मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:
हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः
येणार्या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.
"दिवाळी संवाद"चे सर्व हक्क मायबोलीकडे रहातील.
याचा अर्थः
* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)
यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.
Copyright of the work submitted to maayboli remains with the respective author or artist. By submitting your work, you are giving an unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or wherever maayboli.inc wants to use it in any other medium.
"Diwali Sanwad" is a copyright of maayboli.
What it means:
* The copyright and ownership remains with the author/artist and they are free to use it in any way that they desire; such as sell or publish their work etc.
* However, by submitting their work, the author/artist has given the right to maayboli to publish on Maayboli web site or through any other media such as PDF, CD etc. in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from it's web site or any other media that has been used, though the author may want it done in future. (perpetual)
* Even though an author sells his/her copyright to a new owner, the new owner cannot ask maayboli to remove the work from maayboli web site. (irrevocable)
If you have any further questions related to the copyright issues, please e-mail the Sampadak Mandal. Thank you.
मात्र जेंव्हा काही दिवसांनंतर
मात्र जेंव्हा काही दिवसांनंतर (वर्षांनंतर) तुम्ही तुमचे मायबोलीवरचे पूर्वी लिहलेले लेखन काढून टाकता, तेंव्हा मायबोलीला/मायबोलीकरांना वाईट वाटतंच पण तो भावनेचा भाग असतो. त्याही पेक्षा तो लेखक्/कलाकार असं करून स्वतःच्या पायावर मोठा धोंडा पाडून घेतो. >>>
अजय, नेहमीप्रमाणेच मुद्देसुद उत्तराबद्दल आभार. पण वरचा मुद्धा कळला नाही. लेखकाचा त्याच्या कलाकृतीबाबतचा निर्णय वेगवेगळ्या पातळ्यांवर असतो. कलाकाराला स्वतःचा तोटा (तुझ्या वरच्य मुद्द्यनुसार) करायचा असल्यास तो निर्णय त्याचा असतो. त्याच्या करता माय्बोलीने त्याच्यावतीने निर्णय निर्णय का घ्यावा?
आजचे माय्बोलीचे प्रशासन लेखकाला जमेस धरून आहे म्हणुन उद्याचेही असेल का? अशा वेळेस टाइम्ड परवाना का नसावा? जर प्रशासन बदलले वा कलाकृतीचा गैरवापर (कलाकाराच्या ड्रुष्टिने) होत असेल तर तो वापर थांबवण्यासाठी तो/ती काय करू शकतील?
पुर्वी टाकलेले लेखन काढुन टाकले तर माय्बोलीचे काय नुकसान होते ? जर प्रष्ण फक्त रिसोर्सचा असेल तर कंटेंट काढुन टाकायला फी आकारावी त्याकरता अमर्याद परवान्याची गरज काय आहे हे सांगशील का?
तसेही जर जालाचे स्वरूप बदलत आहे तर दिवळी अंक जपुन ठेवायचा आट्टाहास का? त्याला आपण काल-सापेक्ष कले सारखा (टाईम बेस्ड आर्ट) ट्रीट करू शकतो. तो अंक फक्त काही काळापुरताच ठेवायचा व नंतर विसर्जीत करायचा.... रिसोर्सेस वाचतील ... कदाचित ही नवी संकलपना रुजायला मदतही होईल...
ईथे मला प्रचंद कष्टाने रांगोळीची क्लिष्ट मंडल काढण्यासाठी तासतास घालवणारे बौद्ध सन्यासी आठवतात.... ते ही मण्डल काढतात आणी मग ती विस्कटुन टाकतात ...
मला वाटतय, नॉर्मल माबोवर
मला वाटतय, नॉर्मल माबोवर टाकलेलं तुम्ही काढून शकताच, प्रश्न फक्त दिवाळी अंकाचा आहे.
तुम्ही दिवाळी अंकात प्रकाशित केलेलं लेखन इतर ठिकाणी वापरू शकताच, फक्त माबोवरून काढून टाकू शकत नाही - हा मुद्दा आहे ना, माबोनं अंकावर घेतलेले कष्ट बघता आणि हा उपक्रम संकेतस्थळ चालवत असल्यानं तसं ठरवलं तर त्यात काही चूक वाटत नाही.
फक्त - इतर ठिकाणी वापरायचा असेल तर लेखकाची पूर्व परवानगी असायला हवी असं मला वाटतं
@पेशवा, असा निर्णय घेणारे खूप
@पेशवा,
असा निर्णय घेणारे खूप थोडे असतात आणि त्यांच्यासाठी सगळ्यांचेच नियम बदलणे योग्य होणार नाही.
प्रश्न रिसोर्सेचाच आहे. आणि भविष्यात असे लेखन काढून टाकायचे असेल आणि त्याची फी द्यायची तयारी असेल तेंव्हा ते काढून टाकता येणे कदाचित शक्य आहे. पण त्यामागची तांत्रिक अडचण लक्षात यावी. एका मोठ्या बॅककप ढिगार्यातून सुई काढण्यातला हा प्रकार आहे. ही फी अवाच्या सवा वाटण्याची शक्यता आहे आणि दुर्देवाने त्यावेळेस अचानक अरे हे आम्हाला लुटताहेत असे वाटू शकेल. आणि दुसरे असे की फी द्यायची तयारी असली तरी मायबोली प्रशासनाकडे नेमका तेंव्हा वेळ असेलच असे नाही.
सगळ्यांच्याच सोयीसाठी हे नियम आधीच समोर मांडले आहेत. शक्य तितके मालकीहक्क आणि त्याच्या कायदेशीर खाचाखोचा यात नंतर सगळ्यांचे श्रम खर्ची पडण्यापेक्षा, नविन अडचणी होण्यापेक्षा हे आपल्याला पटतं आहे का नाही याचा निर्णय त्या त्या लेखकाने/कलाकाराने घ्यायचा आहे.
>आजचे मायबोलीचे प्रशासन लेखकाला जमेस धरून आहे म्हणुन उद्याचेही असेल का?
म्हणूनच शक्य तितके अगोदरच स्पष्ट केले आहे. वर म्हटल्याप्रमाणे इतर ठिकाणी कुठलेच हक्क लेखकाला कलाकाराला मिळत नाहीत. आणि तरी काही लोकांना ते पटतं आणि ते तिथे लिहतात.
तसं आम्ही करत नाही आहोत. पण आताच लेखकालाच सगळे हक्क दिले तरी परवाना टाईम्ड का नाही असा प्रश्न आहे. तो टाईम्ड केला तर त्याची कालमर्यादा इतकीच का असा प्रश्न येईल. त्यातून अजून नवीन प्रश्न येतील. यापेक्षा अजुन सवलती देत राहिलो तर त्याचे तांत्रिक/कायदेशीर दृष्ट्या पालन करण्यातले ओव्हरहेड मायबोलीला परवडणार नाही.
थोडक्यात हे मायबोलीचे नियम आहेत काहिना पटतील काहीना नाही.
जाता जाता: आपण बौध्द सन्यास्यांचे उदाहरण वापरले तर मराठी टिकायला उलट तोटाच होईल आणि चांगलं मराठी लेखन नष्ट होईल. पूर्वी प्रकाशित झालेल्या कितितरी चांगल्या कलाकृती/चांगलं लेखन काळाच्या ओघात नष्ट झालं याची हळहळ वाटते. तंत्रज्ञानामुळे जर आता लेखन कायमचं टिकवता येत असेल तर का टिकवू नये? आणि ते टिकवण्याचा खर्चही परस्पर भरून निघत असेल तर का त्याचा उपयोग करू नये? त्यातून कदाचित मायबोलीला फायदा होईल. पण असा जर फायदा होणार असेल तर आणखी चार मराठी संकेतस्थळांना त्यातून प्रेरणा मिळाली त्यातून जास्तित जास्त मराठी लेखन लिहलं गेलं आणि लोकांपर्यंत पोहोचलं तर त्यात वाईट काय आहे? यात पैसे मिळवता आले तर सगळ्यांचंच त्यात भलं आहे.
नानबाशी मी पूर्णत: सहमत आहे.
नानबाशी मी पूर्णत: सहमत आहे. मात्र त्यात एकच तांत्रिक अडचण मला दिसते आहे. जर एखादी व्यक्ती (लेखक / लेखिका) 'गायब' झाली तर परवानगी कशी घेणार?
वर म्हटल्याप्रमाणे इतर ठिकाणी
वर म्हटल्याप्रमाणे इतर ठिकाणी कुठलेच हक्क लेखकाला कलाकाराला मिळत नाहीत.<<<
कुठल्याही नियतकालिकातील लिखाणाचा हक्क लेखकाचाच असतो. लेखकाला मानधन मिळते ते त्या त्या नियतकालिकाच्या त्या त्या अंकात ते ते लिखाण छापले जाण्याबद्दल असते ना? त्या लिखाणाच्या वापराचे सर्व हक्क लेखकाचेच असतात.
पेशवा, कलाकृतीचा गैरवापर
पेशवा,
कलाकृतीचा गैरवापर रोखण्यासाठी लेखक, कलाकार यांना कायद्याने 'मोरल राइट्स' दिले आहेत. त्यांचा वापर करून ते आपल्या कलाकृतीचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेऊ शकतात.
कायद्याने 'मोरल राइट्स' दिले
कायद्याने 'मोरल राइट्स' दिले आहेत <<
मोरल राइटस? याबद्दल जरा विस्ताराने प्लीज.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Moral_rights_%28copyright_law%29
http://en.wikipedia.org/wiki/Authors%27_rights
मी दिवाळी अंकासाठी एक विनोदी
मी दिवाळी अंकासाठी एक विनोदी लेख तुम्ही सांगितलेल्या दुव्यावर पाठविला आहे. पण त्याची निवड झाली की नाही हे आम्हाला कसे कळणार? तसा ई-मेल तुम्ही पाठवता किंवा कसे?
अजय प्रभाकर, तुम्ही दिवाळी
अजय प्रभाकर, तुम्ही दिवाळी अंकासाठी आज पाठवलेले साहित्य मिळाले. तशी पोचपावती देखील तुम्हाला मेल मधून मिळाली असेल.
संपादक मंडळाकडे ज्या क्रमाने साहित्य आले आहे, त्या क्रमाने ते वाचून, निवड करण्याचे काम चालू आहे.
दिवाळी अंकासाठी तुम्ही पाठवलेले साहित्य स्वीकारले आहे किंवा नाही, हे कळवणारी मेल तुम्हाला लवकरच येईल.
अंकासाठी साहित्य पाठवल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद.
Pages