आकान्त ---- शहरातल्या झाडाचा

Submitted by भानुमती on 29 September, 2012 - 07:04

आपल्या महाराश्ट्रातल्या एका शहरातला एक प्रचन्ड मॉल. ४-५ मजली . बाहेर पडताना त्याच्या आवारातल्या जुन्या , मोठ्या व्रु़क्षाकदे लक्ष गेल. दोन हातान्च्या कवेत मावणार नाही असा बुन्धा, तिसर्या मजल्याला भिडणारी उन्ची , सळसळती पालवी . मन प्रसन्न झाल.
पण मग दिसला त्याच्या भोवतीचा पार. कॉन्क्रीटचा . आणि मॉलच सम्पूर्ण आवारही असच कॉन्क्रीटने आच्छादलेल .अगदी पार्किन्ग पासुन ते फाटकापर्यन्त. पुढे सिमेन्टचा फूटपाथ आणि सिमेन्ट्चाच रस्ता.
सगळ कस स्वच्छ, पॉश . मातीचा कण शोधू जाल तरी मिळणार नाही .
आणि मित्रहो , अचानक मला ऐकू आली त्या झाडान्च्या मूळान्ची हाक. ' आम्हाला पाणी हवय, आम्हाला हवा पाहिजे' . वरून बरसणारा पाऊस सिमेन्टवरून वाहून जात असताना, भोवतालची हवा माती पर्यन्त पोचू शकत नसताना ते झाड करणार तरी काय ! केवळ मूक आकान्त !!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users