ती येते अन मुद्दाम

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 September, 2012 - 15:34

ती येते अन मुद्दाम
मला न भेटताच जाते
तिला कदाचित माझी
का स्वत;ची भिती वाटते

काय अजूनही डोळ्यातून
माझ्या प्रेम आहे झरते
का अजूनही तिला तिचा
नकार आहे दु:ख देते

खूप वर्ष झाली आता
सार विसरायला हवे ते
समजावया हवे तिला
की वय वेडे होते ते

तेव्हा तर तिला मी
सरळ विचारले होते
नकारातील अश्रूत तिच्या
अन प्रेम वेचले होते

नंतर पण व्रत मैत्रीचे
तरीही पाळले होते
आता ही व्रत माझ्या
मनात दृढ आहे ते

जाळला अंकुर प्रत्येक
प्रीतीची स्मृति तीही
भिती मग कसली तिला
कळेना मज अजूनही

तसे न भेटणे तिचे
स्वीकारले आहे जरी
जाणे तिचे असे परी
टोचते आहेच उरी

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसे न भेटणे तिचे
स्वीकारले आहे जरी
जाणे तिचे असे परी
टोचते आहेच उरी<<<

शेवट चांगला आहे.

(अवांतर - काही वेळा काही गझलबाह्य कवितांचा शेवट हा गझलेच्या मतल्याचे पोटेन्शिअल असणारा होतो)

शुभेच्छा

-'बेफिकीर'!