धार्मिकता कुठे आणि कशी असावी

Submitted by गारम्बीचा बापू on 23 September, 2012 - 04:52

धार्मिकता कुठे आणि कशी असावी

हल्ली गल्ली गल्लीत बरेच बाबा लोक झालेत, हे सर्व बाबा महाराज स्वतहाला संत महात्मे म्हणवून घेतात , मी हे या साठी म्हणतोय कारण हे माझ्या धर्मातले आहेत , थोडा अभ्यास करून बघा यातील ८०% बाबा महाराज लोक कुठल्या न कुठल्या संतांच्या नावाचा, किंवा देवाच्या नावाचा वापर करतात , मान्य आहे हे सगळं, पण यातील काही पराक्रमी बाबा स्वतहाचे मंत्र तयार करतात , ते हि असे मंत्र असतात कि मुळ ज्या संतांचा किंवा देवाचा हे गवगवा करतात त्यांच्या मुख्य मंत्रा मध्येच तोड फोड करून हे स्वतहाचे मंत्र बनवतात . ज्या देवाच्या किंवा संतांच्या नावाचा हे वापर करतात तो देव/संत राहिले बाजूलाच हे स्वतहाचीच मनमानी करत बसतात , फक्त नाव त्यांचं वापरतात . काही साम्प्रदाय्त तर कुंकू, माळ , पुस्तकं, हे त्याच साम्प्रादायातून घेणे सक्तीचे आहे , सांगण्यात येते कि बाहेरून घेतलेल्या वस्तूंमध्ये परमेश्वरी वास नसतो, आणि हे कुंकू, माळ बनवण्याचे कारखाने ह्यांचेच असतात , काही सांप्रदायात सांगण्यात येते तुमच्या घरात देवाचे अधिष्टान बसवा, त्या साठी १००० रुपये भरा , मग काही लोक येऊन पूजा पाठ करून एक लहानसा देवारा ( तुमच्या पैशांचा ). बसवणार, झालं अधिष्ठान , का ? पूर्वी घरात देव्हारा न्हवता का ? त्यात परमेश्वर न्हवता का ? माणूस गरीब आहे कि श्रीमंत आहे काही काही बघितले जात नाही, धर्माच्या नाव खाली वाट्टेल त्याला वाट्टेल तसे लुटले जाते . आणि गरीब लोकं श्रेद्धेच्या पोटी पैसे खर्च करतात , हे महाराज वातानुकुलीत घरात राहणार, वातानुकुलीत गाडीत फिरणार , यांच्या कडे एक हि स्वतहाचा ग्रंथ नाही, ते लिहिण्याचे ज्ञान हि नाही , महाराज वारले कि त्यांचा मुलगा पडद्यावर येतो, मुलगा आला कि लगेच त्यांची पत्नी येते, मग त्यांचा मुलगा येतो , साम्प्रदायातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात ह्यांचे फोटो दिसू लागतात , फोटो चे पैसे वेगळे , अरे काय वारस हक्क चालवत बसलेत कि काय ? आणखी किती दिवस लोकांना असेच लुबाडणार आहात .

हे लोक आप आपली दुकानं चालवत बसले आहेत , दुकानं म्हणजे आप आपले सांप्रदाय, म्हणजे काही लोकांचा गट तयार करून असतात हे , एवढा मोठा जन समुदाय जर तुम्ही एकत्र करता मग ह्या जन समुदायाला " दारू पिऊ नका, भांडू नका " हेच वर्षानुवर्षे सांगून , भाकड कथा ऐकवून , टाळ चिपळ्या वाजवून ..काय साध्य करता ?
समाज सुधारणा करता म्हणजे नक्की काय करता , कुणी दासबोध वाचून दाखवतो, तर कुणी ज्ञानेश्वरी, कुणी भगवद्गीता तर कुणी रामायण, कुणी महाभारत तर कुणी आणखी काही , पण एवढा मोठा जन समुदाय वापरून तुम्ही लोक सेवा का करून घेत नाही , लोक सेवा सामाजिक कार्य करायची सुरवात केली तर त्यातील ५०% जन समुदाय दुसऱ्या दिवसापासून येण्याचा बंद होईल आणि घरात बसून क्रिकेट बघत बसेल. एखाद्या साम्प्रादायात असेच एकदा जाऊन बसून बघा , १ तासानंतर लोकं डुलक्या मारू लागतात, आत्ता माणूस नेहमी नेहमी तेच तेच ऐकत बसला तर नक्कीच डुलक्या मारणार . हेच घडतं तिथे,
जर सगळ्या बाबा महाराज लोकांना समाज एक व्हावा असे वाटत असेल तर मग हे सगळे एका व्यासपीठावर एकत्र का येत नाही , का हे लोक आप आपले संप्रदाय एक करत नाही, का एवढा मोठा जन समुदाय एकत्र करून आपले शक्ती प्रदर्शन करत नाही, का एवढा मोठा जन सागर वापरून सामाजिक कार्य करत नाही .
काही बाबा लोकांना राज्य स्थरीय पुरस्कार दिले जातात , का ?
ह्यांचं कार्य काय ? कोणत्या मुद्द्यावर ह्यांना हे पुरस्कार दिले जातात ?
लोकांचा वेळ वाया घालवला म्हणून ह्यांना दंड लावा , ह्यांच्या संपत्तीची चौकशी करून ह्यांना कर लावा .
इतर धर्मात हि असे बाबा साधू आहेत, पण ते लोक फक्त आणि फक्त त्यांच्या देवाचा धावा करत असतात , वेळ प्रसंगी एक होतात, जन समुदाय एकत्र घडवून आणतात , शक्तीप्रदर्शन करतात .
आणि आपले लोक संप्रदायात सत्संग ळा जाऊन चणे खाऊन झोपा काढतात .

सांगण्याचा मुद्दा एकच आहे कि, लोकांना भाकड कथा ऐकवून, काहीतरी कापानिक गोष्टी ऐकवून षंड बनवू नका, जन समुदाय वापरून सामाजिक काम करा , एकत्र व्हा, वेळप्रसंगी आपले शक्तीप्रदर्शन करा, तुमच्या एका हाकेतच जनसागर एकत्र होऊ शकतो . देवाचे दूत बना, स्वाताहा देव बनायचा प्रयत्न करू नका , २१व्य शतकात भारताची प्रगतीकडे वाटचाल न्यायची असेल तर मनुष्यबळाचा आणि वेळेचा पुरेपूर फायदा उठवा हीच अपेक्षा .

!! जय जय श्रीराम !!

तुशार घाग यान्च्या पुर्व-परवानगी ने प्रकाशित !
http://dhumketutusharghag.blogspot.in/2012/09/blog-post.html#comment-form

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर धर्मात हि असे बाबा साधू आहेत, पण ते लोक फक्त आणि फक्त त्यांच्या देवाचा धावा करत असतात , वेळ प्रसंगी एक होतात, जन समुदाय एकत्र घडवून आणतात , शक्तीप्रदर्शन करतात .

असं काहि नाही हो. इतर धर्मात पण अंतर्गत हेवेदावे, चढाओढ सगळं काही असतं .
खुद्द धर्मसंस्थापकांच्या मुला जावयात भांडणे होऊन नविन पंथ तयार होतात.
एखाद्या धर्मसंस्थापकाच्या हाडाच्या नी राखेच्या वाटण्यांवरून अनुयायांत युद्धे होतात.
आपल्या हे प्रकर्शाने लक्षात येत नाहि इतकंच.
तुषार घाग बाबाम्चा हेतू चांगला असेलही पण आता आपला समाज धर्म पंथ किंवा बुवा बाबा याम्च्या ओढीने हाकेने एकत्र येण्याच्या पलीकडे गेलेला आहे.

दुसर्‍याचा लेख गुलमोहरात चालतो का?

तसे असेल तर भगव्दगीता किंवा संत खर्वसकर महाराज याम्च्या ओव्या मीही रोज एक इथे लिहावी म्हणतो.

कुणाची पूर्वपरवानगी असेल तर करू शकतो.
तुम्ही श्रीकृष्णाची किंवा किमान व्यासमुनींची पूर्वपरवानगी घेऊन आलात तर आणि त्यांचा मोबाईल नं किंवा ई मेल अ‍ॅड्रेस इथे दिलात तर भगवदगीतेतले श्लोक इथे देवू शकता.
Wink

सचिन गोरे कि काळे ? तुम्हि फारच सम्वेदनाशिल दिसताय माय्बोली वर्च्य लेखान्बबत , काय गौड्बन्गाल आहे भावु?

एखादी गोष्ट फॅशनेबल आहे म्हणून त्याचा खप प्रचंड वाढतो, पैसे मिळतात. कमी कपडे घालून नको तितकी अंगलट केलेली बघायला लोकांना आवडते म्हणून तसले सिनेमे काढून पैसे मिळतात. लोकांना क्रिकेट आवडते म्हणून सतत क्रिकेटचे सामने भरवून पैसे गोळा करायचे. तसेच धर्माच्या नावाखाली फसवायचे.

सगळे धंदे एकाच प्रकारचे - लोक भावनेच्या आहारी जास्त जातात, विचार करत नाहीत. म्हणून विकते ते विका, कारण काहीहि असो, असे घडते.
हा प्रश्न धर्माबद्दल नसून एकूणच सामाजिक आहे. आज एक प्रश्न सोडवला तर उद्या दुसरा उभा राहील.
पुषकळदा जी उपाय योजना करावी त्यामुळेच दुसरे प्रश्न उद्भवतात.
जसे बहुतेक सर्व व्यक्तींत अनेक गुण असूनहि एक किंवा अधिक दोष असतात, तसे समाजात सुद्धा एक किंवा अधिक वाईट गोष्टी घडत असतात. प्रश्न फक्त चांगले जास्त की वाईट हा आहे.

थोडक्यात इथे धर्माबद्दल न बोलता, सामाजिक प्रश्न समजून त्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.

झक्की काका,

धर्माच्या व्याख्येत शिरून पुन: सुरू केले तर धारयती इति,.. अन कुणाला धारण करतो, तर समाजाला. म्हणून हा सामाजिकच प्रश्न आहे.

धर्म असावा. त्याचे 'लेबल' काही/कोणते ही असले तरी तो एक 'यमनियम' म्हणून असावा. (यमालाच धर्म [असेही] म्हणतात.. ) पण त्याचे आचरण ही एक वेगळी गोष्ट आहे. या विषयावर बरेच चिंतन आहे. योग्य व्यक्ती सभ्य पणे चर्चा करणार असतील तर जरूर करूयात.

तोपर्यंत "सामाजिक प्रश्न समजावा" या बाबीशी सहमत.

(ता.क. मूळ लेख वाचलेला नाही. मी तुशार घाग व कळीचानारद या आयडींचे काहीही वाचत नाही. फक्त ब्याकप घेऊन ठेवतो.)

लेख वाचला. एकंदर आशय सहमत होण्यासारखा आहे.
मात्र- जन समुदाय वापरून सामाजिक काम करा , एकत्र व्हा, वेळप्रसंगी आपले शक्तीप्रदर्शन करा, २१व्य शतकात भारताची प्रगतीकडे वाटचाल न्यायची असेल तर मनुष्यबळाचा आणि वेळेचा पुरेपूर फायदा उठवा

ही अपेक्षा काही रास्त वाटत नाही. त्यांची (बाबा लोकांची) दुकाने वेगळी आहेत. त्यांनी सामाजिक कामे का करावीत? फक्त गर्दी आहे त्यांच्याकडे म्हणून?
भारतात हजारो सिनेमा थिएटर्स आहेत. पैसे घेऊन लोकांना खेळ दाखवतात. त्यांच्याकडेही लाखो लोक दररोज जमतात. मग त्यांना आपण सांगतो का, की बुवा, उपलब्ध गर्दीचा वापर करा, एकत्र या आणि सामाजिक काम करा?

लोकांना पैसे देऊन आपापले मनोरंजन शोधण्याचा आणि आपल्या आवडीचे सिनेमे बघण्याचा हक्क आहे. प्रत्येकाची वेळ घालवण्याची साधने वेगळी असतात. ज्यांना सामाजिक काम करायचे त्यांनी स्वतः करावे. त्यांना कोणी अडवले आहे? इतरांवर जुलूम का म्हणून?

भारतात हजारो सिनेमा थिएटर्स आहेत. पैसे घेऊन लोकांना खेळ दाखवतात. त्यांच्याकडेही लाखो लोक दररोज जमतात. मग त्यांना आपण सांगतो का, की बुवा, उपलब्ध गर्दीचा वापर करा, एकत्र या आणि सामाजिक काम करा?

त्यानाच कशाला, हा लेख लिहिणारे अमेरिकेत जो पगार मिळवतात, त्यावर चार कुटुंबे पोसू शकतात.. त्याना सांगून पहा एका अनाथाची जबादारी घ्यायला, बघा.. कसे वस्स्कन अम्गावर येतात ते ....

त्यानाच कशाला, हा लेख लिहिणारे अमेरिकेत जो पगार मिळवतात, त्यावर चार कुटुंबे पोसू शकतात.. त्याना सांगून पहा एका अनाथाची जबादारी घ्यायला, बघा.. कसे वस्स्कन अम्गावर येतात ते ....

अहो, इथे कशाला अमेरिका आणता?
आणि कुणि कुठे बसून लिहीले हे महत्वाचे की काय लिहीले ते?
उग्गाच जिथे तिथे अमेरिका आणायची - तुम्ही काय जळता का अश्या लोकांवर? का आपले उगाच काड्या टाकून आग लावण्यासाठी?
नि जसे तुम्ही अमेरिकेतल्या लोकांना काय सांगावे हे म्हणता तसे मी पण अमेरिकेत बसूनहि भारतातल्या लोकांनी काय करावे हे सांगू शकतो, खरे तर बरेच काही काही सांगू शकतो, नि मला भरपूर वेळहि आहे.

माझ्या मते, भारतात चारच काय, दहा कुटुंबे पोसता येतील एव्हढा पगार नि हजार कुटुंबे पोसता येतील, एव्हढा पैसा असणारे लोक आहेत. ते काही सगळेच समाज कार्य करत नाहीत, त्यांना सांगा, असे लिहा.

सोडा नाद अमेरिकेचा. अमेरिकेतले लोक भारतात काय चालते त्याकडे ढुंकूनहि बघत नाहीत, मग तुम्ही कशाला अमेरिकेतल्या लोकांचा विचार करता?
भारतावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला अमेरिकेची नि अमेरिकेतल्या लोकांची काहीहि गरज नाही. भारतातच अमेरिकेच्या तिप्पट लोक आहेत, तेव्हढे पुरे आहेत, स्वतःचे स्वतः कल्याण करायला.

नि नुसत्याच काड्या टाकायच्या असतील तर जरा भाजप-कॉंग्रेस, अण्णा हजारे वगैरे विषय पण घुसवा. अमेरिकेत बसणार्‍यांपेक्षा त्यांचाच जास्त संबंध आहे भारतातल्या प्रश्नांशी.

>>>एखादी गोष्ट फॅशनेबल आहे म्हणून त्याचा खप प्रचंड वाढतो, पैसे मिळतात. कमी कपडे घालून नको तितकी अंगलट केलेली बघायला लोकांना आवडते म्हणून तसले सिनेमे काढून पैसे मिळतात. लोकांना क्रिकेट आवडते म्हणून सतत क्रिकेटचे सामने भरवून पैसे गोळा करायचे. तसेच धर्माच्या नावाखाली फसवायचे.

सगळे धंदे एकाच प्रकारचे - लोक भावनेच्या आहारी जास्त जातात, विचार करत नाहीत. म्हणून विकते ते विका, कारण काहीहि असो, असे घडते.
हा प्रश्न धर्माबद्दल नसून एकूणच सामाजिक आहे. आज एक प्रश्न सोडवला तर उद्या दुसरा उभा राहील.
पुषकळदा जी उपाय योजना करावी त्यामुळेच दुसरे प्रश्न उद्भवतात.
जसे बहुतेक सर्व व्यक्तींत अनेक गुण असूनहि एक किंवा अधिक दोष असतात, तसे समाजात सुद्धा एक किंवा अधिक वाईट गोष्टी घडत असतात. प्रश्न फक्त चांगले जास्त की वाईट हा आहे.

थोडक्यात इथे धर्माबद्दल न बोलता, सामाजिक प्रश्न समजून त्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.
<<<

अविश्वसनीय!

हा प्रतिसाद झक्कींचा आहे?

हे गणेशोत्सवाच्या निमिताने असलेले सौजन्य मानावे काय? जराही कडवटपणा नाही, उपरोध नाही, तडाखे नाहीत, कोलणे नाही. जॅकी चॅनच्या पिक्चरमध्ये त्याने भावगीत गात कळ्याफुलांमधून नाचावे तसे वाटले.

Light 1

(आता हा दिवा कशाला म्हणून मला हाणणार बहुधा झक्की)

तुमच्यातील कोणी निर्मल बाबाची जाहिरात कधी पाहिली होती का? त्यात बाबा किंवा देवापेक्षा क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट डीटेल्स, पेमेंट कसे करावे , चेक पेमेंट , वायर ट्रान्स्फरचा कोड याचेच डीटेल्स जास्त होते.
http://www.nirmalbaba.com/
सगळे उपाय करुन थकलेल्या लोकांच्या vulnerability चा फायदा घ्यायला लोक टपलेलेच असतात. या बाबा लोकांपासुन काही चांगल्या कार्याची अपेक्षा करणे चुक आहे. शक्य तितके लोकाना यांच्यापासुन सावध करणे हाच यावर एक उपाय आहे.

मनस्मी, त्या निर्मल बाबाची लिंक उडवा आधी. त्या साईटला चुकून का होईना ४-५ हिट्स आपल्याकडून नको जायला. Sad