दर्द

Submitted by आकाश बिरारी on 23 September, 2012 - 17:17

भैरवीला खोल जपल्या वेदनांना चाळतो मी
रात्र होता चिंब ओला आणि दिवसा वाळतो मी

व्यक्त होतो आसवांनी , मुक्त काही होत नाही
काजळी डोळ्यात कारण काळजाला जाळतो मी

आमुची उलटीच गाथा, कर्म देते दैव नेते
काय होते , काय झाले, जीवना कंटाळतो मी

दोघडीचे इश्क होते, ते तराणे छेड़तो पण;
कोण चुकले कोण नाही, वाद सारे टाळतो मी

ते म्हणाले, "भोग शिक्षा, मुक्त जगणे मान्य नाही"
"त्या" जगाच्या चौकटीतुन, हाय! मजला गाळतो मी

लोक म्हणती "खास" शायर, शायरीचा रंग न्यारा
गझल वाहे "दर्द" तो, जो, अंतरी सांभाळतो मी

--- आकाश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमुची उलटीच गाथा, कर्म देते दैव नेते
काय होते , काय झाले, जीवना कंटाळतो मी

दोघडीचे इश्क होते, ते तराणे छेड़तो पण;
कोण चुकले कोण नाही, वाद सारे टाळतो मी

---- हे शेर जमलेत!
जयन्ता५२

आमुची उलटीच गाथा, कर्म देते दैव नेते
काय होते , काय झाले, जीवना कंटाळतो मी<<< छान आहे, पहिली ओळ विशेष आहे

काजळीच्या शेरातील दोन्ही ओळी छान आहेत, त्या स्वतंत्ररीत्या आवडल्या

शुभेच्छा

(आश्वासक शब्दरचना व खयाल) Happy

आमुची उलटीच गाथा, कर्म देते दैव नेते
काय होते , काय झाले, जीवना कंटाळतो मी

हा शेर खूप आवडला.

बाकी सर्व ठीक.