पाऊस

Submitted by विश्वजीत दीपक गुडधे on 30 September, 2012 - 06:27

पाऊस

जेव्हा पाऊस बरसत असतो
सगळ्या सृष्टीला हसवीत असतो
वृक्षांवरी पसरते लकाकी नवी
चहूकडे पसरते मखमल हिरवी
खळाळतात सगळे नाले-ओढे
आनंदाने डोलतात हिरवी झाडे
बळीराजांची पिकांची प्रतीक्षा संपवी
भारतभूमीस सुजलाम-सुफलाम बनवी

पण जेव्हा पाऊस रुसून बसतो
कितीही विनविल्या बरसत नसतो
पावसाविना पिके जातात करपून
घरातील अन्नधान्य जाते संपून
विहिरी-तळी आटून जातात
गाई-गुरे तडपून मरतात
सर्व चराचर भुकेने व्याकूळ होते
चहूकडे रुक्ष वाळवंट विक्राळ हसते

करण्यास सर्व जीवसृष्टीचे कल्याण
फुंकण्यास सर्व चराचरात प्राण
पावसाने सदा बरसत राहावे
संपूर्ण जगाचे पालनपोषण करावे
आहे ईश्वरचरणी हीच प्रार्थना
पूर्ण होवो चराचराची मनोकामना

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

धन्यवाद