होळी

Submitted by विश्वजीत दीपक गुडधे on 30 September, 2012 - 06:46

होळी

होळी घेऊन आला फाल्गुन
आनंदात आम्ही निघालो न्हाऊन

होळीचा हा प्रसन्न ऋतू वसंत
रंगात उधळून निघाला आसमंत

सण असे हा त्यागाचा अन विश्वासाचा
शत्रुता त्यागून मित्रता स्वीकारण्याचा

होळीच्या या तपत्या ज्वाला
नमन करतो आम्ही तिला

काढा पिचकारी, उधळा गुलाल
हिरवा, पिवळा, निळा, लाल

वापरू नका ते रासायनिक रंग
करतील ते होळीचा आनंद बेरंग

रासायनिक रंग घातक त्वचेला
लावतील ग्रहण होळीच्या आनंदाला

रासायनिक रंगांचा आनंद क्षणिक
वापरावे फक्त रंग नैसर्गिक

अर्पण करा होळीला इर्षा-द्वेष
हाच असे होळीचा संदेश

पर्यावरणाचे रक्षण जबाबदारी आपली
साजरी करूया होळी इको-फ्रेंडली

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

आता उरलेल्या कविता महिन्याभराने टाका.

मी २-३ वर्षांपासून लेखन करत आहे. मात्र मायबोलीवर नव्यानेच आलो आहे...म्हणून माझ्या सर्व ४०-५० कविता, गझल लवकरात लवकर इथे टाकण्याचा प्रयत्न होता...