या बर्यासच्या इडल्या मी एकट्यानेच फस्त केल्या. नि त्याचबरोबर इतरही पदार्थ संपवले . ....इतकी भूख लागली होती मला.. . (ह्यावरून पुढे बरेच असे गमतीचे क्षण घडले, 'जे मी तुम्हाला सांगणार नाही. 'नाहीतर बरसच माझ्या बद्दलच गुपित बाहेर पडायचं)

तर जेवण उरकल्यानन्तर काही वेळ विश्रांती करून आम्ही सिद्धगड वाडीतून बाहेर पडू लागलो.
खर तर आम्हाला सिद्धगडचा बालेकिल्ला हि सर करायचा होता ...पण वेळेच्या कमी मुळे आणि पुढे ३ ते ४ तासाची निर्जन वस्तीची जंगलातून पायपीट करायची असल्यामुळे . आणि काळोख्याच साम्राज्याचा विस्तार होण्याआधी वेळेत आमच्या स्थळी , आमच्या मुक्कामी पोहोचाण्य्साठी , वेळ न दवडता आम्ही निघू लागलो .

सिद्धगड वाडीत आम्ही पोहोचलो त्यावेळेस गावातला एकही कर्ता पुरुष गावात न्हवता. (आम्ही दोघे सोडून तसे आम्ही गावातले न्ह्वातोच म्हणा ). तर गावात शांतता होती. सुन्न करणारी ...

आमचे पाय गावातून सर सर करत बाहेर पडू लागले .....थोड्या वेळेतच आम्ही मंदिरापाशी पोहोचलो .तिथे एक दोन जण पुरुष मंडळी काम करत असताना दिसली . ...पुढे जात असता त्यांची नजर आम्हावर खिळली . आम्ही तसेच पुढे जावू लागलो आणि सिद्धगडाच्या त्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो.
इथून पुढे एक वाट जाते ती भीमाशंकर ला घनदाट अन निर्जन जंगलातून आणि एक वाट आलो त्या मार्गी म्हणजेच नारिवली गावात .

आम्ही भीमशंकर मार्गी निघू लागलो . आणि काही वेळेतच एका पठारापाशी येऊन पोहोचलो , तिथे काही शिल्पे आणि एक छोटास मंदिर होत . त्याच छायाचित्रण करून आणि दूरवरच ते सिद्धगडाच विलोभनीय दृश्य मनात साठवून आम्ही पावलो पाउली निघू लागलो.
402581_319706208052296_1985364878_n.jpg385501_319706364718947_1973652636_n.jpg

वाटेतून जात असता आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी बरेच असे बाण कातळावर अथवा झाडीवर ओढीले आहेत. त्या बाणाच्या दिशेने आम्ही निघू लागलो .
385919_319707244718859_70689444_n.jpg
आमच्या सगळ्यात पुढे यतीन साहेब होते त्यांनतर रश्मी आणि संपदा आणि सगळ्यात शेवटी मी .
असा आमचा क्रम ट्रेकच्या शेवट पर्यंत तसाच होता.
405337_319707194718864_1620372558_n.jpg

बराच वेळ निघून गेला .....आता घनदाट झाडीस सुरवात झाली होती ...सिद्धगड अजूनही डोक वर काढत जणू आम्हावर पहारा ठेवत होता. त्या निरव शांततेत .. रात किड्यांच्या किर्र किर्र ...अन पावलांचा चालण्याचा आवाज .आणि आम्ही चौघे मनुष्य प्राणी .....

हळू हळू पुढे कुणास ठाऊक ...मला भास होऊ लागला ..कि माझ्या मागून कुणीतरी येत आहे .
चर्र चर्र असा आवाज येऊ लागला . मागे वळून पाहिल्यास कुणी दिसत न्हवत . कुणीतरी आपला मागे लक्ष ठेवून आहे, अस सतत भासत होत,
मनात एक प्रकारे घबराटीचे सावट पसरू लागल होत. मला भास होत होता कि ...कुणी होत तिथे .....माहित नाही
संरक्षणासाठी तसं प्रत्येका कडे हत्यार होतच . ते बाहेरच काढूनच ठेवलं होत.
कुणास ठाऊक ह्या घनदाट निर्जन जंगलात काय कधी घडेल . ......आम्ही होतो तेही चौघेच . दोन मुल अन दोन मुली.

थोड्या वेळाने एक खोल दरीला वळसा घेत आम्ही थोड्या पुढे आलो नि ....त्या एका क्षणाने स्तंभित झालो.
382638_319707154718868_660342874_n.jpg
आनंदाला उधाण आला ..............जे मी पुस्तकात वाचलं होत.(शेकरू - रणजीत देसाई ) ते प्रत्यक्षात अनुभवत होतो.
शेकरू ...खारी सारखा पण खारी पेक्षा हि मोठा असा हा प्राणी टूणटूण फांद्या फांद्यावर उड्या घेत , एका मागो माग एक असे ते दोन शेकरू आमच्या समोर झाडीच्या त्या उंच शेंडीवर बागडत मस्ती करत जात होते . त्यांच्या त्या यथार्थ दर्शनाने आम्ही सुखावलो.

आणि त्याच आनंदात पुढे जात असता ................ते क्षण डोळ्यात तरळत असता.
एका विचित्र आवाजाने, त्या किंकाळीने मन सैरा वैरा झाले . काहीच कळेनास झाल . पाउल तिथेच जागीच थबकली . श्रवण ग्रंथी अन नजरां चुहीकडे त्या आवाजाच्या दिशेने घुमू लागल्या ,

त्या कुणा मनुष्य व्यक्तीच्या किंकाळ्या होत्या , त्या किंकाळ्या त्या निरव शांततेत अजून भयग्रस्त वाटत होत्या . तो भयानक आवाज चारी दिशांना घुंगावत होता . मनाचा थरकाप उडवत होता .
दूर वर दिसणाऱ्या त्या मंदिरा जवळून तो आवाज येत होता. अस आम्ही गृहीत धरल . अन इथून त्वरित निघायला हव म्हणून ...पटा पटा पाऊल उचलू लागलो अन कोंढवळ गावाच्या दिशेने भीमशंकर च्या वाटेने त्या घनदाट निर्जन जंगलातून पुढे पुढे चालू लागलो.
378042_319707348052182_528790604_n.jpg

काही तासानंतर आम्ही पठारावर सुखरूप पोहोचलो, इथून पुढे कोंढवळ गाव काहीच अंतरावर होत. आम्ही जात असता एक ५-६ जणांचा पुण्याचा ग्रुप आम्हाला दिसला .
373871_319708444718739_914945453_n.jpg
सगळी वयस्कर मंडळी होती . रात्री मुक्कामी होती सिद्धगड ला आता कोंढवळ गावात मुक्कामी जाणार होती.
आम्ही हि त्याच मार्गी असल्यामुळे आम्ही त्यांच्यात मिसळून गेलो . एकमेकांची ओळख झाली अन बोलत बोलत चालत चालत आम्ही कोंढवळ गावात पोहोचलो ते साधारण सायंकाळी ६:३० वाजता .

रस्त्याततून बोलत बोलत त्या ग्रुप मधील काकांनी (पाउने तीनशे किल्ले सर केलेलं काका ) नाव आठवत नाही आता , पण त्याच्याकडून आम्हाला सर्व हकीकत कळली . जी त्या भयग्रस्त आवाजाशी निगडीत होती.
377129_319709304718653_1276623633_n.jpg

घडल होत काय ...तर गावातील सारी पुरुष मंडळी त्या मंदिरा जवळ (गावापासून जरा दूर असलेल्या मंदिरापाशी )एकत्र जमली होती ...ती शिकारी साठी ...शिकार जाळ्यात फासण्यासाठी , आणि त्यासाठी ते असे चित्र विचित्र आवाज काढत अन किंकाळत होते.

पण ते माहित नसल्यामुळे आमचा मात्र त्या निर्जन स्थळी भर जंगलात मनाचा थरकाप उडाला होता.

तर अशी हि गोष्ट ...खरी खुरी जी आमच्या ट्रेक दरम्यान घडली होती.
आणि अशा त्या क्षणांन मुळे आमचा हा ट्रेक यादगार ठरला होता. ..नि आहे .

तसं अजून बऱ्याच आठवणी बाकी आहेत . ते तुम्हाला मी नन्तर सांगेन .

धन्यवाद ...!!!!!

संकेत य पाटेकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सन्केत....खुप छान....
पण...

>>>>>>>>>
वाटेत आम्हास ''शर्मा नावाचा एक गृहस्थ '' दिसला 'तरुणच होता .
नुकताच तो भीमाशंकर करून कोंढवळ गावा मार्गी सिद्धगड ला आला होता आणि इथून मग गोरखगडाच्या दिशेने तो वाटचाल करणार होता.एकटाच तो ....सोबत कुणी नाही . ..तरीही ३-४ दिवसाचे ट्रेक करायचा ..जंगलात रात्र काढायचा .मैलो नि मैल चालायचा ...त्याच ते धाडस खरच कौतुकास्पद होत.
घनदाट जंगलात..त्या किर्र किर्र आवजात ...निर्जन वस्तीत ...एकट्याने रात्र काढण ....म्हणजे खूपच मोठ धाडस आहे....ते चित्र डोळ्यासमोर आणताच अंगावर हि माझ्या काटा येतो .
नर्मदा परिक्रमा हि त्याने पूर्ण केली होती. त्याने मी तर भारावून गेलो होतो.
मागे मी मलंगगड ट्रेक केला होता ..''एकट्याने'' तो त्याच्याकडून मिळालेल्या त्या प्रेरणेनेच.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पण तो जर नुकताच भेटला होता तर....त्याच्या प्रेरणेच मलंगगड ट्रेक कधी केला??? :अओ:.. :अओ:..
क तो कोणी दुसरा होता? Light 1

अमित

पण तो जर नुकताच भेटला होता तर....त्याच्या प्रेरणेच मलंगगड ट्रेक कधी केला???
<<
<<
अहो एकवाचक, त्यांच्या ह्या लेखाचा "भाग एक" वाचला नाही का तुम्ही, त्यात त्यांनी लिहलय की हा ट्रेक त्यांनी १-२ जानेवारी २०१२ मध्ये केलाय. आणि त्याचा वृतांत आता लिहलाय. आता जानेवारी २०१२ ते सप्टेंबर २०१२ या मधल्या वेळेत केला असेल त्यांनी मंलगगडचा ट्रेक.

विजय आंग्रे आपण बरोबर बोललात .....मलंग गड हा ट्रेक मी सिद्धगड - भीमाशंकर ट्रेक नन्तर एक महिन्याने म्हणजे फेब्रुवारी मध्ये केला आहे ..

छान Happy

वा रे बहाद्दर, मस्त लेख......

हे शर्मा कोण आहेत त्यांना तर ____/|\____

तुम्हा सर्व जणांचे शुभाशीर्वाद असेच सोबत राहो ..!!!
धन्यवाद !!

प्रिय संकेत ,
फारच छान लेखन पद्धत आहे सादरीकरण उत्तम ...मित्र असाच लिहित राहा १००% तुझ लेखन क्षेत्रात उज्वल भविष्य आहे ,,,

मस्त झालातर ट्रेक , मला वाटलं काहीतरी त्रासदायक घडतय पुढे ! <<(मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट :)>> .
प्र.ची. अन लेखण सुंदर !

छान Happy

संकेत भारीच वृत्तांत
तुम्ही गडावर गेला नाहीत काय ? कारण माझ्या मते सिद्धगड माची पायथ्याचे गाव आहे.
आणि जो घाट चढून तुम्ही कोंढवळ गाठले तो गायदरा घाट आहे.
गडावरून अलंग मदन कुलंग कात्रा अशी सगळी रांग दिसते, वातावरण स्वच्छ असेल तर माहुली देखील दिसतो.
लेख वाचून सह्यांकन ११ च्या आठवणी ताज्या झाल्या.
बाकी लिहीत राहा

धन्यवाद ....आपल्या प्रतिक्रियेबद्दल !!

आम्हाजवळ त्यावेळेस तितकासा वेळ नसल्याकारणाने ......बालेकील्ल्य्वार जाता आले नाही , अन्यथा नक्कीच गेलो असतो.
पुढील वेळेस नक्की जावू ...........