आयना का बायना...घेतल्याशिवाय जाईना..

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 October, 2012 - 23:47

आयना का बायना..घेतल्याशिवाय जाईना...

Aayna Ka Bayna logo eng.jpg

अक्षरा फिल्म्स डिव्हिजन एलएफएस मिडिया अ‍ॅण्ड एण्टरटेन्मेंटच्या सहकार्यानं सादर करत आहे ’आयना का बायना’, आंतरराष्ट्रीय नृत्यशैलींना वाहिलेला पहिला मराठी चित्रपट.

ठेका धरायला लावणारी गाणी आणि जॅझ, हिप-हॉप, बचाटा असे भन्नाट नृत्यप्रकार हे वैशिष्ट्य असणार्‍या या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत मायबोली.कॉम.

निर्माते - अमर कक्कड, पुष्पा कक्कड, मंजू पारस पोरवाल
दिग्दर्शक - समित कक्कड
संगीत - अजीत - समीर
छायांकन - संजय जाधव
नृत्यदिग्दर्शन - उमेश जाधव, रोहन रोकडे
गीते - जितेंद्र जोशी, बाबा चव्हाण
सृजनात्मक सल्लागार - दीपा मेहता
कार्यकारी निर्माते - हेम पारिख, सचिन कक्कड, सुरेश लुनिया

कलाकार - सचिन खेडेकर, अमृता खानविलकर, राकेश वशिष्ठ, गणेश यादव, सिद्धेश पै, अमित रोकडे, प्रवीण नायर, आनंद चव्हाण, संकेत फराड, दिनेश कांबळे, निखील राजेमहाडिक, राहुल कुलकर्णी, अखिलेश विश्वकर्मा

पाहा या चित्रपटाची पहिली झलक...

आयना का बायना...पाहिल्याशिवाय जाईना...

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो... ट्रेलरमुळे उत्सुकता सॉलिड वाढलीये. माध्यम प्रायोजक होताना मायबोली मस्त सिनेमे निवडते आहे ह्यात शंका नाही Happy

याचा एक सर्व डान्सर मुलांचा प्रोग्राम झाला होता बहुतेक एबीपी माझा/आयबीएनच्या ऑफिसमध्ये (नक्की आठवत नाहिये)..... भर ऑफिसात सगळे हिप हॉपवर नाचले होते कलाकार.... मस्त होतें ते....... सिध्देश तर बेस्टच आहे.

.

"आयना का बायना" या सिनेमाची दखल घेतलीये ते थेट अमेरिकेतल्या "American Cinematographer" या सुप्रसिध्द मासिकाने.
ही त्यातल्या लेखाची लिंक - http://sphotos-c.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/528213_469348653107558_855...

या मासिकात जगभरातल्या सिनेमांच्या तंत्रज्ञानाची तसेच दिग्दर्शक आणि छायाचित्रकाराच्या कामाची दखल घेतली जाते. आतापर्यंत भारतातून हा मान मिळवणारा "आयना का बायना" हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

या सिनेमाची दखल जगप्रसिध्द "Kodak In Camera" या प्रसिध्द मासिकानेही घेतली आहे.

इतकंच म्हणेन कि मोठे व्हा

असले हास्यास्पद चित्रपट काढून , मराठी पब्लिक ने ते वर बघावेत अशी अपेक्षाच कशी काय करू शकतात हे
नुसताच मराठीचा अभिमान म्हणून लोकांनी का म्हणून पैसे वाया घालवावेत .
आयना का बायना - माझं रेटिंग १.१/५*

बन्या तुम्ही कशाच्या बेसिसवर असे म्हणताय ते कळलं नाही.
जमल्यास तुम्ही सिनुमाचा रेव्हिव्यू लिहा... बघू तुमचं म्हणनं नेमकं काय आहे ते!
मी आजून सिनेमा पाहिलेला नाही. कारण मराठी सेनेम्यांबद्दल माझं मत एका वाक्यत सांगायचं तर "मराठी इज डर्टी" मराठीतले नायक पाहिले की ते डोक्यात जातात. अगदी लक्षा, अशोक सराफ ते मकरंद अनासपूरे पर्यंतचे सगळेच. एकही नायक एकतरी बाबतीत रोल-माडेल बनावा ह्या लायकीचा नाही. सगळे चिंदी वाटतात. हिरोव्हीन्या मात्र अगदि उलटं आहे. त्या मराठी तर सोडाच पण हिंदि व संपुर्ण भारताचं प्रतिनिधित्व(सिनेमाच्या बाबतीत) करतात. हा विरोधाभास का? ते मात्र कळत नाही. आजच्या पिढीला रेप्रेझेंट करणारा एकही पुरुष मराठी सिनेमात नाही याचे खंत वाटते. मक्या-सिध्याला (जाधव) या पिढीचा(मराठी) प्रतिनिधी मानायला जीव धजावत नाही.
कोणीतरी आणा रे एखादा चांगला हिरो मराठीतही. म्हणजे आम्हीही सिनेमे पाहू.

आजून एक मला न कळलेलं गणित. नेहमी मराठी निर्माते म्हणत असतात की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमे पाहायला येतच नाही मग चांगले सिनेमे बनणार कसे?
मला त्याना विचारावसं वाटतं, ते येऊन थिएटरात बसल्यावर तुम्ही सिनेमे तयार करणार की काय? अहो तुम्ही चांगल बनवाल तर प्रेक्षक येतील ना? गिर्‍हाईक आल्यावर चांगला माल विकायला काढणार की चांगला माल विकायला आहे म्हणून गिर्‍हाईक येणार? हे एवढं साधं ज्याना कळत नाही असली डोकी मराठी सिनेमे बनवत आहेत. मग कसे चालणारे सिनेमे?
असो.
वरिल तळमळ ही मराठी प्रेमापोटी आहे.
मी माझ्या मुलाना मराठी माध्यमातून शिकवतोय(इंग्रजी माध्यमातून शिकवायली कुवत असताना), घरी मराठी पेपर वाचतो, पाच इंग्रजी पुस्तकं घेतले की किमान दोन मराठी पुस्तकही घेतो. कुणाला चेक द्यायचा असल्यास तो मराठीतच लिहतो. सही सुद्धा मराठीतच करतो. हे एवढं सध्या माझ्या आवाक्यात आहे जे मी मराठी साठी करु शकतो. मागे पुढे हा आवका वाढलाच तर ठिकच. नाहीतर एवढं मात्र मरेस्तोवर रेटेने हे नक्की.