तिचा जन्म

Submitted by विश्वजीत दीपक गुडधे on 30 September, 2012 - 07:10

तिचा जन्म

कळी खुलण्यापुर्वीच
ती अशी खुडली गेली
सख्ख्या मायबापांनीच
केले मृत्युच्या हवाली

का बरे असला रोष
केवळ स्त्रीच्याच पात्री
भुललात ? तीच असे
या जगाची जन्मदात्री

दुर्गा, भवानी, लक्ष्मीचे
करता जंगी पूजन
परि या गृहलक्ष्मीला
दाविता यमसदन

'हवा फक्त मुलगाच'
याचा सोडून द्या आव
मुलीचा जन्म झाल्यास
साजरे करा उत्सव

मुलं असो किंवा मुली
दोन्ही आहेत समान
मुलगा वंशाचा दिवा
मुलगी वंशाची शान

उमलू द्या त्या कळ्यांना
नका कुस्करु ही फुलं
आकाशास गवसण्या
होऊ द्या द्वार हे खुलं

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमरवतीकर छान आहे विषय पण काव्याच्या सौंदर्य प्रतिभेसाठी अजून थोडी कसरत करावी लागेल. ... पुलेशू.