Submitted by सुप्रिया जाधव. on 25 September, 2012 - 01:43
फक्त एकदाच येऊन जा...
देऊ नकोस काहीही...पण घेवून तर जा !
माळलेली शब्दफुले..
अर्थांचे गोड झुले
स्पर्शाचा पारिजात
तुझ्या हातातला माझा हात...
फक्त एकदाच येऊन जा...
देऊ नकोस काहीही...पण घेवून तर जा !
तुझी अबोलीची रात्र
माझं मनवण्याच सत्र
त्या नकारातला होकार
अन एकरुपतेतला साक्षात्कार !
फक्त एकदाच येऊन जा...
देऊ नकोस काहीही... पण घेवून तर जा !
आठवणींची फुलपाखरं
सहवासातल सुख सारं
अमर झालेले काही क्षण
या जन्मीच अधुरं ॠण !
फक्त एकदाच येऊन जा...
देऊ नकोस काहीही...पण घेवून तर जा !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान तरल व अधिरे भाव व्यक्त
छान तरल व अधिरे भाव व्यक्त झाले आहेत. रचना मस्त वाटली. धन्यवाद
कविता आवडली !
कविता आवडली !
बेफीजी, मुक्तेश्वर
बेफीजी,
मुक्तेश्वर कुळकर्णीजी
धन्स!
फारच भावस्पर्शी आहे ही
फारच भावस्पर्शी आहे ही !!
तुझी अबोलीची रात्र माझं मनवण्याच सत्र>>>>>>>>>>
'अबोली' मुळे अबोलीच्या फुलाचा सन्दर्भ लागतोय मग पुढची ओळ तितकी एकरूप वाटत नाहीये
तुझ्या अबोल्याची रात्र ..माझं मनवण्याचं सत्र !!>>>> असे केल्यास कसे होईल??
कळावे
आपला नम्र
वैवकु
(अरेच्या टायपो तर नाहीये ना ? नै तर मी उगाच फुकटचा सल्ला दिल्यासारखे होईल !! ;))
टायपो नाहिय.... सल्लाही
टायपो नाहिय....:-)
सल्लाही योग्य आहे पण मला अबोल्याने फुललेली अस म्हणायचय...
पहिली ओळ अन दुसरी ओळ असा संदर्भ अपेक्षित नाहीय इथे....
प्रत्येक ओळ स्वतंत्र वाचून पहा...:-)
-सुप्रिया.
ओके .................. तुम्ही
ओके ..................
तुम्ही म्हणताय तेही बरोबरचय तै
पटतय मला !!
धन्स
सुंदर कविता ,अबोली समर्पक .
सुंदर कविता ,अबोली समर्पक .
धन्यवाद डॉ. साहेब !
धन्यवाद डॉ. साहेब !
सुंदर कविता...
सुंदर कविता...
मस्तयं...! आवडली!
मस्तयं...! आवडली!
Duryodhan, आर.के. धन्स !
Duryodhan,
आर.के. धन्स !:-)
'देऊ नकोस काहीही...पण घेवून
'देऊ नकोस काहीही...पण घेवून तर जा ''.. सुप्रिया.. __/\__
पोहोचतेय.
पोहोचतेय.
http://majhigani.blogspot.in/
http://majhigani.blogspot.in/2012/09/blog-post.html
मला अशी चाल लावाविशी वाटली.
तुझी अबोलीची रात्र माझं
तुझी अबोलीची रात्र
माझं मनवण्याच सत्र
----- वा!
देऊ नकोस काहीही ऐवजी फक्त देऊ नकोस 'काही' कसे वाटेल?
जयन्ता५२
वोव! धन्स देवकाका....आणी
वोव! धन्स देवकाका....आणी सॉरी तुमच्या वामकुक्षीच खोबरं झाल म्हणून
वर्षू नील,
बागेश्री ,
जयन्त कुलकर्णीकाका,
'काही' चचं 'काहीही' केलय!
धन्स मंडळी.
-सुप्रिया.
कविता फारच छान !!
कविता फारच छान !!
धन्स अजय.
धन्स अजय.
मस्त.....खूपच छान वाटतय वाचून
मस्त.....खूपच छान वाटतय वाचून