बाप्पा मोरया - पुणे गणपती विसर्जन मिरवणूक २०१२

Submitted by आशुचँप on 1 October, 2012 - 12:34

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना खूप खूप धन्यवाद....

जिप्स्या - दे दे यंदा काही प्रॉब्लेम नाहीये...बाप्पांचे फोटो सोडून बाकी काही फोटोंवर वॉमा टाकलेत...त्यामुळे जरी कोणी चोरून कुणाला पाठवले तरी आशुचँप नाव घरोघरी पोचेल एवढे मात्र नक्की...

यो - मेल्यांनो तुम्ही दोघे येणार होतात ना पुण्याला विसर्जन मिरवणूकीसाठी....तुमच्यासाठी घरी उकडीचे मोदक तयार होते...आता बसा पुढच्या वर्षाची वाट पाहत

हिम्स - छब्बू नको झब्बू दे...दोन चार कशाला भरपूर दे

धन्यवाद दिनेशदा

आशू, मला धन्यवाद दे. मी रविवारीच हे फोटो इथे डकवाणार होते. पण म्हटल, जुन्या लोकाना आधी संधी द्यावी. Proud
मस्त आलेत फोटो सगळे. Happy

बाप्पा.....सायोनारा.....सायोनारा.....>>>>>>.ही बघ झोपलेली.

बाकीचे झब्बू उद्या. Happy

वा... अप्रतिम
बाप्पाचे सगळे क्लोजप्स मस्त आलेत... पुण्याची मिरवणूक खरंच खूप आठवते दर वर्षी.. तुमच्यामुळे थोडा तरी दिलासा मिळाला.. धन्यवाद Happy

आशुचँप, मस्तच. तुमची गेल्या वर्षीची प्रकाशचित्रेही अजून आठवणीत आहेत. तुमच्या फोटोंचे कोन, फोकस, क्षण आणि शीर्षकं छान असतात.

(हिम्या राजकारण्यांसारखी नुस्ती आश्वासनं देतो झब्बु देण्याची.)

सर्वच चित्रे 'प्रचंड भयानक' (:फिदी:)आहेत. ('भीषोण शुन्दर' या चालीवर वाचावे.)

आशुजी तांत्रिक डिटेल्स द्या बुवा कृत्रिम प्रकाशातही तुम्ही व्हाईट बॅलन्स आणि रंगांची ओरिजिनॅलिटी कशी मेन्टेन करता याबाबत उत्सुकता आहे. आणि कॅमेरा शेक चे कसे करता?

खल्लास मित्रा...
काय एकेक फोटोज् आहेत.
आणि भावमुद्रा पण काय...
तो जोशात ढोल वाजविणार्‍याचा फोटो तर जाम आवडला.

मिरवणूकीत लहान मुलं बघून्(पालकांच्या खांद्यावर वगैरे) आश्च्रर्य वाटते. इतका आवाज कसा सहन करतात?

एक मुलगा स्वतः वाजवतोय..

झंपी. डीजे /स्पीकर भिंतीच्या आवाजामुळे जसे गुदमरायला होते किंवा ताण वाटतो तसे ढोल ताशाच्या आवाजाने त्रास होत नाही. उलट लयीमुळे मस्तच वाटते...

आशुचँप, मस्त फोटो !
अरे तो छोटा मुलगा ढोल वाजवतोय ना 'ताल' पथकातला त्याचवेळी मी सुद्धा तेथे होते. माझा मुलगा सुद्धा त्याच पथकात ढोल वाजवत होता, त्यामुळे माझ्याकडे पास होता म्हणून मी त्या सर्वांबरोबरच होते. Happy

सर्वांना खूप खूप धन्यवाद....
बाळू जोशी

सर्वच चित्रे 'प्रचंड भयानक' आहेत. ('भीषोण शुन्दर' या चालीवर वाचावे.)

हाहाहाहाहाहा....

तांत्रिक डिटेल्स सांगायचे झाले तर व्हाईट बॅलन्स ऑटोवर ठेवला होता...जवळपास सगळे फोटो अपार्चर प्रायोरिटी मोडवर काढले आहेत....कृत्रिम प्रकाशातही शेक कमी करण्यासाठी आयएसओ जास्तीत जास्त ठेवला होता...(काही वेळेस ६४०० तर बरेच वेळेस ३२००) आणि स्पॉट मिटरींग होते...
लेन्स ५५ २५० वापरली...अधूनमधून १८ ५५

झा मुलगा सुद्धा त्याच पथकात ढोल वाजवत होता,

अजून एक लहान मुलगा ढोल वाजवत होता तो तुझा मुलगा होता का...त्याचेही फोटो आहेत माझ्याकडे...पण गेल्याच वर्षी त्याचे टाकले होते म्हणून यंदा नाही टाकले...

Pages