बरेच अवघड असते...........

Submitted by वैवकु on 24 September, 2012 - 04:49

असेच असते जाण माणसा जगणे म्हणजे
असूनही नसल्यागत असते असणे म्हणजे

मी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा
हीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे

किती घेतले किती सोडले हिशेब कसला
जसे घेतले तसे सोडणे..... श्वसणे म्हणजे

पाउस, अश्रू ,पारिजात ना अजून कोणी
मी तर केसांकडून शिकलो गळणे म्हणजे Happy

तन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत
असे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे .........[>>>>>>>माझ्या मनाजोगता बदल सुचवल्याबद्दल धन्स टू सुप्रियातै !!]

जगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला
तुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे

करून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा
बरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे !!

बरेच अवघड असते.......... 'सोपा' करणे म्हणजे !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> शेर कितीही केले तरिही विठ्ठल उरतो उरात माझ्या
वाण लागला आहे त्याचा मी कनवाळू झालो आहे <<

वाह वाह !!

अवांतर -
प्रतिसादांच्या लांबीबाबत तुला असे म्हणायचे आहे का ? -

शेर कितीही केले तरिही विठ्ठल उरतो उरात माझ्या
वाण लागला देवसरांचा मी कनवाळू झालो आहे

चिखल्या म्हणे आता |
गझलेपेक्षा प्रतिसादच भारी ||
देवसर तारी, त्याला कोण मारी ||
श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी || १ ||

Pages