माणुसकीचा अंत

Submitted by विश्वजीत दीपक गुडधे on 30 September, 2012 - 07:26

(गझल)
माणुसकीचा अंत

दंश करती अहीच्या फणासारखे
घाव हृदयास घाली घणासारखे

राहिल्या ना कुठे आत संवेदना
आचरण दानवांच्या गणासारखे

ना कळे केवढे प्राण अनमोल ते
छाटती कैक लोका तणासारखे

शत्रुतेच्या समुद्रात आत्मीयता
वितळते साखरेच्या कणासारखे

'विश्वजित' तू उगा राखली शांतता
भांडते आज जग हे रणासारखे

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

धन्यवाद

व्याकरणाची बोम्ब आहे !!

खयाल बरे आहेत

ऑर्फियस(सुधाकर) यान्चे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना करू इच्छितो!! देवपूरकर सरान्चे मार्गदर्शन घेतल्यास अधिक उत्तम !!

धन्यवाद