धार्मीक स्टिरीओटायपींगचा भस्मासुर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
2’

(१) एका अमेरीकन माणसाने मुहम्मदवर एक चित्रपट काढला. त्यात मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय हीन प्रकारे मुहम्मदचे चित्र उभे केले गेले.
(२) गुगलने यु ट्युब वरील त्या चित्रपटाचे भाग काढुन टाकण्यास नकार दिला.

(३) त्या चित्रपटामुळे अनेक मुस्लीम देशांमधे निदर्शने झाली. काश्मीरमधे पण. या निदर्शनांमधुन, खासकरुन त्यात जेंव्हा जाळपोळादि प्रकार होतात, तेंव्हा ती नेमकी कुणाविरुद्ध असतात आणि ते नुकसान त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
(४) लिबिया मधे तर अमेरीकन दुतावासावर हल्ला केला गेला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जिवे मारण्यात आले. अमेरीका अनेक दृष्टीने सेक्युलर देश आहे. दुतावासातील कर्मचारी काळे की गोरे, ज्यु की हिंदु, आस्तीक की नास्तीक हे न तपासता ती कत्तल झाली.
(५) त्या कत्तलीमागे पोळीभाजु अतिरेकी होते असं कळलं (हे असं नेहमीच असतं). आम जनतेनी एकत्र येऊन त्यांना हुसकावून लावले ही एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट झाली.

(६) त्या दरम्यान एका फ्रेंच वारंवारीकानं मुहम्मदचं एक कार्टुन प्रकाशीत केलं.
(७) कोर्ट त्याचं करायचं ते करेल, पण भाष्य-स्वातंत्र्याचा हक्क अबाधीत राहील असं वक्तव्य फ्रेंच पंतप्रधानांनी केलं.

(८) UN मधे ब्लासफेमी गुन्हा आहे असं म्हणु पाहणारा कायदा आणायचा प्रस्ताव बारगळला होता. तो पुन्हा डोकं वर काढतोय. (ते ही तुर्कस्थानातील पंतप्रधानांच्या पुढाकारानं - एकेकाळी मुस्लीम असुनही सेक्युलर म्हणुन हा देश प्रसिद्ध होता).
(९) पाकीस्तानातील एका नेत्यानी त्या फिल्म बनवणाऱ्या अमेरीकनाचा कोणी खून केल्यास भरपूर बक्षीस जाहीर केलं आहे (तो न पकडल्या जाता पाकीस्तानान जाऊन ते बक्षीस कसं मिळवणार हा प्रश्न निराळा).

या सर्वात आपण कुठे बसतो हा प्रश्न महत्वाचा आहे.

(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
(अ) असावं, (ब) नसावं, (क) सोयीस्कर रित्या असावं किंवा नसावं

(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
(अ) हो, ते तसेच असतात, (ब) नाही, (क) सोयीप्रमाणे करावं, (ड) मी निधर्मी आहे

(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?
(अ) हो, (ब) नाही बुवा, (क) ते इतर कोण आहेत यावरून ठरवु

(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?
(अ) हो, तसंच करतो, (ब) अर्थातच नाही, (क) सोयीप्रमाणे ठरवु, (ड) मी निधर्मी आहे

प्रकार: 
शब्दखुणा: 

माणसाचा धर्म ही खाजगी बाब आहे >>>>>>

आपण ज्याला धर्म म्हणता ती खाजगी बाब असुच शकत नाहि. "स्वधर्म" (गीतेत सांगीतलेला) वेगळा. हिंदु, मुसलमान धर्म वेगळा. जेव्हा एखाद धर्म सामाजिक आदेश देतो, (उदा. पतीच्या निधनानंतर सती जाणे , काफराला मारल्यावर जन्नत मिळणे) तेव्हा तो खाजगी कसा राहिल ?

मला भाषा स्वातंत्र्य मान्य आहे जोवर त्याचा उद्देश चाम्गला आहे.
सरस्वतीचे विवस्त्र चित्र शिक्षणक्षेत्रातला भ्रष्ट्राचार दाखविण्यासाठी काढले असेल तर मला ते तितकंआक्षेपार्ह वाटत नाही जितकं एक सुभाषितकार तिला विद्येची देवता म्हणताना मोठ्या स्तनाची म्ह्णूनगौरवतो तेव्हा वाटतं.
महंमदाचं चित्र एकवेळ स्ट्राँग मुस्लिमाने काढू नये, इतरानी चांगल्या संदर्भात काढल्यास काय प्रॉब्लेम असावा, आणि का?

माझी उत्तरे:
अ, ब, अ, ड.

दुसर्‍याचे उत्तर ब कारण कसल्याही प्रकारे (धर्म, भाषा, वर्ण, वंश इ) गट केले तरी त्यातले सगळे लोक सारखेच असे मला म्हणवत नाही. चौथ्याचे उत्तर ड कारण मी नास्तिक आहे. मला सरस्वतीची, मदर मेरीची, आणखी कोणकोणत्या तथाकथित श्रद्धास्थानांची नग्न चित्रे, किंवा इतर कोणत्या प्रकारे वर्णन केले तर वैताग/ राग येत नाही. त्या त्या व्यक्तीला ते ते श्रद्धास्थान कसे समजले / किंवा नाही याचे ते प्रतीक आहे एव्हढेच वाटते.

मृदुला, नास्तीक म्हणुन श्रद्धास्थानांना (इतरांच्या) नग्न काढल्यास राग येत नाही. पण मग नास्तीकांची श्रद्धास्थाने कोणती? देव नाही याचे कागदावर काढलेले प्रुफ? त्या प्रुफचे चित्र काढले आणि त्यात नग्नता भरली तर? (नग्नता म्हणजे तरी काय?) की ते प्रुफ abstract असल्याने त्यात नग्नता, जी की मानवी attribute आहे, आणता येत नाही? पण देव सुद्धा तर abstract असतात. की ते abstract असुनाही त्यांना मानवासारखे दाखवले गेले म्हणुन राग येतो (ज्यांना येतो त्यांना)? त्या प्रुफला येईल राग? देवाला आला असता का?

फारएण्डला राग येतो तो त्याच्यावरील संस्कारांमुळे. संस्कार काय तर अशा गोष्टींबद्दल राग यावा हे. एखाद्या पवीत्र गोष्टीला नावे ठेवल्याने पावीत्र्य भंग होते. (हो?) गाय मारल्याने एखाद्या देवाची महती कमी होते, तर डुक्कर मारल्यानी दुसऱ्याची. दोन्ही देवांना खरंतर दोन्ही प्राणी सारखेच प्रीय असावेत (ज्याप्रमाणे सगळे लोक प्रीय असावेत).

लिंबुचा मुद्दा महत्वाचा आहे. हे (केवळ) धर्मांबद्दल नाही. हे त्या सर्व कल्पनांबद्दल आहे ज्यात एकमत नाही. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर, दलीत आणि अ-दलीत, शिया आणि सुन्नी, काळे आणि गोरे. धर्मांच्या बाबतीत हे जास्त प्रकर्शानी जाणवतं कारण अनेकदा भौगोलीक सीमा आणि धर्मांच्या सीमा समांतर असतात. धर्मप्रेम आणि देशप्रेम एकत्र आले की काही विचारायलाच नको.

नग्नता हा मुख्य आक्षेप नसावा. नाहीतर लोक नग्न Nymphs असलेल्या मंदिरांमधे न जाते. आयटम गाणी असलेले सिनेमे चवीने न पाहते. सरस्वतीचं चित्र नग्न न काढता एक सरदारजी (रॅंडम उदाहरण आहे) सवस्त्र सरस्वतीला रेड्यावर बसवुन ढकलतो आहे असं असतं तर तितकाच गदारोळ झाला असता? त्या ऐवजी यमाला रेड्यावर बसवलं असतं तर? किंवा गणपतीला उंदरावर? पण मी विसरलोच - ते तर त्याचे वाहनच आहे. ऋग्वेदातच लिहीले आहे (किंवा नंतरच्या २-४ हजार वर्षात अजुन कुठे लिहीले असेल).

प्रश्न हा आहे की आपल्या मनात जाणता-अजाणता ज्या प्रतिमा निर्माण होतात त्या इतक्या महत्वाच्या असतात का की कोणी त्यास धक्का लावल्यास त्या कडे दुर्लक्ष करु न शकता मारायला धावणार? त्या प्रतिमा खऱ्या आहेत का (म्हणजे त्यांना प्रत्यक्ष रित्या काही बाधा पोचते का?)? की त्या ज्यांच्या proxy आहेत त्या गोष्टी अबाधीतच आहेत? भाष्य-स्वातंत्र्य एकदा काढून घ्यायचं ठरवलं की मग कुणालाही कशाहीकरता अंदर करता येईल, या जगातुन घालवता येईल.

दुर्लक्ष न करता घटनेबर हुकुम कारवाई करण्याचा मार्ग योग्यच आहे. भाष्य-स्वातंत्र्य असावे, दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य असावे, कायदा हाती न घेता कारवाई करण्याचे स्वातंत्र्य असावे. घटनेत सुद्धा अघटीत गोष्टी असु शकतात. तसे होऊ देणे आंबेडकरांनी कसोशीने टाळले. घटनेत असलेल्या स्वातंत्र्यानुसार पिल्लईंनी काढलेल्या आंबेडकरांच्याच कार्टुनवर मात्र गदा आली. ते कार्टुन प्रकाशीत झाले तेंव्हा आंबेडकरांनी पाहिले असणार. त्याविरुद्ध ते काही बोलल्याचे ऐकीवात नाही. आणिबाणिच्या काळात घटनाही बदलवली होती. त्यानंतर तसे पुन्हा होऊ नये म्हणुन थोड्याफार तरतुदी करण्यात आल्या आहेत.

इतरांचेही मुद्दे विचार करण्यासारखे आहे. थोडक्यात काय तर आपण या बहुतांश बाबींवर सखोल विचार, चिरफाड करतच नाही. तसं केल्याशिवाय आपल्याला नेमकं काय वाटतं हे समजु शकत नाही, तसं का वाटतं ही तर खूपच दूरची गोष्ट झाली. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याची तमा बाळगली नाही तर आपण आपले तंत्र, मंत्र कसे चालवणार? केवळ संख्येच्या बळावर?

@अस्चिग-
विवेचन बरेचसे पटले, आवडले.

जरासे अवांतर-
मृदुला, नास्तीक म्हणुन श्रद्धास्थानांना (इतरांच्या) नग्न काढल्यास राग येत नाही. पण मग नास्तीकांची श्रद्धास्थाने कोणती?

प्रश्न मृदुला यांना आहे. पण 'नास्तिकांची श्रद्धास्थाने' हा गमतीदार विरोधाभास आहे. याच धाग्यावर आधी कोणीतरी 'नास्तिकधर्म' असाही शब्द वापरला आहे. हे दोन्हीही शब्दप्रयोग चुकीचे आहेत असे माझे मत आहे.

@अस्चिग + १

देवाची , अल्लाची नग्न चित्रे काढली , सिनेमा काढला म्हणुन पेटणारे आणी पेटवणारे, कत्तल करणारे,दंगे करणारे, युद्ध करणारे जिवंत माणसांना मारतात यापेक्षा मोठा दुर्देवी विरोधाभास काय असणार!

winnicott नावाच्या मानसशास्त्राच्या संशोधकाने एक उत्क्रुष्ट थेअरी मांडली आहे.
लहान मुले एखाद्या गाडिशी खेळतात, किंवा बाहुलीशी खेळतात, किंवा एखादे टेडि बेअर, किंवा एखादे आवडणारे खेळणे. प्रत्येक लहान मुलाचे एखादे आवडणारे खेळणे असतेच ज्याच्याशी त्याची रिलेशनशिप निर्माण झालेली असते. मोठ्या माणसाने ते पाहिले तर त्याला तो पोरखेळ वाटतो. जिथे जाइल तेथे त्या मुलाला ते खेळणे न्यायचे असते, झोपताना बरोबर ठेवायचे असते. आणी तुम्हि ते खेळणे बदलु शकत नाहि, ते कितीहि खराब झाले तरी त्याचा त्यात जीव असतोच. आता ते खेळणे काहि खोटे नसते, ते तर असतेच पण तरीहि ते त्या पद्धतीन खरे नसते ज्यापद्धतीने ते लहान मुल त्याला समजत असते.

जवळजवळ सर्व लहान मुले मोठी झाली तरी लहानच रहातात . फक्त टेडि बेअर बदललेले असते!

अस्चिग मस्त लिहिलयस पण एकांगी वाटले. स्वातंत्र्य आले तर त्याबरोबर जबाबदारी आलीच ह्या तितक्याच मह्त्वाच्या मुद्द्याबद्दल लिहिले नाहीस. स्वातंत्र्य नि जबाबदारी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, फक्त एकीचाच विचार करून चालणार नाही.

>>> प्रश्न हा आहे की आपल्या मनात जाणता-अजाणता ज्या प्रतिमा निर्माण होतात त्या इतक्या महत्वाच्या असतात का की कोणी त्यास धक्का लावल्यास त्या कडे दुर्लक्ष करु न शकता मारायला धावणार? त्या प्रतिमा खऱ्या आहेत का (म्हणजे त्यांना प्रत्यक्ष रित्या काही बाधा पोचते का?)? की त्या ज्यांच्या proxy आहेत त्या गोष्टी अबाधीतच आहेत? भाष्य-स्वातंत्र्य एकदा काढून घ्यायचं ठरवलं की मग कुणालाही कशाहीकरता अंदर करता येईल, या जगातुन घालवता येईल. <<<<<
>>> आपल्या मनात जाणता-अजाणता ज्या प्रतिमा निर्माण होतात त्या इतक्या महत्वाच्या असतात का <<<<<
मूळात अशा प्रतिमा निर्माण होऊ द्यावातच का? जर होऊ द्यायच्या नसतील तर वर्तमानकालिक परिस्थितीप्रमाणे आपणास "कम्युनिझम" स्विकारावा लागेल Wink
मात्र, मनुष्याच्या जन्मापासुनच्या वाढीमधे त्याच्या सर्वान्गिण विकासात या प्रतिमान्चे महत्व अधोरेखित असते, त्या आवश्यकच ठरतात. तरीही, ज्या त्या भौगोलिक/सामाजिक परिस्थितीप्रमाणे मानवाच्या प्रत्येक पन्थउपपन्थात/धर्मात, कोणत्या प्रतिमा महत्वपूर्ण आदराने अनुकरणीय मानायच्या व कोणत्या त्याज्य मानायच्या हे बदलत जाताना दिसते. व खरतर तिथेच "धर्मान्चा" संबंध येतो.

बाकीचे धर्म सोडून देतो, केवळ हिन्दू धर्मातच, एकीकडे ज्ञानार्जन/कुमारावस्था, गृहस्थावस्था सम्पवल्यावर सर्वसंगपरित्याग करुन मोक्ष प्राप्तीकडे वळावे असे आहे, तर दुसरीकडे ऋणं कृत्वा घृतं पिबेत म्हणून वेळेस कर्जही काढा (अन ते बुडवा देखिल) पण तुप प्या, असा संदेश आहे, व चार्वाकाचा तो संदेश डोक्यावर घेऊन नाचणारे व नाचता नाचता हिन्दूधर्मातील उच्चवर्णियान्ना शिव्या घालणारे देखिल आहेत.

मग मूळ मुद्दा असा रहातोच, की कोण काय आदर्शवत प्रतिमा मानणार हे जो तो ज्याच्या त्याच्या "अक्कलेप्रमाणेच" (धर्म वा जातीप्रमाणे नव्हे) ठरविणार. अगदी कृष्णाने देखिल अर्जुनाला गीतेच्या अठराव्या अध्यायातील ६३ व्या श्लोकात हेच सान्गितले की बाबारे, मी जरी तुला अतिशय महत्वपूर्ण व गुह्यतम असे ज्ञान दिले असले, तरी त्याप्रमाणे वागायचे की नाही यावर तुझा तुलाच विचार करायचा आहे व निर्णय घ्यायचा आहे. अर्थात, अर्जुनास देखिल जे स्वातन्त्र्य आहे विचार व त्याप्रमाणे कृति करण्याचे, तर जगातील तमाम सामान्य(?) जनांस ते असणार नाही काय?

अन जर असेल्/आहे, तर त्यान्च्या त्यान्च्या मनात तयार होणार्‍या / झालेल्या / भरविलेल्या आदर्शवत प्रतिमांबद्दल कोणी कुचाळकी करीत असेल, तर त्याच्या मुस्काटात भडकविण्याचा क्षात्र धर्म देखिल मानवाच्या अर्थात त्यान्च्या रक्तगुणात मुळचाच आहे.

रहाता राहिला प्रश्न की केलेल्या कुचाळकीमधे तथ्यान्श किती, व सत्यता किती व ती सत्यता मानावी की नाही याचा. इथेही पुन्हा तेच्च की हा विचार करावाच वा सोईस्कररित्या नाही करावा याचे स्वातन्त्र्य त्या त्या जनसमुहास आहेच. वापरायचे की नाही हे जो तो ठरवितोच.

मग प्रश्न असा उरतो की असे आहे तर मग मी इथे हे सर्व इतके लिहून माझा वेळ का वाया घालवतोय? जे जे होईल ते ते पहात रहावे हेच उत्तम नाही का? Wink

रहाता राहिला प्रश्न की केलेल्या कुचाळकीमधे तथ्यान्श किती, व सत्यता किती व ती सत्यता मानावी की नाही याचा. इथेही पुन्हा तेच्च की हा विचार करावाच वा सोईस्कररित्या नाही करावा याचे स्वातन्त्र्य त्या त्या जनसमुहास आहेच. वापरायचे की नाही हे जो तो ठरवितोच. >>> पण येथेच तर हा प्रश्न मुळात निर्माण होतो. अपमान झालाय का नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण त्यावर हिंसक प्रतिक्रिया देण्याचे नाही - किमान जेथे कायद्याचा अंमल आहे तेथे तरी.

आता कल्पना कर की तू न्यायाधीश आहेस व तुझ्यापुढे अशा कुचाळकी/अपमानाच्या १०-१५ केसेस आहेत - वेगवेगळ्या समाजाच्या, धर्माच्या. आणि यातील एकही घटना तू प्रत्यक्षात पाहिलेली नाहीस. यातील :
१. काही घटना खर्‍या आहेत म्हणजे दुसर्‍या समाजाच्या देवतांचा/दैवतांचा अपमान करण्यासाठीच घडवलेल्या आहेत.
२. काही अनवधानाने घडलेल्या आहेत.
३. एका मधे इतिहास संशोधनात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा उल्लेख असा आला आहे की समाजातील काही लोकांना तो आवडणार नाही.
४. एका मधे अपमानकारक उल्लेख्/चित्र आहे पण त्याबद्दल भलत्याच लोकांना जबाबदार धरले जात आहे.
५. काहींमधे एकाच समाजाच्या काही लोकांना अपमानकारक उल्लेख वाटलाय तर काहींना त्या उल्लेखाचा उद्देश अपमानकारक मुळातच नाही असे वाटले आहे (म्हणजे अपमान चालेल असे नाही पण मुळात अपमानच झालेला नाही)
६. काही घटनांत अपमानामुळे 'समाजाला राग आल्याचे' चित्र निर्माण केले जात आहे व भलतेच राजकारणी लोक त्यात आपला फायदा करून घेत आहेत.
७. काहींमधे जेथे अपमानकारक लेख्/चित्र छापले गेले आहे व जेथे त्याची प्रतिक्रिया उमटली आहे या दोन ठिकाणांचा व तेथील लोकांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

या सर्व घटनांमधले त्याविरूद्ध आवाज उठवणारे लोक तू वरती लिहीलेली वाक्येच वापरत आहेत. त्यातील कोठे खरोखर असा अपमान झालेला आहे की मूळ कलाकृती/लेखावर बंदी घालावी हे कसे ठरवणार?

आणि गेल्या काही वर्षांतील घटना पाहता असा अपमान झाल्याचा समज होऊन त्यातून निर्माण झालेल्या, व बर्‍याच वेळेस त्याचे निमित्त करून मुद्दाम संघटित रीत्या दिल्या गेलेल्या हिंसक प्रतिक्रियांमधून समाजाचे - आणि त्यातही त्या अपमानाला किंचितही जबाबदार नसलेल्या सामान्य लोकांचे- जेवढे नुकसान झालेले आहे तेवढे घटनात्मकरीत्या प्रतिक्रिया देऊन किंवा सरळ दुर्लक्ष करून कधीच होणार नाही.

मुळात हे सर्व ''सापेक्ष'' श्रेणीत येतं असं नाही का वाटत? भाष्य-स्वातंत्र्य ''देणं'' आणि भाष्य स्वातंत्र्य ''असणं'' यात एक सूक्ष्म फरक आहे. जिथे ते ''असल्याचा'' आव आणला जातो परंतु प्रत्यक्षात ते ''दिलेलं'' असतं तिथे ते वेळप्रसंगी काढूनही घेता येतं किंवा दाबलंही जाऊ शकतं. भाष्य-स्वातंत्र्य जर ''असेल'' तर ते माझ्या मते अमर्याद श्रेणीतच येणार. कोणत्याही प्रकारचे, कशाही तर्‍हेचे भाष्य! ते भाष्य कोणासाठी ''कृती''च्या रूपातही असू शकते. मग त्याखाली केलेली कोणतीही कृती ''भाष्य-स्वातंत्र्य'' म्हणूनच पाहावी लागेल. (तेही पाहाण्याच्या नजरेवर अवलंबून!) मग बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य असे काहीच असणार नाही! त्यात उद्या कोणी राष्ट्रध्वज जाळला किंवा माणसांची हत्या केली किंवा मंदिर-मशीदी-चर्च फोडले - तोडले तरी ते त्या त्या व्यक्तींचे ''भाष्य''च असेल. मग ते भाष्य हिंसक / अहिंसक कोणत्याही पद्धतीचे असेल. एकदा स्वातंत्र्य म्हटल्यावर त्यात निर्बंध ग्राह्यच नाहीत! जर स्वातंत्र्य ''मर्यादित'' स्वरूपातील असेल तर मग ते स्वातंत्र्य कसे काय?

आपण स्वतःला कोणत्या देशाचे नागरिक मानतो? केवळ जन्माने व कागदोपत्री आपण अमक्या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करता येत असेल परंतु मनाने आपल्याला त्या देशाचे नागरिकत्व मान्य नसेल तर मग कोणत्या ''नियमां''नी वावरायचे? स्वतःच्या नियमांनी की त्या देशाच्या नागरिकत्वाच्या नियमांनी? तिथे व्यक्ती-स्वातंत्र्य, भाष्य-स्वातंत्र्य मानायचे की त्या देशाच्या नियमांनुसार वागणे? बरं, प्रत्येकाची हे स्वातंत्र्य अंमलात आणायची तर्‍हा वेगवेगळी असणार हे जर गृहित धरले तर जगातील कोणत्याच कृतीला कोणीच आक्षेप घ्यायला नको किंवा ती कृती अमानुष मानायला नको. तो अधिकार कोणी कोणाला दिला? इतरांची कृती अमानुष ठरवणारेही मग आपण कोण? त्या कृतींना तराजूत तोलणारे आपण कोण? जर स्वातंत्र्यच अभिप्रेत आहे तर मग ते कोणतेही नियम, निर्बंध, मर्यादांच्या चौकटीत कशाला बसवायचे? जसे मला माझा निषेध शब्दांमध्ये / चित्रांद्वारे / प्रतीकांद्वारे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असेल तर कोणाला तो निषेध कृतीत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असेल. ती कृती रूढ कल्पनांनुसार ''अमानुष'' किंवा ''हिंसक'' असली तरीसुद्धा!

@अरुंधती कुलकर्णी-

"भाष्य-स्वातंत्र्य जर ''असेल'' तर ते माझ्या मते अमर्याद श्रेणीतच येणार. कोणत्याही प्रकारचे, कशाही तर्‍हेचे भाष्य! ते भाष्य कोणासाठी ''कृती''च्या रूपातही असू शकते. मग त्याखाली केलेली कोणतीही कृती ''भाष्य-स्वातंत्र्य'' म्हणूनच पाहावी लागेल."
"जर स्वातंत्र्यच अभिप्रेत आहे तर मग ते कोणतेही नियम, निर्बंध, मर्यादांच्या चौकटीत कशाला बसवायचे? जसे मला माझा निषेध शब्दांमध्ये / चित्रांद्वारे / प्रतीकांद्वारे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असेल तर कोणाला तो निषेध कृतीत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असेल."

प्रचंड असहमत. 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेवर आपला विश्वास आहे काय?
फक्त एकदा स्वतःला 'भाष्य करणारे' न समजता विक्टिमच्या जागी कल्पून पहा आणि वरील विधानांचा पुन्हा विचार करा.

केवळ जन्माने व कागदोपत्री आपण अमक्या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करता येत असेल परंतु मनाने आपल्याला त्या देशाचे नागरिकत्व मान्य नसेल तर मग कोणत्या ''नियमां''नी वावरायचे? स्वतःच्या नियमांनी की त्या देशाच्या नागरिकत्वाच्या नियमांनी?

हा काही एवढा कठीण प्रश्न नाही. 'मनाने' नागरिकत्व मान्य नसले तरी काही फरक पडत नाही. आपण जिथे राहतो तिथले नियम पाळावेच लागतात.

"मनाने नागरिकत्व मान्य नसणे."

हास्यास्पद वाक्य.

धर्म'सत्ता' कायद्यापेक्षा मोठी आहे असे मानणार्‍या सर्वच धर्मांतील अतिरेक्यांमुळे हे असे स्टिरिओटाईप्स तयार होतात..

<<धर्म'सत्ता' कायद्यापेक्षा मोठी आहे असे मानणार्‍या सर्वच धर्मांतील अतिरेक्यांमुळे हे असे स्टिरिओटाईप्स तयार होतात..>>

हुश्श!! Wink

मनाने नागरिकत्व मान्य नसेल तर ती व्यक्ती स्वतःच्या भाष्य-स्वातंत्र्याच्या कल्पनेनुसार व त्या देशाचे कायदे-कानून यांचा ''मान'' न राखता किंवा अवलंबन न करता त्या देशातील कायद्यात न बसणारे भाष्य करेल. (अर्थातच त्याचे परिणामही त्या व्यक्तीला भोगावे लागतील!) त्या भाष्याबद्दल त्या देशाच्या बाहेर इतर देशांमध्ये आक्षेप घेतलाही जाणार नाही, परंतु त्या देशातील घटना, कायदा यांच्या कक्षेत ते भाष्य बसत नसेल तर? म्हणजे पुन्हा सापेक्षता आलीच! जी गोष्ट एका देशात कायदेबाह्य आहे ती इतर देशांत कायदेसंमत असू शकते. त्या त्या देशाच्या कायद्यानुसार भाष्य-स्वातंत्र्याच्या व व्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षा, मर्यादा, व्याख्या बदलतात. अद्याप तरी तिथे कोणता आंतरराष्ट्रीय कायदा आलेला नाही! जे अमक्या देशात घटनाबाह्य किंवा कायदेबाह्य वर्तन किंवा भाष्य समजले जाईल त्या वर्तनाने अन्य देशांत कोणाला कदाचित काहीही फरक पडणार नाही. मग या सापेक्ष गोष्टींना समान तराजूत कसे तोलता येणार? मी अमक्या देशात राहते म्हणून मला त्या देशातील कायद्यांच्या किंवा स्वातंत्र्याच्या फूटपट्टीने इतर देशांमधील कायदे, भाष्य स्वातंत्र्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्य मोजायचा अधिकार आहे का? जर मला माझ्या पद्धतीने त्यांबद्दल भाष्य करायचे स्वातंत्र्य आहे / असेल तर त्या देशातील व्यक्तींनाही त्या भाष्याला प्रत्युत्तर द्यायचे स्वातंत्र्य का नको? त्या प्रत्युत्तराची पद्धत मी कोण ठरविणार?

@अरुंधती-

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? कृपया एखादे उदाहरण देऊन समजवा.

मग या सापेक्ष गोष्टींना समान तराजूत कसे तोलता येणार? मी अमक्या देशात राहते म्हणून मला त्या देशातील कायद्यांच्या किंवा स्वातंत्र्याच्या फूटपट्टीने इतर देशांमधील कायदे, भाष्य स्वातंत्र्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्य मोजायचा अधिकार आहे का? जर मला माझ्या पद्धतीने त्यांबद्दल भाष्य करायचे स्वातंत्र्य आहे / असेल तर त्या देशातील व्यक्तींनाही त्या भाष्याला प्रत्युत्तर द्यायचे स्वातंत्र्य का नको? त्या प्रत्युत्तराची पद्धत मी कोण ठरविणार?

सापेक्ष गोष्टींना समान तराजूत तोलावे, असे इथे कोण म्हटले आहे? किंवा इतर देशांतल्या नागरिकांना अमुक एक प्रकारचे भाष्य-स्वातंत्र्य दिले जाऊ नये असाही कुणाचा आग्रह असल्याचे दिसले नाही. इतरांच्या "प्रत्युत्तराची पद्धत" आपण ठरवायचीच नाहीये. पण ती निदान त्या-त्या देशाच्या / प्रांताच्या / संस्कृतीच्या लिखित किंवा अलिखित कायदे / घटना किंवा संकेताशी सुसंगत असावी, असेच म्हणणे आहे. (निदान माझे.) याबद्दल तुम्हास काय वाटते?

सापेक्षता आहेच की ! ती नाकारतंय कोण?

काही देशांच्या घटना व कायद्यांमधील तरतुदी (व त्यानुसार येणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य) हे त्या त्या देशातील बहुसंख्य नागरिकांच्या धर्मातील नीतीनियमांवर, त्या धर्माने पवित्र मानलेल्या ग्रंथांवर बेतलेले आहेत. मग अशा ठिकाणी धर्मापासून कायदा वेगळा कसा काढणार? त्यांनी धर्मापासून कायदा वेगळा करावा हे सांगणारे आपण कोण? आणि जरी धर्मावर बेतलेला कायदा असला किंवा नसला तरी तो त्या देशाचा कायदा आहे व त्यानुसार तिथे भाष्य-स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती-स्वातंत्र्य अपेक्षित आहे. आणि त्यानुसार तेथील लोकांची किंवा सरकारची प्रतिक्रियाही येणार!

आणखी एक घट्ना http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16612058.cms

लोक दुसर्‍या धर्माचि कुरापत का काढतात हे समजत नाही. कुरापत काढायची आणि मग फट्के बसले की कोकलाय्चं

>>धर्म'सत्ता' कायद्यापेक्षा मोठी आहे असे मानणार्‍या सर्वच धर्मांतील अतिरेक्यांमुळे हे असे स्टिरिओटाईप्स तयार होतात..<<

कोणकोणत्या धर्मात "धर्म'सत्ता' कायद्यापेक्षा मोठी आहे असे मानणार्‍या धर्मांतील अतिरेक्यांमुळे" ते ते देशच धार्मिक नावावरच उभे आहेत [ त्यामुळे ओघानेच कायदेही धर्माधिष्टितच आहेत ] याचा शोध बोधप्रद व्हावा.
इझरेल हे ज्यु धर्माधिष्ठित राष्ट्र आहे असे म्हणतात. पण त्यांचा त्यांना नष्ट करण्याचा वसा घेणार्‍यांव्यतिरिक्त कोणाला त्रास होतो असे कधि ऐकलेले नाहि.

एकदा स्वातंत्र्य म्हटल्यावर त्यात निर्बंध ग्राह्यच नाहीत! जर स्वातंत्र्य ''मर्यादित'' स्वरूपातील असेल तर मग ते स्वातंत्र्य कसे काय? >>>

अरूंधती, हा प्रश्न बहुधा आशिषने विचारलेल्या मूळ प्रश्नांपेक्षा वेगळा आहे. पण येथे व्याख्येमधेच मतभेद दिसतात. जगात कोठेही कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध असूच शकत नाही -कारण सर्वांना अनिर्बंध स्वातंत्र्य असेल तर त्यांच्या वागणुकीने त्यातीलच काहींच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. त्यामुळे स्वातंत्र्याची अलिखित व्याख्या अशीच असणार की जे किमान स्वातंत्र्य सर्वांना अशा पद्धतीने देता येइल की ते कोणीही वापरताना इतर कोणाच्या स्वातंत्र्याला बाधा पोहोचणार नाही.

माझ्या मते विचार स्वातंत्र्य व भाषास्वातंत्र्य मुळात "असते" पण कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक देश त्यावर वेगवेगळ्या स्वरूपाची बंधने आणतात. उदा: अमेरिकेपेक्षा भारतात जमावाला काबूत ठेवण्याची सरकारची क्षमता (बर्‍याच वेळा इच्छाशक्ती) कमी असल्याने बंधने जास्त आहेत. अमेरिकेतही या स्वातंत्र्याला अपवाद आहेतच - पण ते व्यक्तिनिष्ठ नसून प्रसंगनिष्ठ आहेत. म्हणजे अमुक एका व्यक्तीचा तुम्ही अपमान करू शकत नाही असा नियम नाही, पण गर्दीच्या ठिकाणी काय बोलू शकता यावर बंधन आहे.

तुझ्या पोस्ट्समधले बाकी प्रश्न नीट कळाले नाहीत. वेळ मिळाल्यास जरा अजून स्पष्ट कर.

@फारएण्ड
>>सर्वांना अनिर्बंध स्वातंत्र्य असेल तर त्यांच्या वागणुकीने त्यातीलच काहींच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. त्यामुळे स्वातंत्र्याची अलिखित व्याख्या अशीच असणार की जे किमान स्वातंत्र्य सर्वांना अशा पद्धतीने देता येइल की ते कोणीही वापरताना इतर कोणाच्या स्वातंत्र्याला बाधा पोहोचणार नाही>>..

खरे आहे.
पण व्यवहारात अशी व्यवस्था निर्माण करणे हेच खरे आव्हान आहे.

@शांतातै
कुठल्यातरी बाहेरील देशातील व्यक्तीने भावना दुखावणारा सिनेमा काढला म्हणून कलकत्यातील मुसलमानांनी इथे उद्रेक करून रस्त्यावर हल्लागुल्ला का करावा?

फारएण्ड, कोणते प्रश्न कळाले नाहीत? Happy

इब्लिस, मनाने दुसर्‍या देशात राहणार्‍या.... केवळ शरीराने किंवा जन्माने किंवा कायद्याने एका देशात राहण्यास भाग पडलेले आणि मनाने दुसर्‍या देशात / प्रांतात राहण्याची इच्छा करणारे, राहत्या देशातील कायदे - बंधने न पाळल्याने त्या देशाच्या कायद्याच्या कचाट्यात येणारे असे लोक. किंवा दोन देशांच्या राजकारणात आपले कायदेशीर अस्तित्त्व गमावलेले लोक. त्यात त्या लोकांचा व्यक्तिशः कोणताही दोष नाही. परंतु मनाविरुद्ध त्यांना दुसर्‍या देशात राहून तिथे लादलेली बंधने सहन करावी लागत आहेत. ज्या देशांवर अतिक्रमण झाले, देशाची फाळणी झाली, एखादा प्रांत दुसर्‍या देशाने जिंकला / सत्ता काबीज केली तिथे नव्या सत्ताधीशांचे कायदे, निर्बंध, धर्म आले. त्याच्याशी ज्यांनी जुळवून घेतले त्यांचे निभावले परंतु ज्यांना जुळवून घेता आले नाही त्यांनी त्याचे परिणामही भोगले, वेळप्रसंगी जीव गमावले.

प्रत्येक देशात त्या त्या देशातील परिस्थिती, धर्म-भाषा-वंश-प्रदेश यांनुसार व्यक्तिस्वातंत्र्य व भाषास्वातंत्र्याची परिमाणे, व्याख्या बदलतात हे खरे आहे. तेथील वस्तुस्थिती पूर्णतः जाणल्याशिवाय त्या परिस्थितीबद्दल भाष्य कसे करणार? किंवा त्या स्वातंत्र्याची इतर देशांमधील स्वातंत्र्याशी कशी तुलना करता येणार? तिथली आव्हाने, त्या लोकांच्या धारणा, जाणिवा, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती या सर्वांशी त्या त्या ठिकाणच्या ''दिल्या'' स्वातंत्र्यावर परिणाम दिसून येतात.

वर आश्चिगने जे प्रश्न विचारलेत तेच मुळात जनरलाईझ्ड अशा व्याख्यांच्या (ज्या सापेक्ष आहेत) आधारावर विचारले आहेत असे मला वाटते. त्यांची सार्वकालिक, सार्वदेशिक, सार्वजनिक उत्तरे असणे मला तरी शक्य वाटत नाही. व्यक्तिगत उत्तरे वैयक्तिक दृष्टिकोनातून असतीलही, परंतु ज्या मानसिकतेविषयी प्रश्न आहेत ती सामूहिक किंवा समूहाची मानसिकता आहे. त्या त्या समूहाप्रमाणे प्रतिक्रिया, विचार, अभिव्यक्ती बदलत जाणार! आणि अशा समूहाचा भाग बनणे / न बनणे हे पुन्हा वैयक्तिक निर्णयावर किंवा परिस्थितीवर ठरणार! कारण तेच, प्रत्येक देशातील जनसमूह, भौगोलिक/ सामाजिक/ राजकीय/आर्थिक परिस्थितीनुसार हे सर्व बदलत जाते. धर्म हे राजकीय व आर्थिक सत्ताधार्‍यांचे महत्त्वाचे व सोयीचे शस्त्र आहे हे ध्यानी घेतले तर अजूनच वेगळे कंगोरे समोर येतात.

>>नास्तीकांची श्रद्धास्थाने कोणती?
सगळ्या नास्तिकांविषयी भाष्य करता येणार नाही. माझी श्रद्धा म्हणजे _सगळ्या_ गोष्टी योग्य त्या तर्काने, गणिताने व शास्त्रीय विचारांनी उलगडता येतात / येतील. इंटेलिजन्ट डिझाईन, क्रियेशनिझम सारख्या विचारांचा मला पुष्कळ त्रास वाटतो. असे विचार पसरवणार्‍या संस्थांचे फंडींग बंद व्हायला हवे असे एकदम मनापासून वाटते. Happy

>>धर्म हे राजकीय व आर्थिक सत्ताधार्‍यांचे महत्त्वाचे व सोयीचे शस्त्र आहे
हाच मूळ मुद्दा आहे.
माणसाच्या इतिहासात कोणत्या न कोणत्या स्वरूपाचा धर्म/ देवविचार वेगवेगळ्या समूहात स्वतंत्रपणे विकसित झाला आहे. त्यावरून इतके नक्कीच म्हणता येईल की 'आपण अमक्या गटाचे आहोत' असे वाटणे माणसाला महत्त्वाचे वाटते आणि तो गट दाखवण्यासाठी ढोबळ आदिवासी धर्मांपासून ते लिखित धर्मनियमांपर्यंत सगळे प्रकार अस्तित्त्वात आले आहेत.

>>एका अमेरीकन माणसाने मुहम्मदवर एक चित्रपट काढला. त्यात मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय हीन प्रकारे मुहम्मदचे चित्र उभे केले गेले.

मुळात हेच चूक आहे! (आत यावर वेगळा वाद अपेक्षित आहे का? चूक बरोबर कोण ठरवणार..? पण जसे हिंदू देव देवतांची चित्रे कधी चपलेवर कधी आणि कुठे काढलेली वगैरे..यावरून वाद माजतात तसेच हे आहे.. ). त्यामूळे बाकीच्या ऊरलेल्या मुद्द्यांना काहीच अर्थ ऊरत नाही.

बाकी भाषा स्वातंत्र्य वगैरे हे चर्चेसाठी छान पुस्तकी विषय आहेत! पण एखादी गोष्ट जेव्हा स्थळ, काळ, सामाजिक व्यवस्था ई. च्या संदर्भांना डावलून स्वताचेच दळण दळत बसते तेव्हा त्यातून विसंगतीच जन्माला येत असते. याला धार्मिक स्टीरियोटायपिंग म्हणणे म्हणजे प्रत्त्येक अभिमानी/कडवट मराठी मनुष्य हा "शिवसैनिक" आहे असे म्हणण्या सारखे आहे.. just doesnt make sense!

>>एखादी गोष्ट जेव्हा स्थळ, काळ, सामाजिक व्यवस्था ई. च्या संदर्भांना डावलून
हे संदर्भ सतत बदलते असतात. स्थळानुसारही वेगवेगळे असतात.
संदर्भांतील विसंगतींवर बोट ठेवणारी गोष्ट संदर्भ बदलायला हातभारही लावू शकते.

बाकी भाष्यस्वातंत्र्य हा विषय पुस्तकी का वाटला ते समजले नाही. (थेट पोटाच्या प्रश्नाशी संबंधित वाटत नाही म्हणून का?)

अरुंधती, भाष्य-स्वातंत्र्य हे तेवढ्यापुरतेच मर्यादीत स्वातंत्र्य आहे. कोणाला शारीरीक इजा करणे त्यात बसत नाही. आडमार्गाने तसे केले तर काय वगैरे अनेक उपप्रश्न अर्थातच असतात.

ज्या राष्ट्रांमधे कायदा हाच धर्मावर आधारीत असेल तिथे नक्कीच भाष्य-स्वातंत्र्य असणे कठीण असणार (खासकरुन अल्पसंख्यकांना - अनेकदा अशा ठिकाणच्या बहुसंख्यकांना त्यांच्याही भाष्य-स्वातंत्र्यावर गदा आलेली असते हे जाणवतच नाही कारण धर्माप्रमाणे टॅबु असलेल्या गोष्टी त्यांनाही कराव्याशा वाटतच नाहीत). परराष्ट्रात राहणार्‍या लोकांची गोष्ट निराळी आहे. (१) ते तिथे स्वमर्जीने गेले असले तर एक मतप्रवाह असा असेल की त्यांनी तिथले कायदे मानायला हवे. पण ते जर मुलभूत स्वातंत्र्य देत नसतील तर कायद्यात राहुन त्याविरुद्ध लढायला काहीच हरकत नसावी. (२) त्यांच्यावर आक्रमण होऊन ते पराधीन झाले असले तर हक्कांकरता लढायला हरकत नसावीच. (३) खरी कठीण परिस्थिती त्यांची जे एका देशात जन्मले, त्याच देशाला मायभुमी मानली, पण इतर लोक त्यांना हाकलण्यामागे आहेत. ते जर अल्पसंख्यक असले तर त्यांचा वाली कोण?

What outrages us the most? Is it the 'kind of action itself' or the 'blind irrationality' that motivates those actions?

ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे आहे. एवढा विचार करायची कुवत जरी थोड्या लोकांत आली तरी जगात थोडि तरी शांतता नांदेल

Consequences of curbing of freedom of expression, even if that expression includes ‘lies’ and ‘propaganda’, are more disastrous than living with ‘lies’ and ‘propaganda’.

@aschig | 2 October, 2012 - 07:28 नवीन
>> (३) खरी कठीण परिस्थिती त्यांची जे एका देशात जन्मले, त्याच देशाला मायभुमी मानली, पण इतर लोक त्यांना हाकलण्यामागे आहेत. ते जर अल्पसंख्यक असले तर त्यांचा वाली कोण?<<

(१) आपल्याला यात फक्त धार्मिक अल्पसंख्य अभिप्रेत आहेत काय?
(२) भारतातील 'अल्पसंख्य'ची व्याख्या विचित्र आहे. एका टोकाला ज्यांची संख्या नगण्य आहे असे पारशी , ज्यू, अँग्लोइंडियन अल्पसंख्य आणि जे भारताच्या राजकारणात प्रचंड प्रभाव टाकण्याइतक्या मोठ्या संख्येने [नेमकी आकदेवारी माहित नाही पण १२ ते १५ % असावेत ] असे मुस्लिम आणि त्याहून थोडे कमी असलेले ख्रिश्चन हेही अल्पसंख्यच!
यात पारशी , ज्यू, अँग्लोइंडियन याचा वाली कोण हे विचारणे रास्त आहे. बाकीचे खुप मोठ्या संख्येने असल्याने खर्‍या अर्थाने अल्प्सख्य नाहीत.
(३) या उलट बहुसंख्यांकामध्येच संख्येने खूप कमी असलेल्या कांही जातींवर चिकटविलेल्या लेबलांमुळे गंडांतर येऊ घातले आहे त्यांचा वाली कोण हा प्रश्न आहे.
उदा. महाराष्ट्रात पारध्यांवर गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आहे आणि त्यांना कायम संशयाच्या भोवर्‍यात जगावे लागते. पण त्यांना निदान 'मागास्'चे कवच आहे. पण असे कवच नसनारी, आणखीही उदाहरणे देण्यासारखी आहेत.

Pages